पानं, चाफा, फुलं, चांदी, सोनं, वेली, आठवणी, नद्या, डोंगर, गालिचे, चांदण्या वगैरे शब्दांची रेलचेल असणाऱ्या रचना म्हणजेच कविता अश्या भ्रमात पडता पडता कुठूनतरी भिररर सनानत वेगाने कुणीतरी दगड भिरकवावा आणि तो डोक्यात आरपार घुसावा तशीच ढसाळांची कविता पहिल्यांदा हातात आली.
#Namdevdhasal