डेडपूल... Profile Banner
डेडपूल... Profile
डेडपूल...

@MarathiDeadpool

Followers
17,816
Following
1,054
Media
620
Statuses
25,759

उन्हातान्हात राहतो Cool, नाव माझं Deadpool. ॥ Social ॥ Pacifism ॥ Rational. #Volleyball #Wrestling #Tilling

Regina Beach, Saskatchewan
Joined July 2020
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@MarathiDeadpool
डेडपूल...
3 years
भुकेपेक्षा चव मोठी झाली की पोटाची आबाळं सुरू होतात..!❤️ #जगण्याची_रीत #म
7
103
649
@MarathiDeadpool
डेडपूल...
2 years
प्रवासातला सोबती बलाढ्य असला की अंगात एक प्रकारचं धैर्य असतं.. ते धैर्य माणसाला कधी हरु देत नाही..❤️ #ThankYou_UddhavThackeray #आदर
Tweet media one
12
189
2K
@MarathiDeadpool
डेडपूल...
3 years
डॉल्बीच्या दणदणाटाने छत्रपतींच्या कर्तृत्वाला कानठळ्या बसू नयेत म्हणजे मिळवलं..!❤️ #म
17
67
1K
@MarathiDeadpool
डेडपूल...
2 years
इथेही 'मातोश्री'ने अलगद उचलून वर दिलं..😄❤️
@zee24taasnews
ZEE २४ तास
2 years
छोटा एकनाथ शिंदे... वेशभूषा स्पर्धेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखी वेशभूषा केलेल्या चिमुकल्याचा व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल #cm #EknathShinde #Shivsena #viral @CMOMaharashtra
22
18
347
33
79
995
@MarathiDeadpool
डेडपूल...
3 years
लोकसत्ताने बूस्टर डोसला मराठी शब्द 'वर्धक मात्रा' दिला आहे..लोकसत्ताची खासियत अशी की इंग्रजी शब्द आहे तसे न वापरता त्याला मराठी प्रतिशब्द ते शोधतात, प्रचलित करतात. उदा. डेटा ला विदा, क्रिप्टोकरन्सी ला सांकेतिक चलन/आभासी चलन इत्यादी. प्रत्येक वर्तमानपत्राने हे चालवायला हवं..!❤️ #म
27
93
986
@MarathiDeadpool
डेडपूल...
2 years
Tumbbad चित्रपट पाहिल्यावर कळतं.. नारायण धारप काय ताकदीचे भयकथा लिहणारे लेखक होते.. तुंबाड चित्रपट ज्या पद्धतीने साकारला आहे.. त्यास तोड नाही.. ७०mm वर पाहिल्याशिवाय अशा चित्रपटांची कलाकारी पूर्ण क्षमतेने कळत नाहीत.. Epic..❤️ #तुंबाड
47
62
916
@MarathiDeadpool
डेडपूल...
4 months
खांदा काय फक्त मढ्याची मक्तेदारी नाही..❤️
Tweet media one
11
76
902
@MarathiDeadpool
डेडपूल...
3 years
जिथं चढण्याचं धाडस फक्त वारा.. आणि उतरण्याची हिंमत फक्त पाण्याची धार करू शकते.. असा स्थापत्य वारसा निर्माण करणारा अग्रणी युगप्रवर्तक राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. श्वास रोखून धरायला लावणारा इतिहास..ज्वलंत इतिहासाच्या जिवंत कारागिरास मानाचा मुजरा..!❤️ #छत्रपतीशिवाजीमहाराज #म
18
140
878
@MarathiDeadpool
डेडपूल...
2 years
'घरोघरी तिरंगा' अभियानांतर्गत सकाळी एका शाळेची प्रभात फेरी पाहिली.. त्यात विद्यार्थी घोषणा देत होते.. 'बंदा रुपया चांदीचा, भारत देश गांधींचा' Thats all..❤️ #Gandhiji
19
78
860
@MarathiDeadpool
डेडपूल...
2 years
पुरुषाचं जगणं म्हणजे कंदिलाची वात..जबाबदारीच्या काचेबाहेर भडकावं म्हनलं तरी अशक्य..आपल्यांना उजेडात न्हाऊ घालणं एवढच काय ते इतिकर्तव्य. संकटाच्या रात्री वाऱ्याकावदूळात पावलांपूरता का होईना.. प्रकाश पुरवणं यातच सगळा आनंद..त्या आनंदाला कधी काजळी येऊ न देणं..म्हणजेच पुरुषपण..❤️ #म
43
147
842
@MarathiDeadpool
डेडपूल...
2 years
माझी लय इच्छा आहे..अजितदादांनी आता सांगोल्यात लक्ष घालावं..❤️ #विधानसभा
33
37
825
@MarathiDeadpool
डेडपूल...
2 years
उद्धव ठाकरेंची परीक्षा सुरू झालेली आहे.. नवं नाव, नवं चिन्ह.. जाणीव मात्र तीच.. व्याघ्र..!❤️ #शिवसेना
10
29
728
@MarathiDeadpool
डेडपूल...
1 month
फार दूर नाही.. पण २०१२ ते १५ चं पुणेही जगण्यासाठी चांगलं शहर होतं.. नंतर ती स्मार्ट सिटी योजना आली.. आणि पुण्याच्या विद्रुपीकरणास खरी सुरवात झाली.. बिल्डर लॉबी, वॉटर टँकर लॉबी आणि गुंठेमंत्री या त्रिवेणीला 'अर्थ आणि सत्ता' मुबलक उपलब्ध झाले..पुढचा इतिहास डोळ्यासमोर आहे..❤️ #पुणे
26
82
716
@MarathiDeadpool
डेडपूल...
3 years
वर्षात भले एखादं पुस्तक कमी वाचायचं..पण वाचलेल्या पुस्तकांची चर्चा करायला एक माणूस शोधायचं..!❤️ #म
15
40
698
@MarathiDeadpool
डेडपूल...
3 years
योगाच्या नावाखाली वेडी झालेली लोकं..रामकृष्ण यादवलाच पतंजली ऋषी मानू लागली..जगण्याची कला या सदराखाली कुठल्याशा रविशंकरलाच डबल श्री म्हणू लागली...जगदीश वासुदेवला सद्गुरू करून गेली. आई वडिलांचा सांभाळ करा..पाणी, निसर्ग वाचवा हे सांगायला बोगस बाबा लागत असेल..तर हे असंच होणार..❤️ #म
16
80
695
@MarathiDeadpool
डेडपूल...
4 months
राज्यसभा आणि विधानपरिषद ही दोन सभागृहे एखाद्या घटकाला पुरेसे प्रतिनिधित्व देण्यासाठी नसून.. ती अतृप्त राजकारण्यांची पुनर्वसन केंद्रे झाली आहेत..❤️
11
92
703
@MarathiDeadpool
डेडपूल...
5 months
त्या पोराचा पितानाचा सीसीटीव्ही फुटेज आलाय.. रक्ताचा अहवाल तर तसलं काही नाही सांगतोय..😄❤️ #व्यवस्था
14
86
701
@MarathiDeadpool
डेडपूल...
2 years
स्वतःला श्रीकृष्ण बनून उपदेश देता यावा यासाठी दुसऱ्याच्या आयुष्यात महाभारत घडवणारे भरपूर आहेत..!❤️ #म
6
63
667
@MarathiDeadpool
डेडपूल...
2 years
जे नोकरी करत नाहीत..त्यांना ती निवांत वाटते..जे शेतकरी नाहीत त्यांना शेती निवांत वाटते..जे उद्योग-व्यवसाय करत नाहीत त्यांना तो निवांत वाटतो.. दूरच्या डोंगरावरची नयनरम्यता सुखावह वाटते..कारण तिथले खाचखळगे या डोंगरावर टोचण्याचा विषयच नसतो.. तसंच आहे हे..!❤️ #जगण्याची_रीत #म
15
70
663
@MarathiDeadpool
डेडपूल...
2 years
आत्ताच एक पोल दिसला.. श्रीरामाच्या दर्शनाला अयोध्येला जाल का..असा. यावर द आंत्रप्रेन्युअर मधील शरद सरांचं लिखाण आठवलं.. त्याचा आशय होता. उघड्या माळावरचा म्हसोबा आपल्याला नको असतो..तिथं कमीपणा वाटतो..आपल्याला लांबचे बालाजी सारखे पैशेवान देवच भारी वाटतात..!❤️ #म
10
68
651
@MarathiDeadpool
डेडपूल...
3 years
महाविकास आघाडीने यातून धडा घेऊन महाराष्ट्रावरती लक्ष केंद्रित करावं.. परत म्हणू नका.. सांगितलं नाही..❤️ #ElectionResult
10
28
638
@MarathiDeadpool
डेडपूल...
2 years
स्फोटकं वाया घालवायची गरज न्हवती..चांदणी चौकातला पूल नुसत्या पुणेरी टोमण्यांनी पडला असता..❤️ #पुणे
24
26
646
@MarathiDeadpool
डेडपूल...
2 years
पडत्या काळात सगळ्यांकडे माझा नंबर होता..पण धीर देणाऱ्या केवळ एका माणसाचा टेक्स्ट मेसेज मला आला..धोनीचं सरसपण इथंच संपत नाही.. आज विराट समोर आकाश ठेंगणें आहे..सगळे दृश्य भागात नाचत आहेत पण विराटसाठी धोनी एक असा दोस्त बनला आहे.. जो सरणावर जाईपर्यंत गळ्यातला ताईत असेल..❤️ #Kohli
7
66
639
@MarathiDeadpool
डेडपूल...
3 years
शांत स्वभावाची माणसं काळजात वादळ घेऊन फिरत असतात..कमालीचा शांत चेहरा ठेवण्याची ताकद ही त्याच वादळातून येत असावी..जगण्याची जाणिवशहानीव त्यांना असते. शांततेच्या शोधात असलेल्या प्रत्येक जीवाला..आतला गोंगाट सतावत असतोच..त्या गोंगाटाची मेलडी जो रूपांतरीतो..तो शांत होतो..!❤️ #म
14
98
633
@MarathiDeadpool
डेडपूल...
1 month
पुण्यातून शक्य असेल त्यांनी शहर सोडून बाहेर पडणे चांगले..हे शहर आता गावगुंडांचे आगार बनवले आहे.. त्याचे शिल्पकार कोण आहे सगळ्यांस ठाऊक आहेच..❤️ #धन्यवादफडणवीस
11
54
641
@MarathiDeadpool
डेडपूल...
2 years
काळजाला लागतंय हे असलं अनुभवलेलं. साभार- WA #farm
21
94
614
@MarathiDeadpool
डेडपूल...
4 months
यशाला बाप असतो.. आणि अपयश पोरकं..जो ती यशाची वेळ पाळण्यात यशस्वी होतो.. तो निरंतर यशस्वी गणला जातो.. ती वेळ अचूक साधणाऱ्या किंग कोहलीस आदराचा निरोप..❤️ #ViratKohli 𓃵
1
85
625
@MarathiDeadpool
डेडपूल...
3 years
चालताना पायात पाय अडकून पडलेला माणूस..स्वतःवर राग धरत नाही.. हसणाऱ्यावर धरतो..!❤️ #प्रवृत्ती
4
57
603
@MarathiDeadpool
डेडपूल...
3 years
समोरच्याला नाराज न करता नकार देता येणं..खरं स्किल आहे..!❤️ #जगण्याची_रीत #म
11
44
610
@MarathiDeadpool
डेडपूल...
4 months
तीस चेंडू तीस धावा.. ते बारा चेंडू वीस धावा.. हा आहे बुमराहचा क्लास.. त्या क्लासच्या दबावाखाली दबलेल्या दक्षिण आफ्रिकेस परत उठू न देणारे हार्दिक आणि अर्शदीप.. तत्पूर्वी लढवय्या कोहली, कुल अक्षर आणि दुबे यांची समयसूचक खेळी. एकूणच हे सांघिक यश.. भारतीयांना मुबारक..❤️ #INDvSA ‌‌
7
81
590
@MarathiDeadpool
डेडपूल...
2 years
प्रेयसीच्या नाकावरचा राग अलगद टिपता यायला हवा.. त्या लटक्या रागात अहंकार नसतो..असतो तो प्रेमाच्या हक्काचा हक्क.. त्या हक्काला कुरवाळत आपल्या प्रेयसीला रागातून बाहेर काढायला जे परंपरागत कसब असायला लागतं..ते कसब जेंव्हा पणाला लागतं तेंव्हा प्रेमाचा गरबा फेर धरतो..!❤️ #प्रेयसी
22
70
566
@MarathiDeadpool
डेडपूल...
2 years
खानदानी श्रीमंती असलेल्या घराण्यात.. त्या श्रीमंतीसाठी खानदानाच्या प्रत्येक पिढीने खस्ता खाल्लेल्या असतात.. त्यासाठी काही एक कष्ट उपसलेले असतात..म्हणून ती श्रीमंती टिकून असते..अन्यथा त्यातील एक जरी पिढी ऐतखाऊ निपजली तर परंपरागत 'पत' चितपट होऊन जाते.. हा नैसर्गिक नियम आहे.
6
61
575
@MarathiDeadpool
डेडपूल...
2 years
युद्ध करणं सोपं असतं..बुद्ध बनणं अवघड..युद्ध करून वीर बनणं सोपं असतं..महावीर बनणं अवघड. तुमचा खरा कस तेंव्हा लागतो..जेंव्हा बाहेरच्या गोष्टींपेक्षा तुमच्या आतल्या गोष्टी बंड पुकारतात..!❤️ #Pacifism
12
55
577
@MarathiDeadpool
डेडपूल...
2 years
रणांगणात उतरायचं तर राजापेक्षा सेनापती कुशाग्र असावा लागतो..६०-७०ला एशियन पेंट्सने हेच हेरलं.. आणि सुरू झाली कंपनीची Hiring गाथा.. IIM अहमदाबाद, IIM कलकत्ता, IIT मुंबई इ. तून मिळतील ते बौद्धिक मेंदू आपलेसे करायला सुरुवात केली..सगळ्यात मोठ्ठा फायदा झाला कंपनीला याचा..❤️ #म
8
38
576
@MarathiDeadpool
डेडपूल...
2 years
हल्ली बोलणं फार कमी होतं आमचं.. तिला वेळ असतो तेंव्हा मी नेमका कामात असतो.. माझी कामं काही संपत नाहीत..ती संपतात तोपर्यंत तिला झोप येते.. पण फारच समंजस आहे ती.. कधी चिडत नाही माझ्यावर..प्रेम व्यक्त नाही केलं तरी ते ओळखण्याचा सहावा सेन्स आहे तिला..❤️ #Love
36
62
572
@MarathiDeadpool
डेडपूल...
2 years
उघड्या माळावर कुसळं उगवून वाळून जायची..ती खायला जनावरं सुद्धा नसायची..नजर जाईल तिथवर चिटपाखरूही न्हवतं..उघडे डोंगर-माळ ज्यांच्या मालकीचे..ते ही काही करू शकत नव्हते..अशात त्यावर नजर पडली एका बड्या पवनचक्की कंपनीची..आणि एका रातीत लोकांना पैशे ठेवायला नव्या ट्रंका घ्याव्या लागल्या.
38
93
560
@MarathiDeadpool
डेडपूल...
3 years
हक्काचं छत्र असलं की लेकरांचं बालपण कसं सकस असतं..आणि सिंधुताई म्हणजे तर नावातच ताई असलेली आई...लय जीव पोरके झाले. माईला भावपूर्ण श्रद्धांजली..❤️ #आदर #सिंधुताईसपकाळ
16
68
552
@MarathiDeadpool
डेडपूल...
2 years
सिटी स्मार्ट असून उपयोग नाही..तिथं राहणारी माणसं मूर्ख नसायला पाहिजेत..❤️ #पुणे
12
32
551
@MarathiDeadpool
डेडपूल...
2 years
वडिलोपार्जित हिस्सेवारी होऊन दोन्ही भाऊ वेगळे झाले.. मोठा भाऊ नेहमीच उद्यमशीलतेच्या जोरावर सबंध खानदानी बुडक्यात अग्रेसर राहिला. आता हे भिकार लहान भावाला बघवेना..त्याने मोठ्या भावाच्या कुटूंबात 'घरचा भेदी' बनवला..आणि सगळं लुबाडायला सुरवात केली. #TataAirbus
14
58
544
@MarathiDeadpool
डेडपूल...
3 years
स्वराज्याचं स्वप्न मनातून गर्भात उतरवणारी आणि ते संस्कार गर्भातून प्रत्यक्षात छत्रपतींच्या रूपाने जन्मास घालणारी आई..!❤️ जयंतीदिनी विनम्र अभिवादन..❤️ #राजमाताजिजाऊ
7
72
534
@MarathiDeadpool
डेडपूल...
3 years
लांबसडक ओले केस टॉवेलने झाडणे एक कला आहे..ती कला पाहणे म्हणजे नयनसुख. डोक्यावरून न्हालेली ती.. केस हडकायला जेंव्हा ते झाडते.. त्यातले तुषार उन्हाच्या तिरपेत इंद्रधनुष्य तया�� करतात.. प्रातःकाळी उगवलेल्या त्या धनुष्यातून निघणारे रंगीबेरंगी कण अखंड दिवस रंगीत सजवतात..!❤️ #म
30
45
529
@MarathiDeadpool
डेडपूल...
3 years
वडिलांचं प्रेम समजायला लागलं की, आपण समजूतदार होतो..!❤️ #द_आंत्रप्रेन्युअर
0
54
530
@MarathiDeadpool
डेडपूल...
9 months
"मुंबई आपली आहे आणि इथं आवाजही आपलाच पाहिजे.." मराठे आलेले पाहून..मुंबईला हे साहेबांचे वाक्य आठवेल..❤️ #MarathaReservation
0
113
537
@MarathiDeadpool
डेडपूल...
2 years
दिवाळी सरत आली.. उंबरठ्यावर उभं राहून आता माऊलींचे हात निरोपासाठी हलतील.. गाडी सुटताना ओल्या पापण्यांच्या कडा टिपायला पदराची टोकं धावून जातील..नातवंडांच्या चेहऱ्यावर हात फिरत आज्जीची बोटं कडाडा मोडतील..लेकी-सुनांच्या विरहाने राती साऱ्या गलबलून उठतील..❤️ #निरोप
11
49
526
@MarathiDeadpool
डेडपूल...
3 years
दळताना चुकून जात्याच्या बाहेर पडणारं धान्य..म्हणजे ही दहावी नापास लेकरं..केरसुणीने लोटून त्यांना कोणी कचऱ्यात टाकेल..उकिरड्यांवर फेकेल..पण शेवटी आत्मबळाच्या जोरावर तिथंही ते अंकुरतील. पास होऊन जे जात्यात जातील भरडले जातील ते व्यवस्थेत..शिक्षणाच्या, समाजाच्या..!❤️ अपवाद घडतील. #म
23
82
519
@MarathiDeadpool
डेडपूल...
2 years
वारकरी संप्रदायात मानाचा असतो तो विणेकरी..वीणा म्हणजे सकारात्मकतेची वलयांकित तार छेडून नकारात्मकतेस पुरून उरणारी..जगण्याचं बळ पुरवणारी ऊर्जा..माऊलींची विनाअट साद म्हणजे वीणा.. माणसाला माणसासारखं जगवण्याच्या स्पंदनांची गाठ म्हणजे वीणा..वारकरी संप्रदाय म्हणजे ते जगणं..!❤️ #एकादशी
14
63
522
@MarathiDeadpool
डेडपूल...
3 years
माणूस वयाने मोठा होतो..पण त्याला पोक्त बनवतात ते अनुभव..प्रेमातले असोत की वैरातले..बरेवाईट चार अनुभव गाठीशी असले की माणूस तिथून पुढं त्या प्रांतात कसलेल्या मल्लासारखा आखाडा गाजवतो..असा आखाडा गाजवण्याआधी त्याला ते अनुभव रिचवता यायला हवेत..ते रिचवणं म्हणजेच आयुष्य असतं..!❤️ #म
9
51
513
@MarathiDeadpool
डेडपूल...
1 year
माणसाकडे दोन पै कमी असले तरी चालतील.. पण शारीरिक स्वास्थ्य हे गुंजभरही कमी असू नये.. घराच्या चार भिंतीत राहणारे जीव एकजीव बनून रहात असतात.. त्यातील एका जरी जीवाची तब्येत बिघडली तरी सगळं कुटुंब सलाईनवर जातं..❤️ #जगण्याची_रीत
8
80
511
@MarathiDeadpool
डेडपूल...
2 years
राबणाऱ्या बैल जोडीने एकमेकांवर आकस ठेवून चालत नाही..एका जू ला बांधले गेल्यावर दोघांची वेसण एकत्रित परिणाम करते..मित्रत्वाचं जू ही तसंच असतं..ते कावड म्हणून एकदा का खांद्यावर घेतलं..की, तहहयात त्याचे परिणाम आयुष्यावर होतात..ती मैत्री म्हणजे प्रेमाची आद्य शाळा..!❤️ #मैत्रीदिन
15
78
516
@MarathiDeadpool
डेडपूल...
2 years
भुकेल्या माणसांच्या भाकरीचा प्रश्न सोडवणाऱ्या हाडाच्या कर्मवीरास जन्मदिनी विनम्र अभिवादन..❤️ #कर्मवीरभाऊरावपाटील
3
57
512
@MarathiDeadpool
डेडपूल...
2 years
कोणी पेन घेऊन वहीवर सरावाने सायकल शिकू शकत नाही..त्यासाठी सडकला ढोपरं फोडून घेण्याशिवाय पर्याय नसतो..शेअर बाजार उभा कसा राहतो हे शिकण्या अगोदर तो पडतो कसा..? हे शिकण्याचा हा काळ..!❤️ #शेअरबाजार
9
40
507
@MarathiDeadpool
डेडपूल...
3 years
लहान लेकरांना मोकळीक दिली तर ते पंगतीत मीठही दोनदा वाढतात..!❤️ #म
14
18
496
@MarathiDeadpool
डेडपूल...
2 years
डाळीच्या पिठात कालवलेली कांदा मिरची कोथिंबीर.. आईच्या उबदार हाताने अबदारी थापलेले धपाटे म्हणजे.. श्रावणाच्या पूर्वसंध्येला ओझरत्या सरींनी चिंब भिजलेल्या गार जीवाला लाभलेली ऊब..त्या उबेची गरम थाळी चहाच्या घोटासोबत रिचवताना आईची माया पोटासोबत काळजाचंही भरण करते..!❤️ #सुगरण
12
45
498
@MarathiDeadpool
डेडपूल...
2 years
स्टार्चच्या व्हाइट कॉलर कुर्त्यांच्या भाऊगर्दीत..जेंटलमनचा उठून दिसणारा फॉर्मल Tuck in म्हणजे उद्धव ठाकरे..❤️ #HappyBirthdayUddhavThackeray
5
38
501
@MarathiDeadpool
डेडपूल...
3 years
सरकारने कुठलाही बदल न करता ठरलेल्या वेळेत ऑफलाईन परीक्षा घ्यावी..मग आंदोलन वगैरे कितीही तापलं तरी बळाचा वापर करून ते दिडदमडीच्या भाऊसहित मोडीत काढावं. म्हातारी मेली याचं दुःख नाही..काळ सोकावतोय ते पहायला हवं..!❤️ #म
9
44
493
@MarathiDeadpool
डेडपूल...
8 months
सर्फराज ज्या उबदार आत्मीयतेने Cap चा स्पर्श वडील आणि बायकोला घडवतो आहे.. ते पाहता या क्षणाची किती गरज आणि आतुरता त्या कुटुंबाच्या मनात असेल.. एक सहृदयी माणूसच ते जाणून घेऊ शकेल..❤️ #आदर
2
46
498
@MarathiDeadpool
डेडपूल...
2 years
अंबानी जे जे म्हणून काही मोफत देतो..त्याची सव्याज परतफेड जवळपास प्रत्येकाला करायला लागते..हा इतिहास आहे. अलीकडचं ताजं उदाहरण म्हणजे..पूर्वी सिमकार्ड विनामूल्य सुरू रहात असे..त्याने फ्री जिओ आणले..आता फक्त सिम सुरू ठेवण्यासाठी सर्वांना कमीतकमी ९९₹/महिना भरावेच लागतात..❤️ #streem
32
37
490
@MarathiDeadpool
डेडपूल...
2 years
चहाच्या तळाला गेलेला खारीचा पापुद्रा चहाची सांगता आणखी गोड करतो..फक्त माणसाला कसलीही बूज न ठेवता..तो पापुद्रा काढून खाता यायला हवा..❤️ #जगण्याची_रीत
17
25
495
@MarathiDeadpool
डेडपूल...
2 years
पराभवाची जखम कितीही गहिरी असली तरी ती कोणापुढे बोलून दाखवायची नाही..आणि विसरायचीही नाही.. शत्रूच्या सैन्यापेक्षा आपल्यातले फितूर आपल्याला वरचढ ठरले ते ओळखून नवा मार्ग नव्या आखणीने निवडायचा..कोणासाठीही यश अमर नसतं आणि अपयश कायमचं नसतं..❤️ #ग्रामपंचायतनिवडणूक
6
61
492
@MarathiDeadpool
डेडपूल...
2 years
कसोटीकाळी तत्वशील जगण्याचं बळ देणारे छत्रपती..ही ताकद आहे आयुष्यभर कणखर मायेने स्वराज्य जपल्याची..प्रसंगी जीवाचा कौल लावून प्रजेस सुखरूप ठेवल्याची..स्वातंत्र्याचा श्वास देऊन शास्त्रशुद्ध संयमी जगण्याची उमेद देणाऱ्या मराठी मनाच्या मानबिंदूस जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..❤️ #छत्रपती
15
99
493
@MarathiDeadpool
डेडपूल...
3 years
एअरटेलने रिचार्जवर prime ऐवजी Kindle सबस्क्रिप्शन महिनाभर फ्री द्यायला हवं..!❤️ @Airtel_Presence
8
17
485
@MarathiDeadpool
डेडपूल...
2 years
पाळण्यातल्या लेकराला कपड्यांची चॉईस असण्याची शक्यता नाही..आईने जे घातलं तेच फायनल..❤️ #BKCDussehraMelava
11
38
486
@MarathiDeadpool
डेडपूल...
2 years
काल वारकऱ्यांचे कैवारी असल्याचा व्हिडीओ व्हायरल केला.. आज १०१ ते ३०० युनिटमध्ये १४५₹ ची वीज दरवाढ केली..❤️ #महाराष्ट्र
6
46
486
@MarathiDeadpool
डेडपूल...
2 years
नव्या कोऱ्या पुस्तकाचा कोरा करकरीत सुगंध..पहिल्या ओळीतला खोल ज्ञानार्थी तळ ते शेवटच्या वाक्यातला विश्वासमूलक शेवट..एका पुस्तकाचा हा साग्रसुगंधित प्रवास माणसाला विलक्षण मुरलेला वाटाड्या बनवतो.. अशा अनेक वाटा जिथं येऊन मिळतात..तिथून सुरू होतो..जगण्याचा सुवासिक राजमार्ग..!❤️ #पुस्तक
23
48
481
@MarathiDeadpool
डेडपूल...
2 years
कोणतंही पुस्तक पहिल्या वाचनात पानांचा सुगंध देतं.. दुसऱ्या वाचनात त्याचा गंध वाचकाला कळतो.. कोणतंही पुस्तक दोनदा वाचल्यावर..तेच पुस्तक नव्याने गवसतं..!❤️ #HappyReading
4
36
476
@MarathiDeadpool
डेडपूल...
3 years
हळद दळताना जात्यावरची गाणी, बारसं घालतानाचा पाळणा, जात्यावरच्या ओव्या, रवीने दही घुसळत लोणी काढताना म्हणली जाणारी गाणी..नवी नवरी गृहप्रवेश करतानाची गाणी.. विशेष म्हणजे ही सगळी कला स्त्रियांनी जपली आहे.. जगली आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील ही खरी संपत्ती आहे..!❤️ #मराठी
8
51
464
@MarathiDeadpool
डेडपूल...
2 years
हा मेसेज द्यायला UPSC सारखी व्यवस्था उभी करणारा भारत पहिला देश आहे..!❤️
@gpupadhyaya
G P Upadhyaya, IAS
2 years
ऐसे लोगों से मोल भाव नहीं करना चाहिए॥ ये केवल दो वक़्त की रोटी मिल जाये इसलिये बेचते हैं ! 🙏🙏🙏
Tweet media one
1K
7K
63K
19
32
471
@MarathiDeadpool
डेडपूल...
2 years
पोलादी ताकदीचा पण मेणासारख्या मऊ मनाचा.. माणूसाला माणूस म्हणून जगण्यासाठी आदर्श वातावरण तयार करणारा राजा. असा राजा माणूस तयार करण्याचं शिवधनुष्य पेलणाऱ्या आईस.. जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..❤️ #जिजाऊ
7
65
473
@MarathiDeadpool
डेडपूल...
2 years
महिन्यातून एक दोन वेळा हा कार्यक्रम असतोच आपला..😄❤️
19
26
471
@MarathiDeadpool
डेडपूल...
3 years
सर्वोच्च पदावरील व्यक्ती थट्टेचा विषय होणे ही साधी बाब नाही..त्या व्यक्तीने त्या पदाची गरीमा जपली नाही.. उठसुठ निवडणुकीय सभा गाजवण्याच्या हौसेला मेंदूस ताण द्यावा लागत नाही..पण त्यास ताण देऊन खरे म्हणावेत असे चार शब्द बोलता न येणं यातच सगळं आलं. #Teleprompter
12
54
468
@MarathiDeadpool
डेडपूल...
2 years
तिच्या गर्भाची सुरक्षा..ती तिच्या पदराने आयुष्यभर पुरवते.. तिच्या खोचलेल्या पदराने लढायला दहा हत्तीचं बळ ती सहज पुरवते..लेकरांच्या संगोपणासाठी आपला भरजरी पदर काटकसरीने तडीस नेणारी आई..चेहरा ओंजळीत घेऊन मन भरेपर्यंत ओठांचे ठसे लेकरावर बरसवणारी ती म्हणजे सुखाचा जरतारी पदर..!❤️ #आई
11
76
469
@MarathiDeadpool
डेडपूल...
3 years
प्रेयसी म्हणजे चैत्रातल्या उन्हानंतर तिन्हीसांजेला बरसणाऱ्या पावसाची आल्हाददायक सरी..!❤️ #म
10
42
458
@MarathiDeadpool
डेडपूल...
1 year
'नावं ठेवण्यापलीकडे' कर्तृत्व नसलं की मग ते 'कमावण्याचा' प्रश्नच येत नाही.. मग उरतो तो मार्ग 'नावं बदलण्याचा'..❤️ #इंडिया
8
88
462
@MarathiDeadpool
डेडपूल...
2 years
तिकडं ऐरावत नंतर अंबारी आली..आणि इथं पगाराला पैसे नाहीत..❤️
@KSRTC_Journeys
KSRTC
2 years
Ambaari Utsava Buses Test Drive
61
187
3K
24
38
459
@MarathiDeadpool
डेडपूल...
3 years
पुरुषाचं मन म्हणजे आडमार्गावरचं गाव..जिथं दिवाबत्तीची सोय नाही की टपालाची..दिवसाच्या उजेडात उजळून निघणारी वेशीवरची बुरुजं आतल्या मौल्यवान ठेवीसाठी गस्त घालत असतात..रात्रीच्या अंधारात निघणारी विचारांची टेहळणी डोळ्याला डोळा लागून देत नाही. उबेसाठी राख होणारी थंडीतली शेकोटी..!❤️ #म
27
65
459
@MarathiDeadpool
डेडपूल...
2 years
राज ठाकरेंची ही कुस बदल त्यांना दीर्घकालीन झोपवू शकेल..!❤️ #राजकीय
12
8
459
@MarathiDeadpool
डेडपूल...
3 years
सांज रातीला पडक्या वाड्याच्या पल्याड भिंतीला निवाळसंग तलावाची छबी नाकासमोर ठेवत ती बसलेली असायची..तलावावरचा धुंद वाऱ्याचा झोत..अदबशीर होऊन तिच्या मोकळ्या केसांना बटेसहित कुरवाळायचा.. त्याला यायला नेहमीचा उशीर असायचा यावर तिची लालबुंद नाकाची धार शीतल वातावरणात चमकून उठायची. #म
33
83
452
@MarathiDeadpool
डेडपूल...
3 years
केसांत माळलेला गजरा कधीतरी कोमेजनारच असतो..तो आहे, तोपर्यंत सुगंध दरवळत ठेवतो.. त्यानंतरही दरवळत राहतं ते प्रेम..!❤️ #म
12
40
455
@MarathiDeadpool
डेडपूल...
3 years
तांदळाच्या तुलनेत मक्का पिकास पाचपट कमी पाणी लागतं.. तांदळाच्या तुलनेत इतर पिकास लागणारी इनपुट कॉस्टही कमी आहे.. तरीही शेतकरी तांदळाचं उत्पादन घेतात..₹ तीनेक लाख खर्चून बोअरवेलची सोय करतात.. हे सगळं का आणि कशासाठी? तर MSP बाबत भातास आणि गव्हास असलेली कडेकोट व्यवस्था. #म #थ्रेड
19
72
453
@MarathiDeadpool
डेडपूल...
3 years
झाड आपण लावलं म्हणून फुलांवर हक्क सांगायचा नसतो.. ते देईल तेवढा सुगंध अनुभवणं एवढंच इतिकर्तव्य असावं..!❤️ #म
6
41
444
@MarathiDeadpool
डेडपूल...
3 years
नारळ आणि मुलगा कसा निघेल सांगता येत नाही म्हणणारे.. चांगला निघाला की हक्क सांगायला पुढं येतात..!❤️ #म
8
36
448
@MarathiDeadpool
डेडपूल...
2 months
फारच प्रेरणादायी आहे हे सगळं..❤️ #Paralympics
6
58
456
@MarathiDeadpool
डेडपूल...
2 years
मुघल गार्डन = अमृत गार्डन i.e. मुघल काळ = अमृतकाल अमृतकाल = मोदी काळ So, मोदी काळ = मुघल काळ..❤️
25
29
443
@MarathiDeadpool
डेडपूल...
2 years
माणसाकडे फक्त Power असून उपयोग नसतो.. ती योग्य ठिकाणी लावायची अंगभूत उर्मीही असावी लागते.. इतिहासाच्या क्षितिजावर छत्रपती राजर्षी शाहू महाराज या आघाडीवर वेगळेपणाने चमकून उठतात.. माणसाला माणूसपण बहाल करणाऱ्या..आपल्या राजाला मानाचा मुजरा..!❤️ #शाहूवंदन #शाहूस्मृतीशताब्दी
3
65
442
@MarathiDeadpool
डेडपूल...
2 years
हवामान खात्याने अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्यावरच पाऊस शांत झाला..!❤️
12
12
438
@MarathiDeadpool
डेडपूल...
3 years
सिंहाला आपल्या जाण्याची काळजी नसते.. गड जाऊ न देणं हे त्याच्या जगण्याचं फलित केंव्हाच ठरलेलं असतं..!❤️ एकमेवाद्वितीय नरवीर तानाजी मालुसरे..!❤️ #तानाजीमालुसरे
1
43
438
@MarathiDeadpool
डेडपूल...
4 years
सध्या #ReopenJusticeLoyaCase हा ट्रेंड सुरुय.. नेमकं प्रकरण काय लक्षात घ्या. ◆ कोण न्यायमूर्ती ब्रिजगोपाल लोया? घटना 1 डिसेंबर 2014 ची तेंव्हा जस्टीस लोया नागपूरला एका लग्नकार्यासाठी गेले असताना त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची बातमी आली. #धागा #म 👇
Tweet media one
8
127
432
@MarathiDeadpool
डेडपूल...
2 years
आयोगाने परीक्षा न घेता आता नियमित दहीहंडी आयोजनासाठी तयारीस लागावे..❤️
@News18lokmat
News18Lokmat
2 years
राज्य सरकारने गोविंदा पथकांना सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आमचा विरोध आहे. - शर्मिला येवले (विद्यार्थी प्रतिनिधी)
63
143
1K
10
57
436
@MarathiDeadpool
डेडपूल...
2 years
तुकाराम बीज निमित्ताने रात्री एक कीर्तन ऐकलं.. किर्तनाकाराच्या तोंडी तीस टक्के पेक्षा जास्त वाक्ये व्हाट्सएप इन्स्टादी रिल्स मधील होती.. श्रोतेही त्यावर हमसून 'हॅशटॅग-कडक' समजून टाळ्या बडवायचे.. वारकरी संप्रदायाने याचा विचार करायला हवा..❤️
18
33
437
@MarathiDeadpool
डेडपूल...
3 years
फिल्टरने photo चांगला होतो.. image नाही..!❤️ #म
13
41
428
@MarathiDeadpool
डेडपूल...
3 years
कोणी कितीही 'काळजी घ्या..टेक केअर' म्हनलं तरी.. बहिणीनं सासरी जाताना मागे वळून माहेरच्यांना 'काळजी घ्या' म्हणल्याची सर कशालाच नाही.. काळीज..!❤️ #बहीण #म
5
36
430
@MarathiDeadpool
डेडपूल...
2 years
प्रियसीचा विरह वळवाच्या पावसासारखा असतो..ती उबळ कधी येईल नियम नाही.. आल्यावर किती भरून येईल सांगू शकत नाही.. बरसताना किती बरसेल ठाऊक नसतं.. पण त्यानंतरचा गारवा..आधीची सगळी बाकी चुकती करतो..!❤️ #पार्टनर
8
41
433
@MarathiDeadpool
डेडपूल...
2 years
'झालो तर कळस..नाहीतर पायाचा दगड होईन..' मुंबईने ही उक्ती फारच मनावर घेतली..!❤️ #MI
3
17
417
@MarathiDeadpool
डेडपूल...
1 year
शरद बहरला की अंगणी चांदण्यांचा सडा पडतो..ती नव्याची नांदी असते..❤️ #शरद
4
34
432
@MarathiDeadpool
डेडपूल...
9 months
अशोकचा कधी अशोकराव झाला नाही.. तो रसिकांसाठी अशोक सराफच राहिला.. याची पोचपावती म्हणजे आजचा हा पुरस्कार..❤️ #महाराष्ट्रभूषण
1
34
429
@MarathiDeadpool
डेडपूल...
2 years
जिल्हा परिषद मराठी शाळा टिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.. आपली लेकरं माळावर इंग्लिश स्कुलमध्ये शिकणार आणि आपण शाळा मराठी टिकायला हवी म्हणणार.. हे दोन्ही एकत्र होऊ शकत नाही..कळावे..❤️ #शाळाबंदी_मागे_घ्या
9
101
427
@MarathiDeadpool
डेडपूल...
3 years
महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले..!❤️ #AppreciationTweet #शिवजन्मोत्सव
5
32
418
@MarathiDeadpool
डेडपूल...
2 years
थट्टेचा विषय बनवला गेल्यावरही हुकूमशाही प्रवृत्ती विरोधात ठामपणे उभे राहणाऱ्या भारताच्या आशादायी लोकशाहीवादी नेतृत्वास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!❤️ #राहुलगांधी
3
40
430
@MarathiDeadpool
डेडपूल...
2 years
चतकोर भाकरी जास्तच जाते अशावेळी..कळत नाही आई सुगरण आहे की ती सुगरणींचीही आई आहे..पहाटे कोंबडा आरवायच्या दोन घटका अगोदरपासूनच स्वयंपाक घरातून फोडणीचा दरवळ आणि काठवटीत बाजरीच्या कणकेवर पडणारी गोलाकार थाप..शेवटी पक्वान्नाचं यज्ञकर्म..सगळं कसं पद्धतशीरपणे..आईसाठी एक मिठी..❤️ #आई
12
48
429
@MarathiDeadpool
डेडपूल...
2 years
राहुल गांधी योग्य मुद्दे उचलत आहेत..महागाई हा मुद्दा असताना.. किलो ऐवजी लिटर बोलल्याने तमामांना हसू फुटत असेल आणि त्यालाच नेम धरत असतील तर प्रकरण किती हाताबाहेर गेलंय हे सिद्ध आहे..असो. घरच फिरलंय म्हणल्यावर वास्यांनी तरी कुठवर ताटकळत लटकून रहायचं..?❤️ #RahulGandhi
10
37
422