![Kamlesh Sutar Profile](https://pbs.twimg.com/profile_images/1803141038179229697/5Hbkp2qS_x96.jpg)
Kamlesh Sutar
@kamleshsutar
Followers
30K
Following
7K
Statuses
7K
Editor, @Zee24taasnews | Author of best selling political thriller #36Days| #Chevening @fcdo Fellow | Tweets=Personal,RTs not endorsement
Mumbai, India
Joined August 2009
कोकणच्या भूमीनं मुंबईला भरभरून दिलंय. कोकणी माणसाने मुंबईला आपल्या घामाने आणि प्रसंगी रक्ताने सजवलंय... आता वेळ आलीय विकासाच्या माध्यमातून कोकणाला भरभरून परत देण्याची. ग्लोबल कोकण संस्थेनं गेली अनेक वर्षं कोकणच्या विकासासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. याही वर्षी ग्लोबल कोकण महोत्सव होणार आहे. या उपक्रमात झी २४ तास माध्यम सहयोगी आहे. कोकणचा विकास करताना फक्त समानतेच्या न्यायाने नाही तर न्यायसंगत विचाराने काम करणे गरजेचं आहे ही भूमिका या प्रसंगी मांडली. या कार्यक्रमात उद्योग मंत्री उदय सामंत, फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले, ग्लोबल कोकणचे संजय यादवराव यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
1
0
10
उत्तम निर्णय ! सर्व सरकारी कार्यालयांमध्ये मराठीत बोलणे अनिर्वाय मराठी भाषा धोरणाच्या अंमलबजावणीबाबत राज्य सरकारचे परिपत्रक मराठीत न बोलणा-या अधिकारी,कर्मचारी यांच्याविरोधात वरिष्ठांकडे तक्रार करता येणार. दोषी आढळल्यास शिस्तभंगाची कारवाई. प्रत्येक सरकारी कार्यालयात मराठी भाषेचा वापर करण्याबाबत फलक लावला जाणार केंद्र सरकारची कार्यालये तसेच बँकांमधील सूचनाफलक,नामफलक मराठीतूनच असणे अनिर्वाय #मराठी
49
290
2K
RT @zee24taasnews: Namdev Shastri Exclusive | महंत नामदेव शास्त्री एक्सल्युझिव्ह | Dhananjay Munde | Beed | Zee24Taas #DhananjayMunde #namd…
0
3
0
झी २४ तासच्या उद्योग संमेलनात सहभागी होऊन उद्योजकता आणि कौशल्य विकास विषयक व्हिजन मांडल्याबद्दल झी परिवारातर्फे आपले मनःपूर्वक धन्यवाद @MPLodha जी.
I participated in the 'Udyog Sammelan 2025' organized by @zee24taasnews and spoke about how our Skill Development Department is empowering the youth, enhancing their skills, and fostering a robust entrepreneurial ecosystem. Cabinet Minister Shri @samant_uday Ji also was present. #udyogsammelan #MaharashtraIndustry #maharashtra #Zee24Taas
0
0
1
झी २४ तासच्या उद्योग संमेलनात सहभागी होऊन उद्योग विषयक व्हिजन मांडल्याबद्दल झी परिवारातर्फे आपले मनःपूर्वक धन्यवाद @NiteshNRane जी.
आज @zee24taasnews आयोजित उद्योग संमेलनात मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री म्हणून उपस्थित राहिलो. भविष्यकाळात महायुती सरकारच्या माध्यमातून मत्स्यव्यवसाय व बंदर विकासाच्या माध्यमातून राज्यातील उद्योग वाढीसाठी करण्यात येणाऱ्या संकल्पना या मंचावर मांडता आल्या. तसेच विविध उद्योजकांशी संवाद साधता आला, यावेळी झी 24 तासच्या उपक्रमाला शुभेच्छा देखील दिल्या.
2
0
7
झी २४ तासच्या उद्योग संमेलनात सहभागी होऊन उद्योग विषयक व्हिजन मांडल्याबद्दल झी परिवारातर्फे आपले मनःपूर्वक धन्यवाद @samant_uday जी.
आज वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड येथे आयोजित "झी २४ तास उद्योग संमेलन" परिषदेत सहभागी होण्याचा सन्मान मिळाला. झी २४ तासचे मुख्य संपादक श्री. कमलेश सुतार यांच्यासोबत व्यापार आणि स्टार्टअप क्षेत्रावर सखोल संवाद साधता आला. दोन वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे यांनी ही सकारात्मक प्रथा सुरू केली, जी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुढे नेण्यात आली आहे. १५.७० लाख कोटींचे सामंजस्य करार: दावोस परिषदेच्या माध्यमातून भारताला मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक मिळाली आहे. JSW, रिलायन्स यांसारख्या नामांकित ६१ कंपन्यांनी जागतिक स���तरावर सामंजस्य करार केले असून, या माध्यमातून महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्राला अधिक बळ मिळणार आहे. आर्थिक विकासाची नवी दिशा: या संवादात औद्योगिक क्षेत्रातील भविष्यातील संधी, बेरोजगारी, जागतिक बाजारपेठेतील स्पर्धा, आणि महाराष्ट्राला औद्योगिक केंद्र बनवण्याच्या धोरणांवर चर्चा करण्यात आली. आपल्या सहकार्यामुळे आणि पाठिंब्यामुळेच महाराष्ट्र औद्योगिक प्रगतीकडे ठाम पाऊले टाकत आहे. 🙏 जय महाराष्ट्र! 🚩 @zee24taasnews @kamleshsutar #ZeeNews #WEF25
0
0
0
@samant_uday झी २४ तासच्या उद्योग संमेलनात सहभागी होऊन उद्योग विषयक व्हिजन मांडल्याबद्दल झी परिवारातर्फे आपले मनःपूर्वक धन्यवाद @samant_uday जी.
0
0
0
RT @ChhaganCBhujbal: मी राजकारणात आहे तो समाजासाठी! वंचित, भटके, ओबीसी यांच्या हक्कांसाठी लढत आलो, लढत राहणार! @zee24taasnews @kamleshsutar…
0
2
0
तुका म्हणे येथे भजन प्रमाण | काय थोरपण जाळावें तें || अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळाने रविवारी मुंबईत पहिले 'अखिल भारतीय भजन संमेलन 2025' आयोजित केले होते. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा सुंदर योग आला. भक्ती संप्रदायाचं महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासात खूप मोठं योगदान आहे. इथली सामाजिक नैतिकता जपण्याचं काम वारकरी मंडळी करत आली आहेत. "छत्रपती शिवाजी महाराज की...." म्हटल्यानंतर जसं मराठी माणसाच्या तोंडून आपसूक "जय" निघतं , त्याचप्रमाणे " पुंडलिक वरदा" म्हटल्यावर लगेचच " हरी विठ्ठल" येतं... मराठी माणूस एकवेळ बोलावून सुद्धा कोणाकडे 'भोजना' साठी जाणार नाही, पण 'भजना'ला मात्र न बोलावता ही जाईल. भजन आणि मराठी मातीचं नातं हे अतूट आहे... 'अखिल भारतीय भजन संमेलनात ' राज्यभरातून भजनी मंडळ सहभागी झाले होते. आणि सगळ्यात उल्लेखनीय बाब म्हणजे, तरुण मंडळींनी यात मोठ्या संख्येने भाग घेतला. भक्ती रसात तल्लीन होऊन हा कार्यक्रम अनुभवता आला. कोकणातली भजनी मंडळी यात मोठ्या प्रमाणात सहभागी झाली होती. राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विभागाचे मंत्री, तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे @NiteshNRane देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते. भजनाला लोकाश्रय मोठ्या प्रमाणात आहे, त्याला राजाश्रय देखील मिळावा अशी विनंती यावेळी मंत्री महोदयांना केली. त्यांनी देखील त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. एक नितांत सुंदर असा उपक्रम सुरू केल्याबद्दल अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळाच्या संपूर्ण टीमचं , विशेष करून माझे स्नेही गोविंद दळवी यांचं अभिनंदन ! जय हरी विठ्ठल!
0
0
3
RT @zee24taasnews: Sanotsh Deshmukh Case | Walmik Karad | बीड प्रकरणातील सर्वात मोठा पुरावा | Anjali Damania |Zee24Taas #santoshdeshmukh #w…
0
11
0
विनोद कांबळी मागच्या रांगेत का ? वानखेडे स्टेडियमचा सुवर्ण महोत्सव रविवारी दिमाखात साजरा झाला. अत्यंत देखणा असा सोहळा एमसीएनं आयोजित केला. पण एक गोष्ट मात्र खटकली. विनोद गणपत कांबळी या भारताचा माजी क्रिकेटपटूला निमंत्रितांमध्ये खूप मागे स्थान देण्यात आलं होतं, अगदी सातव्या आठव्या रांगेत... अगदी काल परवाचे खेळाडू (मला कोणाचं नाव घ्यायचं नाही पण ज्यांचं फार मोठं योगदान नाही असे) ते पुढच्या काही रांगांमध्ये होते. मंचावर असलेल्या रवी शास्त्रीनं त्याने वानखेडेवर सहा चेंडूत सहा षटकार मारल्याच्या प्रसंग आपल्या अफलातून कॉमेन्ट्रीनं अक्षरशः जिवंत केला. पण मग १९९३ मध्ये याच वानखेडेवर विनोद कांबळीने इंग्लंड विरुद्ध २२४ धावा ठोकल्या होत्या, हे आयोजक कसे विसरले ? वानखेडेवर भारतीय क्रिकेटपटूची ही त्यावेळी सर्वोच्च धावसंख्या होती. २३ वर्षानंतर २०१६ मध्ये विराटनं २३५ धावा काढत हा विक्रम मोडला. कालचा दिवस हा वानखेडे गाजवणाऱ्या मुंबईच्या क्रिकेटपटूंचा गौरव करण्याचा होता. त्यात कांबळी दिसला नाही ! शास्त्री, वेंगसरकर, तेंडुलकर, गावस्कर ही मंडळी स्टेज वर होती.. असायलाच हवी, यात काहीच दुमत नाही... कांबळी व्यक्ती म्हणून आयुष्यात चुकला असेल असं कोणाला वाटत असेल. असेलही कदाचित ! पण वानखेडे स्टेडियमच्या पन्नास वर्षांचा इतिहास जागवला जात असताना, विनोद कांबळीचा रेकॉर्ड का विसरला जावा?
54
88
611
RT @NiteshNRane: अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळाने आज माटुंगा येथे आयोजित केलेल्या 'अखिल भारतीय भजन संमेलन 2025' या कार्यक्रमाला उपस्थित…
0
26
0
RT @zee24taasnews: To The Point With Kamlesh Sutar | 'टू द पॉईंट' कार्यक्रमात सुरेश धस यांची रोखठोक मुलाखत Suresh Dhas #sureshdhas #santos…
0
3
0
दिवंगत पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह यांचं केंब्रिज विद्यापीठातील सेंट जॉन्स कॉलेज ! इथे डॉ सिंह यांनी १९५७ साली अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली. एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या डॉ सिंह यांना केंब्रिज विद्यापीठात शिकण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली होती. डॉ सिंह पुढे जाऊन भारताच्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, राष्ट्रीय आर्थिक सल्लागार, अर्थमंत्री आणि देशाचे पंतप्रधान झाले. सध्या केंब्रिजच्या याच सेंट जॉन्स कॉलेज मध्ये डॉ मनमोहन सिंह यांच्या नावाने विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थ शास्त्र आणि समाजशास्त्रातील अभ्यासासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. २०२२ साली केंब्रिजला भेट दिली तेव्हा या कॉलेजसमोर फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. #मनमोहनसिंह #ManmohanSingh #cambridge
1
3
52
RT @zee24taasnews: Maharashtra Government Cabinet Expansion | टीम फडणवीस; कोण इन, कोण आऊट | Maharashtra Politics #mahayuti #devendrafadnav…
0
2
0