ravikantvarpe Profile Banner
Ravikant Varpe रविकांत वरपे Profile
Ravikant Varpe रविकांत वरपे

@ravikantvarpe

Followers
19K
Following
38K
Statuses
18K

State SpokesPerson - NCP | State Working President - NCP Youth | Politician |

Pune, India
Joined October 2011
Don't wanna be here? Send us removal request.
@ravikantvarpe
Ravikant Varpe रविकांत वरपे
1 day
आम आदमी पक्ष आणि काँग्रेस या समविचारी पक्षाने स्वतंत्र लढल्याने भाजपचा फायदा झाला. दिल्ली विधानसभा निवडणूक हा इंडिया आघाडीसाठी धडा आहे. असो दिल्लीच्या जनतेला दिलेली वचन भाजपने पूर्ण करावीत. इंडिया आघाडी आपली चूक आता तरी सुधारेल का? #indiaalliance #DelhiElections2025 #DelhiAssemblyElection2025
1
1
12
@ravikantvarpe
Ravikant Varpe रविकांत वरपे
1 day
स्वातंत्रोत्तर काळात देशातील शिक्षण क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी मोलाचे योगदान दिले. माजी राष्ट्रपती, थोर स्वातंत्र्यसेनानी भारतरत्न डॉ.झाकीर हुसेन जी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..! #ZakirHussain #जयंती #अभिवादन
Tweet media one
0
0
3
@ravikantvarpe
Ravikant Varpe रविकांत वरपे
2 days
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात 4 वर्षीय चिमुकलीवर झालेला अमानुष बलात्कार आणि खून ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. आपल्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था याचे धिंडवडे निघत आहेत. राज्यात खरंच महिला भगिनी सुरक्षित आहेत का? हा प्रश्न जनतेला पडलाय. राज्याला देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने बेजबाबदार गृहमंत्री लाभले आणि महिला सुरक्षा, महिला अत्याचार हा ऐरणीवर आलेला विषय आहे. राज्याचे मुख्यमंत्री पद सांभाळताना हे गृहमंत्री असल्याचा विसर पडलेला दिसतोय. बेजबाबदार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देऊन मुख्यमंत्री पद सांभाळावं... #निष्क्रिय_गृहमंत्री #DevendraFadnavis #महाराष्ट्र #महिला_अत्याचार @NCPspeaks @Dev_Fadnavis @TV9Marathi @mumbaitak @thodkyaat @abpmajhatv @News18lokmat @SakalMediaNews @pudharionline
0
2
5
@ravikantvarpe
Ravikant Varpe रविकांत वरपे
2 days
लाडकी बहिण म्हणले आणि मतदाननंतर याच बहिणींना विसरले..! महाराष्ट्रातील 5 लाख लाडक्या बहिणींना आता लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. स्वतःच्या फायद्यासाठी निवडणुकीच्या वेळी मतदान मिळावे यासाठी सरसकट योजनेचा लाभ घेता येणार असल्याचे म्हटले मात्र आता या योजनेवर अनेक निकष लावून बहिणींना अपात्र करत आहेत. स्वताच्या फायद्यासाठी महायुती सरकारने महिला भगिनींना आमिष दाखवून मतदान घेतले आणि आता त्यांना वाऱ्यावर सोडण्याचे काम राज्य सरकारने चालु केलं आहे... #स्वार्थी #भाजप #महायुती @NCPspeaks @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde @TV9Marathi @abpmajhatv @mumbaitak @thodkyaat @News18lokmat
0
2
4
@ravikantvarpe
Ravikant Varpe रविकांत वरपे
2 days
एकीकडे राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी महायुतीचे सरकार कोट्यावधी रुपये खर्चाला मान्यता दिली तर अनेक महत्त्वाच्या सर्व सामान्यांसाठी उपयुक्त असणाऱ्या योजनांना कात्री देण्याचं काम सरकार करत असल्याचं दिसत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर योजनांचा भडिमार करून जनतेची फसवणूक केली आणि आता याच योजना बंद केल्या जात आहे. निवडणुकीत स्वतःची पोळी भाजली की जनतेला वाऱ्यावर सोडायचं ही भाजपनीतीच आहे... #योजना #निष्क्रिय_सरकार #आनंदाचाशिधा #शिवभोजनथाळी @NCPspeaks @Dev_Fadnavis @mieknathshinde
Tweet media one
0
1
3
@ravikantvarpe
Ravikant Varpe रविकांत वरपे
2 days
वाढदिवस अभिष्टचिंतन! काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते राज्याचे माजी मंत्री मा.श्री. बाळासाहेबजी थोरात साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्याला उत्तम आणि दैदिप्यमान दीर्घायुष्य प्राप्त होवो, हीच सदिच्छा..! #बाळासाहेब_थोरात #HBD @bb_thorat
Tweet media one
0
0
3
@ravikantvarpe
Ravikant Varpe रविकांत वरपे
3 days
महानुभाव पंथाचे संस्थापक, थोर समाजसुधारक, तत्त्वज्ञ , अहिंसेचे पुरस्कर्ते श्री.चक्रधर स्वामी यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन..! #चक्रधरस्वामी
Tweet media one
1
0
1
@ravikantvarpe
Ravikant Varpe रविकांत वरपे
3 days
त्यागाची मूर्ती, महात्म्याचा आधार असलेल्या वंदनीय माता रमाई आंबेडकर यांना जयंती निमित्त कोटी कोटी नमन..! #माता_रमाई
Tweet media one
1
0
3
@ravikantvarpe
Ravikant Varpe रविकांत वरपे
3 days
महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यातील कष्टकरी श्रमिक व सर्वसामान्य जनतेसाठी शिव भोजन ही महत्त्वाकांक्षी योजना सरकारने राबवली होती. आता राज्यातील हे महायुती सरकार ही योजना गुंडाळणाऱ असल्याचे सांगण्यात येत आहे. निवडणुका जिंकण्यासाठी या सरकारने विधानसभेपूर्वी घोषणा केल्या मात्र आता आर्थिक भार सोसावत नसल्याने शिवभोजन सारखी महत्त्वाची योजना बंद करण्याचा घाट घालत आहेत. महाविकास आघाडीचे सरकार हे महाराष्ट्र हिताचे सरकार होते पण महायुती सरकार हे फक्त निवडणुका जिंकणे आणि महाराष्ट्राचे अधपतन करणे हाच त्यांचा उद्देश आहे. #MVA #महायुती #योजना @NCPspeaks @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde @TV9Marathi @abpmajhatv @thodkyaat @mumbaitak
Tweet media one
0
2
3
@ravikantvarpe
Ravikant Varpe रविकांत वरपे
3 days
भावपूर्ण श्रद्धांजली! क्रिकेट विश्लेषणाचा एक महान आवाज हरपला. द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाने मराठी क्रीडा पत्रकारितेतील मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. #भावपूर्ण_श्रद्धांजली
0
0
0
@ravikantvarpe
Ravikant Varpe रविकांत वरपे
3 days
महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वच लोक स्व. आर. आर. पाटील (आबा) किंवा माजी गृहमंत्री अनिल देशमुख साहेब यांचे सारखे नैतिकता असलेले नसतात..! #नैतिकता #महाराष्ट्र #राजकारण @NCPspeaks @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde @TV9Marathi @abpmajhatv @thodkyaat @mumbaitak @pudharionline @SakalMediaNews @News18lokmat
0
2
38
@ravikantvarpe
Ravikant Varpe रविकांत वरपे
3 days
अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या भारतीयांना अमेरिकेने अपमानजनक वागणूक देत हात, पायाला कैदी असल्यासारखी कडी बांधून लष्कराच्या विमानातून भारतात आणले गेले.अमेरिकेने भारतीयांना दिलेली ही वागणूक मीडिया आणि विश्वगुरूला दिसत नाही का? लष्कराचे विमान जर भारतात उतरत असेल तर हा अमेरिकेचा भारताला दिलेला इशारा समजावा का? कोलंबिया सारख्या छोट्या देशाने अमेरिकेचे सैनिकी विमान त्यांच्या देशात उतरण्यास नकार दिला मात्र स्वतःला विश्र्वगुरू म्हणून पाठ थोपटून घेणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मात्र नेहमीप्रमाणे गप्प राहिले. गोदी मीडिया ला आता हा अपमानजनक प्रकार दिसत नसावा का? आपल्या देशातील नागरिकांना जर असे कैदी असल्यासारखी वागणूक देऊन जर सैनिकाच्या विमानाने भारतात आणले जात असेल तर यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भूमिका काय? हे त्यांच्या नेत्यांनी स्पष्ट करावे.. मागील ७० वर्षात भारताला कोणत्याही देशाने अपमानास्पद वागणूक दिली नाही ती या गेल्या 10 - 12 वर्षात दिली गेली. #अमृत_काल #modigovernment @NCPspeaks @PawarSpeaks @supriya_sule @narendramodi @AmitShah
Tweet media one
Tweet media two
0
0
0
@ravikantvarpe
Ravikant Varpe रविकांत वरपे
3 days
आपल्या सुमधुर स्वरांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन ! #लता_मंगेशकर #LataMangeshkar #पुण्यतिथी #अभिवादन
Tweet media one
0
0
0
@ravikantvarpe
Ravikant Varpe रविकांत वरपे
4 days
भाजपनं ज्या जिल्ह्यात स्वतःच्या पक्षाचा पालकमंत्री नाही,तिथे संपर्कप्रमुख या पदाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतलाय. सहपालकमंत्री पदानंतर संपर्क प्रमुख पदाचा अजून एक पायंडा कशासाठी पडला? महायुती मधील दोन्ही मित्र पक्षावर लक्ष ठेवण्यासाठी हा पायंडा पाडला असावा का? एक एक वेगवेगळी पदे नेमून मित्र पक्षाला संपवण्याचा घाट घालत असल्याचं आता दिसून येतंय.. मित्र पक्षांनी आता तरी वेळीच सावध व्हायला हवं.. #अविश्वास #भाजप @NCPspeaks @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde @TV9Marathi @mumbaitak @thodkyaat @News18lokmat @pudharionline @SakalMediaNews
0
0
1
@ravikantvarpe
Ravikant Varpe रविकांत वरपे
4 days
भावपूर्ण श्रद्धांजली..! संत तुकाराम महाराजांचे वंशज, ह.भ.प शिरीष महाराज मोरे यांचे आज आकस्मित निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक आणि मनाला वेदना देणारी आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.! #भावपूर्णश्रद्धांजली
Tweet media one
1
0
0
@ravikantvarpe
Ravikant Varpe रविकांत वरपे
5 days
कार्यकर्ता विश्वासाचा युवकांच्या हक्काचा..! #ravikantvarpe #youth #youthicon #inspiration #ncpsp #pune
1
1
7
@ravikantvarpe
Ravikant Varpe रविकांत वरपे
5 days
आदरणीय शरद पवार साहेबांनी राजकारणा बरोबरच क्रीडा क्षेत्रात देखील भरीव योगदान दिले आहे. आदरणीय पवार साहेबांनी खेळाडूंना न्याय देण्याची भूमिका घेतली साहेब कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष असतांना कुस्ती क्षेत्राला कधीही गालबोट लागू दिले नाही. कुस्ती निःपक्षपाती पणे झाली पाहिजे असा नेहमीच साहेबांचा आग्रह राहिला होता. त्यामुळे क्रीडा क्षेत्राला उच्च पातळीवर नेण्यासाठी व महाराष्ट्रातील खेळाडूंना योग्य मान सन्मान व न्याय देण्यासाठी आदरणीय पवार साहेबांनी क्रीडा क्षेत्रात देखील आवश्यक बदल केले. #sharadpawar #क्रिडा @NCPspeaks @PawarSpeaks
0
0
1
@ravikantvarpe
Ravikant Varpe रविकांत वरपे
5 days
एखाद्या अभिनेत्याला लोकांनी किंमत देणे बंद केले की काही लोक माती खातात आणि स्वतःची प्रसिद्धी मिळवतात. असेच काही तरी RSS च्या मुशीत तयार झालेल्या अक्कल शुन्य अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची कीर्ती सर्वत्र आहे याची खंत काही विचारसरणीला आहे म्हणून राहुल सोलापूकर सारखे वाचाळवीर लोकं सोडले आहेत. छत्रपतींच्या व्यक्तिमत्त्वाचा द्वेष करून त्यांच्या कर्तुत्वावर शंका निर्माण करणाऱ्या राहुल सोलापूरकर यांचा जाहीर निषेध... #निषेध #rahulsolapurkar @NCPspeaks
0
1
2