Tulsidas Bhoite Profile Banner
Tulsidas Bhoite Profile
Tulsidas Bhoite

@TulsidasBhoite

Followers
47,558
Following
1,851
Media
5,082
Statuses
34,579

Sr. Executive Editor #पुढारीन्यूज #PudhariNews channel / Journalist / Earlier @Muktpeeth #AbpMajha #Zee24Taas #TV9 #MeeMarathi M 9833794961 tulsidasv @gmail .com

Mumbai, Maharashtra, India
Joined September 2009
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
1 day
#अभिजात_मराठी महानुभावांच्या लीळाचरित्राची ज्ञानोबांच्या पसायदानाची तुकोबांच्या रसाळ अभंगांची शिवछत्रपतींच्या पराक्रमाची वारकऱ्यांच्या पुरोगामी परंपरेची कातळात सौंदर्य फुलवत्या घामाची सह्याद्रीत घुमणाऱ्या वाऱ्याची किनाऱ्यावर धडकणाऱ्या लाटांची शिलालेखी डिजिटली सर्वोत्तम सृजनाची
Tweet media one
1
5
37
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
2 years
#सरळस्पष्ट पदावरून जाणं हे उद्धव ठाकरेंसारखं असावं, चांगला माणूस पदावरून गेल्यानं, समविचारी नसणाऱ्यांपैकीही अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारं! पदावरून जाणं हे भगत सिंग कोश्यारींसारखं नसावं, विरोधकांनाच नाही, तर समविचारींनाही ब्याद गेल्याच्या आनंदानं हसू आणणारं! तुमचं मत काय?
Tweet media one
211
426
3K
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
4 years
धन्यवाद टीम @TV9Marathi ! एक वेगळा निरोप. अल्पावधीतच घट्ट जुळलेलं नातं. कोरोना संकटात अधिकच मजबूत झालेलं. सोडून पुढे निघताना सहकाऱ्यांनी दिलेला निरोप भारावणारा. सोडताना पुढचं नक्की ठरवलेलं नाही. एक नक्की...पत्रकारितेतच असेन...जे करेन ते चांगलंच असेल!
153
63
2K
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
2 years
अर्जून खोतकरांवर ईडीची कारवाई सुरु झाली. शनिवारी त्यांनी शिवसेना सोडली. शांत झोपण्याचा हर्षवर्धन पाटील फॉर्म्युलाच मांडला! शिवसेना सोडली की ईडीही सोडत असावी! आता शिवसेना नेते @rautsanjay61 यांच्या घरी ईडी कारवाई करत आहे! त्यांचा शिवसेना सोडणार नसल्याचा निर्धार! मग ईडी कशी सोडणार?
40
129
1K
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
4 years
अभिमान मराठी कलाकारांचा! कमी मानधन, तरीही अभिनय, चित्रपट दर्जा हा शंभरपट जास्त मानधन घेणाऱ्या अनेक हिंदी कलाकारांपेक्षाही चांगला असतो! @Avadhutwaghbjp खरं स्टेटस हे मर्सिडिज, बिझनेस क्लास तिकिटाने नाही गुणवत्तेनं ठरतं! मेहनतीच्या पैशांवर जगणाऱ्या स्कुटी-पासवाल्यांना हिणवू नका!
Tweet media one
113
207
1K
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
1 year
ज्यांना राहुल गांधींचा एक फ्लाइंग किस खुपला त्यांना मणिपूरमधील बहिणींची विवस्त्र धिंड काढत झालेले अत्याचार का पेटवून गेले नसतील? बुलडोझरच नाही तर रणगाडे जरी त्या नराधमांचा नामर्दपणा चिरडण्यासाठी वापरले असते तरी कमीच होते! #मणिपूर #Manipur #सरळस्पष्ट
Tweet media one
31
248
1K
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
5 years
🌸 एक नवी सुरुवात. टीम @TV9Marathi सोबत. वरिष्ठ कार्यकारी संपादकपदाची नवी जबाबदारी. मराठी माणसांच्या हक्कासाठी लढणाऱ्या या न्यूज चॅनलशी माझं नातं जुनंच. आता हा लढा आणखी पुढे नेण्यासाठी प्रयत्न. हक्कानं सूचना करा. साथ होतीच. साथ आहेच. साथ सदैव असू द्या! tulsidasv @gmail .com 🌸
Tweet media one
314
73
958
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
2 years
#भारतजोडोयात्रा रात्रीचे साडेअकरा वाजून गेले, तरीही हा माणूस चालतोय. एक नवी आशा जागवतोय. चौफेर दाटलेल्या अंधारातून मार्ग काढत ध्येय गाठण्याचं बळ राहुल गांधी यांना मिळत राहावं! या प्रयत्नांचीही थट्टा करणाऱ्यांना, या नेत्याला मिळणारी साथ वाढत गेली तर काय, अशी भीती भेडसावत असावी!
Tweet media one
Tweet media two
88
112
919
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
1 year
नवनाथराव, रश्मी आणि तुम्ही दोघेही माझे सहकारी होता. त्या आपुलकीतून एक विनंती. पद येतं, पद जातं. शाश्वत काहीच नसतं. फक्त बदल हेच शाश्वत, असं गीतेत म्हटलंही आहे. @Marathi_Rash या पत्रकार म्हणून नाही, तर कुणासाठीही, कुणीही भाषा काळजीपूर्वकच वापरावी. कृपया Leader बना, Troller नाही!
@NavnathBanBJP
Navnath Kamal Uttamrao Ban
1 year
पालघरमध्ये साधूंची हत्या झाली तेव्हा असं ट्विट करायला हाताला लकवा भरला होता की काय @Marathi_Rash ताई?
409
284
1K
106
75
908
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
4 years
फेकलेल्या हाडकांसाठी शेपूट हलवणारे, आणि नसलेल्या मुद्द्यांमागे लूत लागल्यासारखे पळून तीच बातमी असल्याचं काहूर माजवणारे ते भाडोत्री! खरे पत्रकार कष्टाच्या पैशानं कटिंग चहा-बिस्किट घेतात, त्याची चव त्या दरबारी सुपारी बहाद्दरांना काय कळणार! @vinodjagdale80 संताप योग्यच! #मुक्तपीठ
80
89
870
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
4 years
बिहार निवडणुकीसाठी राजकारण करायचं त्यांनी नक्की करावं. पण @MumbaiPolice दलावर दुगाण्या झाडू नये. काही तर असे की बिहारच्या 'अति'सुरक्षेमुळे राहतात सुरक्षित मुंबईत, नाव पैसा कमवतात मुंबईत आणि वेळ आली की गप्प बसतात किंवा गळे काढतात. दुसरे नावापुरते मराठी. त्यांच्याबद्दल काय बोलावं!
Tweet media one
117
116
814
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
2 years
जबरदस्त टायमिंग! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं औरंगाबादेत सभास्थानी आगमन, विप नेते देवेंद्र फडणवीस यांचं मुंबईत भाषण संपलं.
19
33
779
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
2 years
पडळकरांची जीभ घसरली. पडळकरांची जीभ पुन्हा घसरली. पडळकरांची जीभ पुन्हा पुन्हा घसरली. अशा बातम्या इतक्यांदा येतात की यापुढे "आज पडळकरांची जीभ घसरली नाही", ��शा बातम्या द्याव्या लागतील. जीभ आहे ती, त्यात पुन्हा पडळकरांची...घसरणारच!
44
52
771
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
2 years
काहीवेळा जे गमावतात, त्यापेक्षा ज्यांच्यामुळे गमावावं लागतं, तेच जास्त गमावत असतात!
15
77
739
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
1 year
आजपासून आपल्या घरी मराठी न्यूज चॅनल्सचा पुढारी! #पुढारीन्यूज #आवाज_जनतेचा! आता अवघ्या काही तासातच #PudhariNews #बघायलागतंय #मराठी #मुंबई #कोल्हापूर #Mumbai #Kolhapur
Tweet media one
127
67
752
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
10 months
"#छत्रपतीशिवाजीमहाराज सुरतेला गेले होते, त्यामुळे मीसुद्धा गेलो!" भरतशेठ गोगावलेंंचं अपात्रता सुनावणीत उत्तर या उद्दामपणामुळे शेठना अपात्र ठरवलं पाहिजे, तेही कायमचं! यांचं उंदरासारखं बिळाकडे धावणं आणि महाराजांची स्वराज्यासाठी सुरतेवर स्वारी! डबक्याची सागराशी तुलना? हिंमतच कशी!
Tweet media one
26
158
712
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
5 years
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे घरी परतले. सकाळी साडे दहाला ते कृष्णकुंजातून निघाले. ईडीला साडे अकराला पोहचले. पावणे नऊ तासांच्या चौकशीनंतर ते बाहेर आले. घरी परतले. घरात जाताना ते म्हणाले, "कितीही चौकशी झाली तरी थोबाड बंद ठेवणार नाही!" ही हिंमत आवडली!
Tweet media one
36
91
691
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
2 years
होय! मला संजय पवार पडल्याचं दु:ख आहे. लपवत नाही. राज्यसभेच्या उमेदवारीत काही कारणाने का होईना कार्यकर्ता दिसला. नाहीतर धनदांडगे, सेटर नेते, पेज-3 कार्यकर्ते असे दरबारीच. मविआचा उमेदवार पडल्याचं दु:ख नाही, पण प्रस्थापितांच्या कपटात एका कार्यकर्त्याची संधी हुकल्याचं वाईट वाटलं.
@JalAniDhur
Swapnil
2 years
त्याचं दुःख निर्भिड आणि पत्रकार म्हणणाऱ्या @TulsidasBhoite यांना जास्त झालं
0
1
6
24
62
641
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
4 years
मुंबईचं पर्यावरण बिघडवणारी झाडांची कत्तल करून आरे जंगलात कारशेड उभारण्याचं समर्थन करणाऱ्यांनी स्पष्ट करावं तो कांजुरचा भूखंड कोणासाठी आणि कशासाठी अडवला जातोय? 'आरे नको'मागे पर्यावरण कारण, 'कांजूर नकोच'मागे? खर्च सांगू नका तो 'आरेच पाहिजे' अट्टाहासातून केलाय! #आरेवाचवा #SaveAarey
79
71
645
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
4 years
घोटाळ्यांचा आरोप असलेले वादग्रस्त वाधवान. लॉकडाऊनमध्ये महाबळेश्वरपर्यंत प्रवास. वरिष्ठ अधिकाऱ्याचं शिफारसपत्र कसं मिळालं? कोरोना भीतीचं कारण देत ईडी चौकशी टाळली. आता कसा प्रवास केला?एकटे दुकटे नाही सोबत तब्बल २३! @OfficeofUT @AnilDeshmukhNCP चौकशीची गरजच नाही सरळ कारवाईच व्हावी!
38
113
622
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
2 years
मनसैनिकांच्या अनेक चांगल्या बातम्या कळायच्या त्यामुळे तुमचं काम आवडतं. पण हे खटकलं! हा पक्षीय राजकारणाचा मुद्दा नाही. महाराष्ट्रातून निवडून गेलेल्या ४८+१९ खासदारांपैकी दिल्लीत विरोधाला जे ४ उभे ठाकलेत ते महाराष्ट्रहितरक्षणासाठी! महाराष्ट्रच नसेल तर 'नसे'च उरेल! कृपया भान राखा!!
52
72
636
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
4 years
आदरणीय @myogiadityanath जी आप रामजन्मभूमी इस पावन राज्य के मुख्यमंत्री हैं. संकट के समय दुसरे राज्य के मुख्यमंत्री पर आरोपों की ओछी राजनीति से भारत के दो राज्यों में द्वेष पैदा कर क्या मिलेगा? आपकी राजधानी से ज्यादा उत्तरभारतीय मुंबई को अपना मानकर हमारे साथ रहते है. #महाराष्ट्र-१
@myogioffice
Yogi Adityanath Office
4 years
अपने खून पसीने से महाराष्ट्र को सींचने वाले कामगारों को शिवसेना-कांग्रेस की सरकार से सिर्फ छलावा ही मिला। लॉकडाउन में उनसें धोखा किया, उन्हें उनके हाल पर छोड़ दिया और घर जाने को मजबूर किया। इस अमानवीय व्यवहार के लिए मानवता श्री उद्धव ठाकरे जी को कभी माफ नहीं करेगी।
5K
10K
47K
22
98
630
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
1 year
टीव्हीचं एक मला खूप आवडतं. कितीही कुणी आव आणला तरी कुणी #Live तोंड उघडलं तर वास्तव उघड होतंच. #शिवसेना दोन मेळावे. दोन्हीकडच्या लोकांशी पत्रकार बोलतात, तेव्हा सहजच कळतं, मनापासून कोण, धनापासून कोण? नेमकं कुठे मन आणि कुठे धन...ते जाणून घेण्यासाठी पाहा #पुढारीन्यूज #आवाजजनतेचा
Tweet media one
16
49
605
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
2 years
सकाळी संभाजीनगरजवळ समृद्धी महामार्गावर प्रवेश केल्यावर पुढे, ज्यांचं नाव महामार्गाला दिलंय, ते 'हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे' नाव मला तरी दिसलं नाही. संध्याकाळी त्यांची शिवसेनाच त्यांच्या ठाकरे कुटुंबाविना झालीय! विकासाची समृद्धी भावणारी, पण ती नैतिकतेच्या किंमतीवर नसावी!
Tweet media one
18
52
593
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
4 years
“मुख्यमंत्र्यांशी माझा संवाद, त्यांच्या मागे आम्ही उभे आहोत. ही वेळ राजकारणाची, दोष देण्याची नाही. एकमेकांना मदत करण्याची आहे. संकटावर मात करायचीय. समन्वय नीट असावा!" केंद्रीय मंत्री @nitin_gadkari यांचे आश्वासक शब्द, संकटकाळी कसं वागाव�� ते सांगणारे!
Tweet media one
13
63
584
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
2 years
बाकी सर्व चालू द्या...पण राष्ट्रवादी काँग्रेस फोडून शिवसेनेत आलेले आणि शिवसेना फोडून पुढच्या मार्गावर असलेले दीपक केसरकर राष्ट्रवादी काँग्रेसने भूतकाळात शिवसेना फोडल्याबद्दल सांगतात तेव्हा...व्हिडीओफेम सोलापूरकर श्रीकांत देशमुखांनी एकपत्नीव्रतावर बोलल्यासारखं वाटतं!
7
69
589
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
1 year
लवकरच वर्ष होईल, ९ सप्टेंबर २०२२ला मी #पुढारी समुहात आलो. न्यूज चॅनल प्रोजेक्टचा पहिला माणूस. रिकाम्या जागेत न्यूजरूम, जबरदस्त स्टुडिओ आणि सर्वात महत्वाचं ऊर्जेनं सळसळणारी, उत्साही टीम उभारण्यापर्यंत टप्पे गाठले. मंगळवारी #पुढारीन्यूज चॅनलचा आरंभ झाला तो प्रचंडच! #आवाज_जनतेचा!
25
35
577
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
2 years
शहाजीबापू सांगोला मतदारसंघातून निवडून आले, तेथूनच ७दशकं महाराष्ट्रातील सामान्यांसाठी लढणारे गणपतराव देशमुख निवडून येत. ११वेळा आमदार. एकदाही पक्ष बदलला नाही. त्यांची भाषणं ऐकली जात अभ्यासपूर्ण मांडणीमुळे! आताचे परप्रांताचा मुख्यमंत्री फर्माईश करतो म्हणून लाज वाटावी तेच सादर करतात!
Tweet media one
@KrishnaSonarwa1
Krishna Sonarwadkar
2 years
आसामच्या मुख्यमंत्र्यांना शहाजी बापूंची भुरळ आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी शहाजी बापूंना बोलायला लावला डायलॅाग शहाजी बापूंनी बोलून दाखवली काय झाडी काय डोंगर काय हॅाटेलवाला डायलॅाग @mieknathshinde @ShahajibapuP
34
24
207
27
67
567
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
2 years
मुंबई क्रिकेट असोसिएशन MCAच्या निवडणुकीत वापरलेलं भाजपासोबत लँड होण्याचं कौशल्य यावेळी महाराष्ट्रहितासाठी वापरायचं ना! आता तशीही तुम्हाला भाजपा...हिंदुत्ववाद्यांची अॅलर्जी वगैरे उरली नाहीच. संदीप पाटलांना एकटं पाडत २५ मतांनी निसटता विजय मिळवलात तसा महाराष्ट्राचा प्रकल्प राखायचा!
@Awhadspeaks
Dr.Jitendra Awhad
2 years
हवामान खराब असल्यमुळे महाराष्ट्रात लँड होणार एयरबस विमान बनवण्याचा कारखाना गुजरात मध्ये लॅंड झाले #Airbus
178
313
3K
28
80
556
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
2 years
बच्चूभाऊ, गरज मर्यादित ठेवली तर Parle-Gवर खरंच भागतं! तरीही फक्त २ आमदारांचं बळ असतानाही ज्यांनी राज्यमंत्रीपद दिलं त्यांची साथ सोडण्याची गरज काय होती? अट्टल राजकारण्याच्या भूमिकेत तुम्हाला पाहणं जड जातं! शिवसेना नेते @mieknathshinde यांनी हिंदुत्वाचा मुद्दा तरी मांडलाय, तुम्ही?
@RealBacchuKadu
BACCHU KADU
2 years
पारलेजी अनेकांना आधार देणारे बिस्कीट, पाणी व पारलेजी याची जोड काही वेगळीच आहे. अनेकदा रात्री अपरात्री पारलेजीने आम्हाला आधार दिला. आज मुंबईत कामानिमित्त टपरीवर तोच अनुभव परत आला.
214
158
4K
28
84
546
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
4 years
दहशतवादी माणसं नसतातच. सोपोरमध्ये पाकड्यांनी ३वर्षांचा लहानगा ज्यांच्यासोबत होता, त्यांना लक्ष्य केलं. तो कोवळा जीव कलेवरावरच बसून राहिला. भारतीय जवानांनी वर्दीतील माणुसकी जिवंत राखत त्या जीवावरच्या संकटातही त्याला वाचवलं. माणूस आणि सैतानात हाच फरक, जीव वाचवणारे आणि जीव घेणारे!
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
15
91
533
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
4 years
२७वर्षांनी प्रस्थापित माध्यम क्षेत्रामधून स्वत:हून बाहेर आलो आहे. स्वतंत्र पत्रकारितेसाठी #मुक्तपीठ @Muktpeeth डिजिटल क्षेत्रात प्रयत्न असतील. लवकरच सोबत असेल. नेमकी काय भूमिका? व्हिडीओ पाहा. सबस्क्राइब करा
Tweet media one
113
58
527
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
6 years
#अण्णाहजारे यांनी मला काही झालं तर पंतप्रधान मोदी जबाबदार असं धमकावलं. सारे राळेगणला धावले. #पुणतांबा #अन्नत्यागआंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या लेकींचे जीव धोक्यात. शुभांगी जाधवची प्रकृती खालावली. रुग्णालयात दाखल. यावर अण्णाही गप्प! सरकारही थंडच! मोठ्यांचे असले तरच जीव महत्वाचे?
Tweet media one
21
200
515
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
2 years
शरद पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर आले. मोठा निर्णय झाल्याचं वाचलं. 'दारिद्र्यरेषे'खालील मुंबई क्रिकेट असोसिएशनचा १० कोटींचा पोलीस संरक्षण खर्च माफ झाला. पवार-शेलारांची मागणी लगेच फडणवीसांनी मान्य केली! सामान्यांच्या 'फालतू' मागण्यांसाठी थोडी असं एकत्र यायचं असतं!
Tweet media one
17
119
509
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
2 years
बातमी बाईकवर नाही बाईकच्या चाकांखाली आहे! रस्त्याची अवस्था!! अपेक्षा आहे, राणा दांपत्य आता गल्ली ते दिल्ली सत्ता हाती असताना, शेवटच्या वर्षात तरी ही परिस्थिती बदलतील! बातमी शैलेश पाटलांमुळे लक्षात आली! 😀 @sshailesh123
@navneetravirana
Navnit Ravi Rana
2 years
पूरे 5 दिन मेळघाट क्षेत्र के आदिवासी भाईयो के साथ होली मनाने के लिये अभी तक 57 से ज्यादा गाव धुलघाट,जमपनी ,बिरोटी;बरगंडी टेम्ब्रुखेडा सवालिखेडा कमलाखार भ्रमण करते हुए और समस्या सुनते हुए
153
95
2K
19
64
501
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
2 years
प्रकल्प कधी आला, कधी गुजरातला गेला, असे मुद्दे उपस्थित करत बचाव करणाऱ्यांनी जरा सांगावं, २०१४पासून गुजरातमध्ये सर्वाधिक मोठे प्रकल्प का पळवले जातात? साबरमती प्रदूषित असूनही परदेशी पाहुण्यांचे इव्हेंट तेथेच का? देश म्हणजे एक राज्य नसतं, सर्व राज्य मिळून देशाचं संघराज्य असतं!
55
109
495
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
2 years
या ७ मे रोजी लग्नाला २५ वर्ष झाली! तेव्हा कुठे जाणं जमलं नाही. आता हिमाचल फिरतोय. प्रत्येक चढ-उतारात सोबत ठामपणे राहणारी अनिता. दिल्लीत एकटं राहत सर्वोच्च न्यायालयाची AOR परीक्षा उत्तीर्ण झाली. प्रचंड बुद्धिमान. पण पाय जमिनीवर. जमेल ते सर्व इतरांसाठी करणारी. आणखी काय पाहिजे!
@AnitaBafna
Adv. Anita Bafna
2 years
Tweet media one
5
1
81
59
17
496
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
4 years
अंगणातच रणांगण! आणि तेही संकटकाळात. आपल्याच घराची हानी होऊ शकते. मविआ सरकार जर पुरेसं करत नसेल तर केंद्राकडून राज्याचं कर योगदान आणि ओढवलेल्या संकटाच्या प्रमाणात मदत आणा, दाखवून द्या तुम्ही किती काळजी करता ते. असलेली रेषही पुसण्यापेक्षा स्वत:ची मोठी ओढून तिला छोटी ठरवा!
35
90
475
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
2 years
#नाशिक गोविंद डोंगरे हे आपले मराठी शेतकरी! त्यांनाच हक्काच्या #मुंबई राजधानीत द्राक्षं विकण्यावर बंदी! दुप्पट दराने द्राक्षं विकणारे फेरीवाले कायदेशीर असतात? मराठी नेत्यांनी लक्ष घालावं, नाही तर #मराठी प्रेम बेगडी वाटेल! @ShivSenaUBT_ @mnsadhikrut @AUThackeray @RajThackeray
@Mahendrabmaha
Mahendra Mahajan
2 years
#नाशिक च्या द्राक्ष उत्पादकांची व्यथा... #मुंबई मधील घटना अवकाळी पाऊस झोडपतोय, उत्पादन खर्चाएव्हढे पैसे मिळत नाहीत आणि शेतकरी स्वतः मार्केटिंग करतोय तर लालफितीत घुसमट केली जातेय... @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @ChhaganCBhujbal @dadajibhuse @rajushetti @Sadabhau_khot @mybmc
50
189
560
21
131
468
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
1 year
नसणारच... मिळमिळीत बुळबुळीत गुळमुळीत असणारच... झणझणीत खणखणीत दणदणीत! लवकरच... #पुढारीन्यूज मराठी माणसाला जसं हवं तसं, हक्काचं न्यूज चॅनल! #बघायलागतंय
Tweet media one
61
64
469
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
5 years
राहुल गांधींनी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरेही दिली! पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवेदन केलं. प्रश्न सुरू होताच शाहांकडे बोट दाखवत "अध्यक्षच बोलतील!" सांगत मौन साधलं! अनेकांना अमेरिकेसारखी आमने-सामने चर्चा हवी वाटते, तसं मानलं तर, 23ला काहीही होवो, आज तरी राहुलच जिंकले असते!
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
5 years
इतिहास घडतोय! अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शाहांसोबत प्रथमच पत्रकार परिषदेत! राहुल गांधींचीही पत्रकार परिषद. थेट पंतप्रधानांना प्रश्न: "आता तरी राफेलवरील प्रश्नांची उत्तरं द्या!" एकाच वेळी दोन पक्षांचे सर्वोच्च नेते लाइव्ह. पाहुया कोण बाजी मारतं! कोण दडवतं, कोण सांगतं!"
Tweet media one
8
15
94
29
92
442
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
1 year
#सरळस्पष्ट १ महाराष्ट्राभर संताप दिसतोय #मराठाआरक्षण आंदोलकांवरील पोलीस लाठीमारामुळे! २ एकेकाळी टोकाची भूमिका घेत आक्रमक मराठा नेते म्हणून प्रतिमा निर्मितीचा प्रयत्न करणारे नीतेश राणे आज #लव्हजिहाद मुद्द्यावर चांदवडमध्ये गर्जत होते! काळ बदलला की पक्ष...मग विचारही बदलतात, आचारही!
31
59
444
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
1 year
न्यायाचा प्रत्येक लढा, #पुढारीन्यूज चॅनल साथीला! #जालना #अंतरवालीसराटी गावातून #मनोज_जरांगे_पाटील यांच्या सभेचं लाईव्ह! सामान्य गरजवंत मराठ्यांच्या भावना त्यांच्या शब्दात..."आम्ही भीक मागत नाही, #मराठा_आरक्षण आमच्या हक्काचं आहे! तेच मागतोय. शेतकरी भीक मागत नसतो!" #सरळस्पष्ट
Tweet media one
12
85
448
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
1 year
#मुंबई कलिनामधून जाताना #पोलीसभरती साठी आलेले तरुण दिसले. सोय नसल्याने रस्त्यावर उघड्या आभाळाखाली रात्र घालवणारे...रात्री मुंबईला सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसानं झोडपलं. गावाकडे शेतकरी बापाची मेहनत अवकाळी पाण्यात घालते, इथं सरकारी दुर्लक्षानं लेकरांनाही झोडपते! #अस्मानीसुलतानी
24
145
440
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
5 years
🌸 प्रिय @AnitaBafna 22 वर्षांची तुझी साथ. परीसारखं मस्त स्वप्न. सारंच उत्साहानं सळसळवणारं. या साथीशिवाय बरंच शक्य झालं नसतं. सतत. अविरत. अथक. सकारात्मक सक्रीयतेची ऊर्जा लाभते, ती या छोट्याशा माझ्या जगातून. कोणत्याही अवास्तव अपेक्षांचं ओझं न लादता. आणखी काय हवं! 🌸
Tweet media one
50
15
435
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
4 years
गृहनिर्माणमंत्री @Awhadspeaks रात्री स्थानिकांना समजवताना. आपुलकीनं दरडावतही. हे अत्यावश्यकच. सर्वपक्षीयांनी पोलिसांचं न ऐकणाऱ्यांना समजवावंचं. दुसरं एक. राजकीय नेते फवारणी करताना, वाटप करताना नाव वगैरे छापत असतील तर टीका नको. सामान्यांना त्या स्पर्धेतूनही जास्तीत सहकार्य मिळेल.
11
45
426
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
5 years
#अभिमानास्पद पृथ��वीराजसिंह जडेजा. मोरबीचा पोलीस शिपाई. 2.5 किमी पाण्यातून चालत या दोन मुलींना सुरक्षित जागी पोहचवलं. महाराष्ट्रातही जीवाचा धोका पत्करून असंख्य पोलीस, एनडीआरएफ, अग्निशमन जवान पूरग्रस्तांना वाचवत आहेत. सांगलीचे पोलीस अधीक्षक सुहेल शर्माही सांगलीवाडीत पोहत गेले.
Tweet media one
Tweet media two
6
77
429
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
2 years
सुभाष शेळके हे समाज माध्यमांचा खूप चांगला उपयोग करत आहेत! सर्वांसाठी सरकारी सेवांची ऑनलाईन उपलब्धतेची #उपयोगीमाहिती पुरवतात.
@suvishelke
Subhash Shelke - सुभाष शेळके
2 years
नाव, जन्मतारीख बदलासाठी गॅझेट करायचंय! दहावीचे बोर्ड सर्टिफिकेट आणि जन्मदाखला यातील जन्मतारीख आणि नावात तफावत आहे, लग्नानंतर नावात बदल करायचाय. कोणत्याही एजंटकडे जाऊ नका घरबसल्या ऑनलाईन ८ दिवसांत गॅझेट मिळुन जाईल. शुल्क ५२३ रू लिंक 👇
Tweet media one
22
515
2K
3
44
438
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
2 years
सुमीतजी, ही संवेदनशीलता? #आरे जंगल कत्तलीला विरोध म्हणजे मेट्रोला विरोध असे दुसऱ्याने लिहून दिलेले डायलॉग नक्की मारा. पण जे जंगल शतकानुशतकं वाढतं त्याची एका रात्रीत कत्तल होताना रोखणाऱ्या तर���ण कार्यकर्त्यांसाठी असे शब्द वापरू नका, ही विनंती! हा तर लाज आणणारा माज, असं लोक बोलतील!
@sumrag
Sumeet Raghvan सुमीत राघवन
2 years
Aarey activists ke saath yahi karna chahiye tha hum logon ne.. Sar pe chadh ke baith gaye they ye bogus faltu log.. Kaam ke na kaaj ke...zholachaap...
701
809
4K
83
64
429
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
5 years
नवी झेप घेण्यासाठी पुढे सरसवावे...तेवढ्यात संकट आडवं यावं, तसं घडलंय. नव्या जबाबदारीत टीमसह नवं काही करून दाखवत असतानाच छोटा अपघात झाला. कंबरेचं हाड मोडलं. रात्री शस्त्रक्रिया होईल. सारं ठिक होईल, ही अपेक्षा. वेदना सहन करतानाही पुन्हा तसंच सक्रीय होण्याची जिद्द आहे !
178
30
419
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
6 years
संजय निरुपमांची बकवास: "लक्षात ठेवा मुंबई, महाराष्ट्र उत्तर भारतीय चालवतात. एक दिवस उत्तर भारतीयांनी काम केले नाही तर मुंबई ठप्प होईल. मुंबईकरांना जेवायलाही मिळणार नाही." कृतघ्नाला लक्षात नसावं सन्मानानं जगायला मुंबईतच मिळालं. काँग्रेसने त्याला हाकललं नाही तर काँग्रेसचं दिवाळंच!
Tweet media one
55
119
415
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
2 years
उद्योगमंत्री @samant_uday यांना महाराष्ट्रातील किमान प्रदूषणकारी प्रकल्प गुजरातमध्ये पळवला गेला, याचं दु:ख नाही. पण कोकणात प्रदूषणकारी रिफायनरीला होणारा स्थानिकांचा विरोध खुपतोय! खरंतर कोकण करपवणाऱ्या अशा विकासापेक्षा तेथे सॉफ्टवेअर इंडस्ट्री आणून आयटी हब बनवण्याचं का नाही सुचत?
19
62
426
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
2 years
लढण्याची भीती वाटते ते भ्याड असतात. ते शौर्य नाही तर कपट दाखवतात. पानिपतात मराठ्यांच्या फौजा या हिंदुस्थानी फौजा होत्या. देशावर चालून आलेल्या परक्या अब्दालीशी लढणाऱ्या. त्यांची रसद तोडणारे घातपातीच, त्यांना जिंकले असं वाटलं तरी इतिहासात मराठे नायक आणि घातपाती खलनायकच ठरले!
11
58
422
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
1 year
हैद्राबादेत जाऊन आदित्य ठाकरे जे बोलले ते खळबळ माजवणारंच! @AUThackeray
@Darshan38312432
Darshan Gowda
1 year
Whatsapp University Student Kanpur Uttarpradesh किसी को निराश नहीं किया ..... तडफड उत्तर 👏👏👏👏
8
149
596
7
40
412
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
7 years
#शिक्षकभरती होत नसल्यानं सक्तीची बेरोजगारी पत्कराव्या लागलेल्या #मराठी तरुणाईचा संताप. लेख वाचा. थेट भावी शिक्षकांच्या शब्दात त्यांचा भावना व्हिडिओतून अनुभवा: भावी शिक्षकांच्या परीक्षेत सरकार नापास? #शिक्षकभरती_आंदोलन @MarathiRT @MarathiBrain @Rt_Teacher
@lokmat
Lokmat
7 years
भावी शिक्षकांच्या परीक्षेत सरकार नापास? #Teachers #Unemployment #Maharashtragovt
1
89
109
76
349
402
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
6 years
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ नेते काँग्रेसचे...मात्र भाषा राज ठाकरेंसारखी! शेतकरी कर्जमाफीमागोमाग घेतलेला दुसरा निर्णय उद्योग धोरण बदलाचा. "मध्यप्रदेशातील रोजगार उत्तरप्रदेश बिहारचे तरूण पटकावतात. स्थानिक बेरोजगारच. स्थानिकांना 70% रोजगार दिले तरच यापुढे उद्योजकांना सवलती!"
Tweet media one
18
58
398
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
4 years
#एकचप्रश्न रा.स्व. संघाच्या सेवाकार्याबद्दल आदरच. मात्र, धारावी कोरोनामुक्त होतेय ती @mybmc टीम, डॉक्टर, समाजसेवक, पोलीस यांच्या मुख्य प्रयत्नांनी. जर दावा खरा असेल तर मग भाजपची सत्ता असलेल्या पुणे, पिंपरी, पनवेल, जळगाव, नागपूर या मनपात संघाचं धारावी मॉडल का राबवलं गेलं नसेल?
32
58
400
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
2 years
महाराष्ट्रातील आणखी एक प्रकल्प गुजरातनं पळवला. गुजरातचं भाग्य, त्या राज्याला मुख्यमंत्रीच नाही पंतप्रधानही लाभले! महाराष्ट्राला? लाज वाटते त्यांची, जे महाराष्ट्रानं गमावूनही निर्लज्ज भूमिका घेतात. अभिमान वाटतो, त्या राज्यांचा जे स्वराज्यासाठी पक्षभेद विसरत एकजुटीनं उभे ठाकतात!
20
90
405
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
4 years
या हँडलची क्रिएटीव्हीटी आवडते. काहींची जास्तच फिरकी घेतो असंही वाटतं. पण हे मांडलंय ते १००% माझ्यासारख्या प्रत्येक शिवप्रेमीच्या मनातलं! एक महाचित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर साकारला जावाच! महाराष्ट्र कलागुणांची खाण, स्वीकारणार कुणी आव्हान? अवघड असेल पण अशक्य नसेल!!
@faijalkhantroll
Faijal Khan
4 years
this scene from bahubali always bring goosebumps, after this movie i always keep expecting a huge and more powerful movie on chhatrapati shivaji maharaj. RT if u also feel like this...! #Shivrajyabhishek #शिवराज्याभिषेक
22
302
822
10
40
392
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
6 years
शेतकरी कन्यांना पाच दिवसांच्या अन्नत्यागानंतर पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं. मंडपही काढला. पुण्यातील हे तरुण शिक्षक सहा दिवस अन्नाविना, का दखल नाही? कितीही असंतोष माजला तरी यश हा आत्मविश्वास की माज? राजकारणीच नाही प्रत्येकानंच विचार करावा. विसरु नये, आज हे जात्यात, उद्या आपणही!
Tweet media one
26
230
388
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
1 year
#ठाणे #कल्याण १३वर्षांची विद्यार्थीनी. नराधमाकडून पाठलाग. अत्याचाराचा प्रयत्न. कशीबशी सुटते. पोलीस कसाबसा विनयभंगाचा गुन्हा पॉक्सोसह घेतात. घडतं मुख्यमंत्र्यांचा जिल्ह्यात. नराधम व्हिक्टरीची साईन दाखवतो! हा कुठचा माज! अधिवेशनात काय...औरंगजेब, भिडेंचा गोंगाट! हा आवाज ऐकणार कोण?
Tweet media one
9
124
399
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
5 years
काळं फासणं, पुतळे जाळणं हेच राजकारण. अशा कुणीही @narendramodi यांच्यावर पुस्तक लिहिणं भाजपला चालेलही. पण आजचे #छत्रपतीशिवाजीमहाराज महाराज म्हणून उल्लेख अतिरेकी चमचेगिरीच! महाराजांची तुलना आजच्या कोणत्याही नेत्याशी होऊच शकत नाही. चमको चमच्यांना तलवारीची धार काय कळणार! नाव बदलाच!
Tweet media one
Tweet media two
32
91
386
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
5 years
पराभवामागोमाग पराभवाचे दणके ज्यांना मोठे केले ते सारे खोटे निघाले सत्ता जाताच जवळेचेही सोडून चालले तरीही ‘ते’ लढण्यासाठी उभे ठाकले वय वर्षे फक्त ७९...उत्साह सळसळता #युवायोद्धा #शरदपवार रात्री ८.३० वाजता @TV9Marathi @PawarSpeaks @NCPspeaks @ChakankarSpeaks @Awhadspeaks
16
41
379
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
6 years
#साहित्यसंमेलन नयनतारांना घाबरून निमंत्रण रद्द करणाऱ्या भेकडांना उद्घाटिका वैशाली येडे यांचा दणका: बोलणारी बाई नाही चालत. डोलणारी,डोलवणारी बाई पाहिजे असते,म्हणून दिल्लीवाली विधवा (नयनतारा) नाही चालली,म्हणून मला बोलावलं. पण बोलणार तर मीही आहेच! आम्ही विधवा नाही. समाजच विधवा झालाय!
Tweet media one
14
115
376
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
5 years
अंधभक्त ट्रोलर्स दिल्लीकरांना हिनवतायत. दिल्लीकरांना फुकटचं पाहिजे. फुकटचं पाणी, फुकटची वीज. त्यामुळे काश्मीर वगैरे मुद्द्यांचं महत्व नाही. अंधभक्तीत विसर पडतोय...याच दिल्लीकर मतदारांनी लोकसभा निवडणुकीत दिल्लीच्या सातही जागांवर भाजपला विजयी केलं होतं. माजच घात करतोय, कसं कळणार?
13
53
378
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
4 years
औंढा नागनाथच्या धोंडीलाल राठींच्या पत्नीच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी विधी टाळत १लाख मुख्यमंत्री निधीला दिले. एकीकडे ही माणसं, तर दुसरीकडे कोरोना किटची किंमत अवास्तव आकारत तिजोरी भरू पाहणारे लांडगे. माणसं मरत असताना, टाळूवरचं लोणी खावू पाहणारी ही अवलाद माणसांची असूच शकत नाही!
15
71
373
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
4 years
#अन्वयनाईक आत्महत्या प्रकरणात अर्णव गोस्वामींना अटक ही गुन्हेगारी प्रकरणातील आरोपीविरोधातील कायदेशीर कारवाई. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दाच नाही. आरोपी पत्रकार म्हणून विचार केला तरीही अभिव्यक्ती स्वातंत्र्य हक्कापेक्षाही जगण्याचा हक्क मोठा. अन्वय नाईकांचा तोच हिरावण्यात आला!
Tweet media one
36
57
367
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
5 years
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आजचं बोलणं संकटकाळात नेत्यानं कसं वागावं ते दाखवणारं. काही राजकारण्यांचे ब्लेमगेम रंगलेले. तर हे म्हणाले, "परराज्याचे मजूर आपल्याकडे, आपण काळजी घेतोय. आपले परराज्यात, ते काळजी घेत आहेत!" #WarAgainstVirus #IndiaFightsCorona #कोरोनाहरणार_भारतजिंकणार
Tweet media one
15
68
375
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
5 years
काँग्रेसच्या डी. के. शिवकुमारांच्या जामीनाविरोधातील ईडी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. जे कळलं ते धक्कादायक! चिदंबरमविरोधी याचिका कॉपी-पेस्ट करून शिवकुमारांविरोधात याचिका. चिदंबरमांचं पद डीकेंपुढे लिहिल्यानं हे उघड झालं! चूक असली तर कारवाई व्हावीच पण ही घाई वेगळंंच सुचवते!
Tweet media one
11
60
365
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
5 years
#भाईरजनीकांत. वय 70. प्रकाश आंबेडकरांविरोधात पोस्ट केली म्हणून वंचित समर्थकांनी बुटानं बडवलं. हल्लेखोरांना ते म्हणाले, मीही बाबासाहेब आंबेडकरांना मानतो. मग त्यांच्या नातवाला का नाही मानत, असं विचारत मारहाण झाली. हा तर बाबासाहेबांच्या घटनेनं दिलेल्या विचारस्वातंत्र्यावरच हल्ला!
Tweet media one
37
103
359
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
5 years
आमदारसाहेब, जास्त काही नको. फक्त एक करा... कर्नाटकातील गुलबर्गा पोलिसांना वारिस पठाणांविरूद्ध अटकेची कारवाई तर करायला सांगा! तिथं ये��ियुरप्पांच्या नेतृत्वाखाली भाजपच सत्तेवर आहे. आव्हान नंतर आधी त्यांना कारवाईसाठी आवाहन तर करा!
@RamVSatpute
Ram Satpute
5 years
वारीस पठाण सारखे हिजडे हिंदूंना खुलं आव्हान देत आहेत ... हिंदू इतका षंड नाही ... वाघाच्या जबड्यात घालून हात मोजिले दात पहा चाळूनी पाने आमच्या इतिहासाची ...!
87
125
774
15
47
362
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
5 years
राष्ट्रवादीचे आ.राजेंद्र शिंगणे जे म्हणाले ते तसंच असेल तर आजची सत्तास्थापना फसवणुकीनेच! ते म्हणाले, "अजितदादांकडून फोन आला. धनंजय मुंडेंच्या बी-४ बंगल्यावर सकाळी ६ वाजता बोलवण्यात आले. एका ठिकाणी जायचं असल्याचं सांगून राजभवनवर नेलं. तिथं शपथविधीचं कळलं. आम्ही पवारसाहेबांसोबतच!"
Tweet media one
11
41
358
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
5 years
तुम्ही भाजप ते राष्ट्रवादी. राजकारण सुरुच राहणार. करा. पण काळ-वेळेचं भान राखा. "विनाकारण मोदीजींवर टीका केली तर शिक्षा ही भोगावी लागेलच" म्हणजे जयंत पाटलांनी मोदीजींवर टीका केल्यानं इस्लामपुरला कोरोनाची शिक्षा? अहो तुम्ही सुशिक्षित काय हे आणि नाव इस्लामपूर असलं तरी ते भारतात आहे!
32
59
363
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
8 months
#मराठाआरक्षण #मनोज_जरांगे प्रकृती ढासळतेय, त्याचवेळी केंद्रीय मंत्र्यांची अशी पोस्ट! सरकारचं डोकं ठिकाणावर आहे? अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलकांची, ती चुकीची नाही! #नारायणराणे ज्येष्ठ नेते. ही अपेक्षा नव्हती! #जागा_सरकार_जागा_जरांगेंना_जगवा #पुढारीन्यूज थेट अंतरवाली सराटीतून
@MeNarayanRane
Narayan Rane
8 months
मनोज जरांगे पाटील याच्‍या डोक्‍यावर परिणाम झाल्‍यामळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे. त्‍याला मी मराठयांचा नेता मानत नाही. देशाचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदी यांना महाराष्‍ट्रात फिरु देणार नाही अशी बेताल बडबड त्याने केली. त्‍याने आता मर्यादा ओलांडली आहे. माननीय
1K
448
3K
26
103
371
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
5 years
#UnnaoCase अखेर पीडितेला न्याय! भाजप आमदार कुलदीप सेंगर दोषी. सोपा नव्हता संघर्ष. २००२ ते २०१९. १८वर्षे. पीडितेच्या कुटुंबातील चौघांच्या हत्या. तिच्यावर बलात्कार. तिच्यासह वकील आणि कुटुंबीय असलेल्या गाडीला अपघात. घडवल्याचा आरोप. मावशी,काकीचे बळी गेले. वकीलासह तीही जखमी झाली होती.
Tweet media one
22
68
363
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
1 year
मंत्रालयातील जाळीवर तरुणाने उडी मारली. रणजित आव्हाड, #अहमदनगर #पाथर्डी. प्रकल्पग्रस्त. पाठशाळेत शिकवतो. एकीकडे #शिक्षकभरती नाहीच! दुसरीकडे समूह शाळांमुळे १५हजार शाळा धोक्यात! एकच विनंती: लढा, जीव धोक्यात आणू नका! #मर��ठीशाळा_वाचवा #शाळादत्तक_योजनाचा_निषेध #समुहशाळानिर्णय_मागेघ्या
Tweet media one
16
219
355
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
5 years
बुुद्ध कळण्यासाठी चांगली बुद्धी लागते!
Tweet media one
22
41
351
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
5 years
काल राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेची विचारणा करताच अरविंद सावंत यांच्याशी बोललो. आता तुम्ही काय करणार विचारताच ताडकन म्हणाले होते, "मी शिवसैनिक आहे. शिवसेना पक्षप्रमुखांनी आदेश देताच राजीनामा!" सत्तेसाठी स्वपक्षाला लात मारणाऱ्यांच्या गर्दीत खासदार @AGSawant सारखे वेगळेच!
Tweet media one
Tweet media two
10
46
345
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
5 years
#महापूर #महासंकट पूरग्रस्त शेतकऱ्यांना 100% कर्जमाफी करा. ढासळलेलीच नव्हे तर भेगा पडलेलीही घरं बांधून द्या. शरद पवारांची मागणी, दोन दिवसांपासून पवार पूरग्रस्त भागात 78 वर्षे वय असलेला हा नेता पूरग्रस्त भागात ज्या तडफेनं फिरतोय, ते आदर आणखी वाढवणारंच!
29
55
341
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
4 years
#पुणे पांडुरंग रायकर कोरोनानं गेला. @tv9marathi मधील सहकारी. त्याला कोरोना झालाय, सोय होईल का, असं मित्रानं विचारलं. डॉ. लहानेसरांशी बोललो. मुंबईत सोय केली. पुण्यातील पत्रकारांनीही दुसरीकडे सोय केली. पांडुरंगशी चॅटवर बोललो. रात्री ऑक्सिजन पातळी घसरली. रुग्णवाहिका नव्हती! गेला!
Tweet media one
57
27
334
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
5 years
"रयतेनं झाडं लाऊन लेकरांसारखी बहुत काळ वाढविली. ती झाडे तोडलियावरी त्यांचे दु:खास पारावर काये? या वृक्षांच्या अभावें हानीही होते. कामातून गेलेले झाडही धन्यास राजी करून त्यांचे संतोषे तोडावे. बलात्कार सर्वथा न करावा!" माणूस आणि #निसर्ग. सारखीच काळजी. आपला राजा! #शिवजयंती #nature
Tweet media one
Tweet media two
4
28
329
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
5 years
खोल विहीरीत जाताना मलाही भीती वाटली. पण सारेच पाण्यासाठी तेथेच जात होते. मिळत काय होतं? थेंब थेंब पाणी. पानानं जमवायचं! पाण्याचाच नाही, लातुरात रोजगाराचाही दुष्काळ. शेतकऱ्यांची जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी गर्दी. लाज आणणारं वास्तव #दुष्काळयात्रा @abpmajhatv संध्या. 6.30
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
18
107
331
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
4 years
अखेर @PawarSpeaks यांनी मुंबईची पत घटवण्याच्या डावामुळे देशहितही धोक्यात येईल, त्याकडे पंतप्रधानांचं लक्ष वेधलं. चांगलं झालं. बँकिंग सेक्टरच्या Rs.145,00,000 कोटींच्या डिपॉझिट्समध्ये महाराष्ट्राचे 22.8 % तर गुजरातचे 5.4% हे आकडे रुपयापेक्षा चार आण्याला महत्व दिल्याचं उघड करणारे!
@PawarSpeaks
Sharad Pawar
4 years
Raised my concerns to Hon. @PMOIndia and drew his attention towards the recent decision taken by the Central Government of India to establish the proposed International Financial Service Centre (IFSC) Authority in Gandhinagar instead of in Mumbai.
Tweet media one
Tweet media two
396
2K
7K
17
82
324
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
6 years
#पाणीफाऊंडेशन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्या उपस्थितीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सणसणीत सवाल, "आजी माजी दोन्ही सत्ताधारी समोर आहेत. सत्ताधाऱ्यांना एक सवाल. सिंचनाचा एवढा पैसा गेला तरी कुठे?" @abpmajhatv
Tweet media one
16
76
327
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
1 year
आज #सोलापूर #सांगोला इथं शरद पवार, देवेंद्र फडणवीस एकत्र. दिवंगत गणपतराव देशमुखांच्या पुतळ्याचं अनावरण! सध्या राजकारण म्हणजे सत्ताकारण, फोडाफोडी. एकाच पक्षातर्फे ११वेळा निवडून जात तडजोड न करता जनतेसाठी लढलेल्या गणपतरावांची उणीव अधिकच जाणवते! सध्या तिथं शहाजीबापू पाटील आमदार आहेत!
Tweet media one
6
24
333
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
1 year
सतत धार्मिक संघर्षाच्या घटना. महाराष्ट्राचं वर्तमान अशांत. त्यासाठी जे जबाबदार ���्यांच्याविरोधात खूपच मवाळ कारवाई किंवा वेळेवर नाहीच! संघर्षाचा वणवा पेटवून कुणाला मतांची उब मिळवायची असेल तर त्या राजकारण्यांनी विसरू नये, #महाराष्ट्र अशांना माफ करणार नाही!
5
64
320
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
10 months
#महाराष्ट्र राज्य #मराठी राज्यभाषा #महानंद महाराष्ट्र सरकारच्या मदतीनं चालणारी सहकारी दूध संस्था असं असूनही महानंदच्या उत्पादनांवर मराठी नाहीच, हिंदीचंच अतिक्रमण! महानंदला मराठी ग्राहक नकोच? @RVikhePatil @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @OfficeofUT @RajThackeray
Tweet media one
17
106
320
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
3 years
व्यापाऱ्यांच्या हक्कासाठी काल ज्या नेत्यांनी कोरोना कठोर निर्बंधांचा भंगही करत निदर्शने केलीत, त्यांना विनंती. कृपया रेमडेसिवीर या इंजेक्शनचा काळाबाजार करणारेही व्यापाऱ्यांपैकीच काही आहेत. हक्कासोबतच कर्तव्याची जाणीव करुन देणे, हेही नेत्यांचे काम! जनतेची लूटही थांबवा! #रेमडेसिवीर
15
58
311
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
4 years
#चांगलीबातमी #GoodNews सरकारी काम, सहा महिने थांब, असं म्हणतात. पण हीच यंत्रणा आव्हान स्वीकारते तेव्हा करुनही दाखवते. बीकेसीत अत्याधुनिक कोरोना रुग्णालय अवघ्या १८ दिवसांमध्ये उभारलं! १०३४खाटा. आज मुख्यमंत्री @OfficeofUT यांनी मनपाला सोपवलं. अपेक्षा आता रुग्णांना परतावं लागू नये!
Tweet media one
7
46
302
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
2 years
@RajThackeray यांच्यासारख्या भारतीयाला अयोध्येत श्रीराम दर्शनाच्या हक्कापासून रोखण्याची धमकी हे उत्तरप्रदेशात कायदा सुव्यवस्था धोक्यात आल्याचं लक्षण तर नाही ना? नेहमी मलबार हिलला जाणारे @BJP4Maharashtra नेते चुकून लखनौ राजभवनला धडकत राष्ट्रपती राजवटीची मागणी तर करणार नाहीत ना? 😃
4
40
305
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
1 year
#लज्जास्पद जिथं लैंगिक शोषणाचा आरोपी बृजभूषण पोलिसांकडून घसटताना दिसला पाहिजे होता, तिथं आज न्यायासाठी लढणारी #साक्षीमलिक दिसली! #दिल्ली #WrestlersProtest
Tweet media one
30
66
309
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
6 years
भाजपाचे हडपसरचे आमदार 'मा.' योगेश टिळेकर, बंधूंवर ५० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करणे हा जर पोलिस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांचा गुन्हा असेल तर त्यांचा अभिमान वाटतो! त्यांच्या बदलीमुळे लोकांचे डोळे पाणावलेत...डोळ्यातलं पाणी सत्तेचा माज बुडवू शकते! #सलाममिलिंदगायकवाड
Tweet media one
13
73
301
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
5 years
#Budget2020 गुजरात गिफ्ट सिटीचा आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र म्हणून जोर देत झालेला उल्लेख हा महाराष्ट्रासाठी धोक्याचा इशारा. मुंबई आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र भूखंड बुलेट ट्रेनच्या घशात घातलाय तो काढून घ्या. तिथं बुलेटट्रेन टर्मिनससह नको फक्त आपलं आर्थिक केंद्र उभारा. @OfficeofUT
Tweet media one
14
89
300
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
5 years
आंध्रातील चंद्राबाबू नायडू देशभर फिरतायत. राजकीय नेत्यांना भेटून निकालानंतरच्या राजकीय समीकरणांची जुळणी करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतोय. एक्झिट पोलनंतरही ते थांबलेले नाहीत, हे विशेष! #एकचप्रश्न आपल्या मराठी नेत्यांमध्ये सध्या अशी धडाडी का दिसत नसावी?
Tweet media one
35
15
302
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
5 years
या विकृताविरोधात पोलिसांनी कारवाई केली. रश्मीबद्दलची विकृती ज्याच्या सडक्या मेंदूतून फसफसली त्याच्याविरोधात @BJP4Maharashtra @ChDadaPatil @Dev_Fadnavis थेट हकालपट्टीची कारवाई केलीत का? केली असेल तर चांगलंच, पण नसेल तर करा. @VijayaRahatkar ताई असे विकृत कसे खपवून घेता!
@Marathi_Rash
Rashmi Puranik
5 years
For your kind information @SPNashikRural #Help
Tweet media one
150
252
1K
19
42
303
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
8 months
#मराठाआरक्षण #पुढारीन्यूज उपोषणाचा पाचवा दिवस. #मनोज_जरांगे यांची प्रकृती ढासळतेय, मराठा समाजात संताप वाढतोय! नेते फोडून पक्ष मारण्यात गुंतलेल्या सत्ताधाऱ्यांना आवाहन, हवंतर पक्ष मारा, पण माणूस जगवा! #जागा_सरकार_जागा_जरांगेंना_जगवा पुढारी न्यूज चॅनलवर थेट अंतरवाली सराटीतून...
Tweet media one
15
128
307
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
4 years
शिक्षणसेवक ६ हजार. DHS CPS MBBS पदविकाधारक निवासी डॉक्टर ७ हजार ५००. मंत्री, नोकरशहांना शक्यच होणार नाही, पण फक्त कल्पना तर करून पाहा. एवढ्या पैशात किमान एक आठवडा कुटुंबासह स्वत:चा खर्च भागवून दाखवावा. सरकारी सोयीसवलती न वापरता. कल्पनाही करवणार नाही. मग त्यांनी कसं जगायचं?
@davane_amit
DavaneAmitSubhashrao
4 years
@AUThackeray @TulsidasBhoite @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @ANILGALGALIRTI @mnsadhikrut DHS CPS MBBS diploma resident doctor वर खूप कमी विद्यावेतन देऊन सरकार योद्धा सोबत अमानवी वागणूक देत आहे,कृपया समान काम समान डिग्री मग असमान विद्यावेतन का?
2
10
21
73
253
297
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
7 years
शांतपणे आपलं मागणं मांडलं जात असतानाच ऐकलं जावं. पात्रता परीक्षांच्या निकालाआधारे शिक्षक भरती त्वरित सुरु करावी. खाजगी शाळांसाठीही असे पात्रताधारक शिक्षकच सक्तीचे करावे. मागण्या अवास्तव वाटत नाहीत. सोमवारी #शिक्षकभरती_आंदोलन #मुंबई आझादमैदानात धडकणार. आता तरी कुणी ऐकणार?
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
23
221
295
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
5 years
#कोरोनायोद्धे #CoronaWarrior मुख्यमंत्री उ���्धव ठाकरे: "मी बोलतो, म्हणजे सर्व नेते बोलतात. अजितदादा,टोपे,वळसेपाटील,थोरात. विप नेत्यांशीही चर्चा. राजही सूचना करतो. पंतप्रधान मोदी, अमित शहा, जावडेकरांशी बोलणं होतं. केंद्र सरकारचंही सहकार्य. सर्वांनाच धन्यवाद!" इतर नेते आदर्श ठेवतील?
Tweet media one
4
46
294
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
4 years
हे आहेत विनायक हेमाडे. नाशिकचे शेतकरी. त्यांनी कष्टाच्या बळावर चांगलं उत्पन्न घेतलं. त्यामुळेच कोट करून मीही कौतुक केलं. ती बातमी खरीच. पण ट्विटरकरांनी ट्वीट केलेले छायाचित्र त्यांचे नव्हते. ट्विटरकर मित्रांनी ते वृत्तपत्रातील बातमीतून घेतले होते. लवकरच हेमांडेंची यशोगाथा मांडतो.
Tweet media one
2
44
297
@TulsidasBhoite
Tulsidas Bhoite
7 years
डोकं वापरा डोकं भडकवू नका डोकं भडकवू देऊ नका ठणकावून सांगा फूटपाड्यांना बस्स झाली लावालावी आता नाही बळी पडणार आम्ही देश आमचा एकच वसा माणुसकीचा एकच एकजुटीची महापंचायत #एकचआम्ही! खास लक्षवेधी चर्चा  जय महाराष्ट्रवर संध्याकाळी 5.56, रात्री 8.26, बुधवारी दुपारी 12.26
Tweet media one
16
70
287