खिशात पैसे नव्हते पण डोळ्यात असंख्य स्वप्ने होती. फॅशन स्ट्रीट पॅरीस होते आणि डोंबिवली केंब्रीज. लोकल ट्रेन हीच आलिशान कार होती आणि वडा पाव ५ स्टार डिश. कटिंग चहा हेच एनर्जी ड्रींक होते आणि आमिर खान आवडता हिरो. नशिबाने यातील अनेक गोष्टी आजही माझ्यासोबत तशाच टिकून आहेत!!!
#meat20
Our film ‘Nude’ received an ‘A’ certificate without any cuts!!! The entire CBFC special jury team headed by Mrs. Vidya Balan gave us a standing ovation!!! Thank you everyone for your kind support 👍🏽👍🏽👍🏽
आज महाराष्ट्रदिनी कळविण्यास अतिशय आनंद होतो आहे कि 'न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल' ह्या अत्यंत प्रतिष्ठित फिल्म फेस्टिवल मध्ये 'न्यूड' ह्या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट व सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (कल्याणी मुळ्ये ) हि नामांकन प्राप्त झाली आहेत.
#NudeTheFilm
#ravijadhav
सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!! ही शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वानं झळाललेल्या सुराज्याच्या आणि स्वराज्याच्या दिशेने नेणारी ठरो!!!
स्वराज्याचे दुसरे छत्रपती श्री शंभूराजेंना मानाचा मुजरा 🙏🏽
आज शिवशंभु राज्याभिषेक दिन.
सन १६८१ साली, संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला होता. संभाजी राजे शिवरायांनंतर स्वराज्याचे दुसरे #छत्रपती झाले!!!
Happy birthday dear
@atul_kulkarni
♥️ The strength behind
#natarang
. By the way This was the interval frame of Natarang and I still love that magical transformation 🙏 looks easy but very difficult to achieve. Very few people can do it like you do Atul
#perfection
at the core!
तब्बल वीस वर्षांनंतर व्हेनिस चित्रपट महोत्सवातील स्पर्धा विभागात एका ‘भारतीय’ चित्रपटाची निवड झाली आहे. अभिमानाची गोष्ट हि आहे की हा चित्रपट ‘मराठी’ आहे. तरुण दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे याचा ‘द डिसायपल’! त्रिवार अभिनंदन चैतन्यआणि टिम 👍🙏♥️
कळविण्यास अतिशय आनंद होतो आहे कि इंडो अमेरिकन आर्ट कौंसिलच्या 'न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल' ह्या अत्यंत प्रतिष्ठित फिल्म फेस्टिवल मध्ये 'ओपनिंग फिल्मचा सन्मान' मिळवणारा 'न्यूड' हा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. सर्व टीमचे अभिनंदन.
#ZeeStudios
#Athaansh
#NudeTheFilm
#27April
काल टाईमपासला ५ वर्षे पुर्ण झाली. ह्या चित्रपटाने ईतिहास घडविला.
बरीच तरूण मंडळी टाइमपास ३ विषयी सतत विचारतात.
त्यांना सध्या इतकेच सांगीन की...
लवकरच!!!
नमस्कार,
आज ‘स्वातंत्र्य दिनाच्या’ शुभ समयी सादर आहे माझ्या नव्या चित्रपटाचे पहिले पोस्टर.
मला खात्री आहे हा चित्रपट मनोरंजनासोबत लाखो तरुण-तरुणींना स्वातंत्र्य, स्वाभिमान आणि प्रखर इच्छाशक्तीची खरी व्याख्या समजवेल.
आपला सर्वांचा आशिर्वाद असावा 🙏🏽
आज ‘कच्चा लिंबू’ ला "सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट" म्हणून देशाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल अत्यंत समाधान वाटले.
काटदरेंच्या अत्यंत आव्हानात्मक भूमिकेसाठी माझ्यावर विश्वास ठेवल्या बद्दल माझा मित्र प्रसाद ओक याचे शतश: आभार 🙏🏽
#NationalFilmAwards
एकीकडे आपण ‘तेरी-मेरी’ करीत राहातो व दुसरीकडे ‘मेरी कोम’ कठोर परिश्रमाने सलग सहाव्यांदा विजयी होते. देशाचे खऱ्या अर्थाने नेतृत्व करते.
#सहावे_विश्वविजेतेपद
व्हेनिस फेस्टीवल मधील तो क्षण ... मराठी चित्रपटाच्या गौरवाचा ... मराठी दिग्दर्शक,पटकथाकाराच्या सन्मानाचा!!! अभिनंदन चैतन्य ताम्हाणे 👏👏👏!!! हा सम्मान तब्बल २० वर्षांनंतर भारतीय चित्रपटाला आणि तो ही मराठी चित्रपटाला मिळाला हे विशेष!!! #म #मराठी
ज्या कोल्हापूरकर,सांगलीकर रसिकांनी इतकी वर्ष आम्हाला सांभाळलं,आमच्या वर उदंड प्रेम केलं ते संकटात असताना आम्हीही मागे राहू शकत नाही.
आम्ही मराठी नाट्य,चित्रपट आणि दूरचित्रवाणी वरील सर्व कलाकार नेहमी तुमच्या सोबत आहोत.
#marathikalakarwithmaharashtra
सर जे. जे. उपयोजित कला महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचे त्रिवार अभिनंदन!
कलात्मक दृष्टी, उत्तम निरीक्षण, संवेदनशील स्वभाव आणि कणखर विचार असलेले नेतृत्व महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून लाभत आहे याचा एक रंगकर्मीं म्हणून मला अत्यंत आनंद होत आहे!!!
भावपुर्ण श्रद्धांजली विजू मामा 🙏🏽 असंख्य लोकांना आपण आपल्या अभिनयाने सतत आनंद दिला व हसत खेळत जगणे शिकवले. आपली नाटके, चित्रपट व एक सच्च्या माणूस म्हणून जगणे आम्हाला प्रेरणा देत राहतील 🙏🏽
नागराजने काढलेला दुसरा सेल्फी 🙂
फ्रॅन्ड्री पासून जुळलेली आमची ‘नाळ’ अजूनही अतूट आहे!!! नागराज, सुधाकर रेड्डी, मंगेश कुलकर्णी, अश्विनीकुमार पाटील व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना आज प्रदर्शीत होणाऱ्या ‘नाळ’ साठी ‘सैराट’ शुभेच्छा!!!
@Nagrajmanjule
@ZeeStudios_
परंतू आता काही दिवस सोशल मिडीयाला रामराम. बातम्यांना रामराम. वादांना रामराम (जे कदाचित येतच राहतील प्रत्येकाच्या फायद्यानूसार)...
हा रामराम पळवाट नाही... तर नव्या चित्रपटाच्या लिखाणासाठी मला हवी असलेली ‘Space’ आहे. लवकरच भेटू 👍🏽
#MarathiCinemaRocks
#ShowMustGoOn
#ProudMarathi
तीन पिढ्यांचे मनोरंजन करणारे, आपल्या कामाच्या ध्यासाने सतत प्रेरणा देणारे, उत्तम वाचक, आपल्या भाषेवर प्रचंड प्रेम व प्रभुत्व असणारे महानायक अमिताभ बच्चन यांची ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कारासाठी निवड झाली हे ऐकून प्रचंड आनंद होतोय!!! अभिनंदन
@SrBachchan
सर 🙏🏽🙏🏽🙏🏽
प्रत्येक मोठ्या चित्रकर्मीच्या मृत्यूनंतर त्याचा पण धंदा करणाऱ्या सर्वांचा
जाहीर निषेध. ह्यालाच मढ्यावरच्या टाळूवरचे लोणी खाणे असे म्हणतात हे लक्षात घ्या 🙏🏽