![Anil Shidore अनिल शिदोरे Profile](https://pbs.twimg.com/profile_images/1362609278113116162/Xhb1J2au_x96.jpg)
Anil Shidore अनिल शिदोरे
@anilshidore
Followers
61K
Following
795
Statuses
20K
नेता आणि प्रवक्ता, महाराष्ट्र नवनिर्माण सेना https://t.co/njFv7P6A76, Founder Director GreenEarth, Volunteer, MAITRI https://t.co/ECyumXcTcF
Pune, Maharashtra
Joined November 2009
मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पाकडे बारकाईनं पाहिल्यावर काय दिसतं? जागतिक महत्वाचं हे शहर स्वतःचा खर्च स्वतः करू शकत नाही. महाराष्ट्रातल्या इतर महानगरपालिकांची अशीच स्थिती आहे. असं परावलंबन महानगरांच्या विकासाला आणि म्हणून तिथे रहाणाऱ्यांसाठी मारक आहे. #मुंबई #Mumbai
1
10
90
शिक्षण हक्क कायद्याचा उद्देश गरीब घरातील मुलांना दर्जेदार शाळांमध्ये, जिथे श्रीमंत घरातील मुलं शिकतात, शिक्षण घेता यावं असा आहे. ह्या योजनेअंतर्गत त्या प्रत्येक पाल्याचं शुल्क राज्य-सरकार भरतं. परंतु माहिती अशी आहे की सरकारकडे शाळांचे सुमारे २,४०० कोटी रूपये थकलेले आहेत. आता ह्यामुळे पुण्यातील शाळांनी असा निर्णय घेतला आहे की पुढील वर्षी ह्या योजनेअंतर्गत ज्यांचा प्रवेश होईल त्यांच्याकडून अगाऊ पूर्ण शुल्क घ्यायचं आणि नंतर सरकारचे पैसे आले की परत करायचं. असं झालं तर योजनेचा आत्माच हरवला जाईल. राज्य सरकारनं लक्ष द्यावं.. @CMOMaharashtra
4
11
52
RT @MeChinya: तीव्र ��वामानाचा शिक्षणाला फटका @girishkuber @Ksiddharth2011 @SujitTambade73 @Hosalikar_KS
@aparanja…
0
4
0
मित्रांनो, जरूर अर्ज करा !
भारतात अक्षय ऊर्जेबद्दल(#RE)जागरूकता निर्माण करण्यासाठी माहितीची निर्मिती व प्रसार करण्यासाठी, संवादकांकडून प्रस्ताव मागवण्यात येत आहेत.इंग्रजी,हिंदी,तमिळ व मराठी भाषांतील अर्ज स्वीकारले जातील.अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत:१७फेब्रुवारी २०२५,रात्री११.५९
0
5
36
गेली सुमारे १७-१८ वर्ष मी मुंबईत दादरला शिवाजी पार्क (शिवतीर्थ) वर चालतोय. पहाटे किंवा सायंकाळी फेरफटका मारायचा इतका रम्य अनुभव फार कमी ठिकाणी मिळतो. पण, सध्या तिथली मजा थोडी कमी होऊ लागली आहे. विस्तीर्ण मैदानाचा अनुभव सगळ्या बाजूनी मिळत नाही. काही ना काही अडथळे येताहेत. मोकळ्या जागा कमी होत चालल्या आहेत. बा��धकामं होताहेत. बसायची बाकं मोडकळीस आली आहेत. अर्थात, तसं असलं तरी तिथे फिरण्याची मजा अजूनही आहे. आता मात्र तिथे अधिक बांधकामं, विविध पाट्या, जाहिराती लावून तिथलं सौंदर्य बिघडवू नये. काय करावं ह्या पेक्षा आता शिवाजी पार्कवर काय करू नये हे ठरवायची वेळ आली आहे. #मुंबई #शिवाजीपार्क #Mumbai
4
14
157
सरकारच्या धोरणांकडे चिकीत्सक नजरेने पहाण्याचं काम काही संस्था करतात आणि स्वतंत्रपणे त्यावर प्रकाश टाकत असतात. अशाच एका संस्थेच्या मार्गदर्शक मंडळात काम करण्यासाठी त्यांनी पाचारण केलं आहे .. @TanmayKanitkar
10
15
133
आशुतोष गेली बरेच दिवस कोकणात पायी फिरतो आहे. लोकांशी बोलतो आहे. कोकणाचं पर्यावरण हा त्याचा विषय आहे. हे फिरताना त्याला आलेले अनुभव तो नियमितपणे फेसबुकवर लिहितो आहे. सोबत त्याचा दु���ा देतो, तुम्ही अवश्य वाचा. जेष्ठ पत्रकार सतीश कामतांनी त्यावर आजच्या लोकसत्तेत लेखही लिहिला आहे. तो ही जरूर पहा.. त्याचंही छायाचित्र सोबत दिलं आहे. #कोकण #पर्यावरण
0
26
105
“ध्वनिक्षेपकाचा आणि धर्माचा काही संबंध नाही” असा स्पष्ट निर्वा��ा न्यायालयानं दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी उचललेला मुद्दा किती अचूक होता हे ह्यावरून स्पष्ट होतं. ह्या निवाड्यात न्यायालयानं पोलीसांनाही फार स्पष्ट निर्देश दिले आहेत आणि ध्वनिप्रदूषण आरोग्याच्या दृष्टिनं किती हानीकारक आहे हे ही सांगितलं आहे. माझं निरीक्षण असं आहे की रात्री-अपरात्री, मध्यरात्री फटाके वाजवणे, मोठमोठ्या आवाजात हॅार्न वाजवत गाड्या पळवणे हे प्रकार वाढले आह��त. न्यायालयानं दिलेल्या आदेशांनुसार पोलीसांनी अधिक सतर्क रहायला हवं..
27
99
439
नागरिकांचं सरकारच्या विविध कामांवर लक्ष हवं. त्यासाठी तसा ��ास्त्रीय अभ्यास करून तो सर्वांसमोर आणण्याचं कामही नागरिकांच्या गटांनी करायला हवं. लोकशाहीतील हे एक महत्वाचं कार्य (function) आहे. PRO - Policy Research Organisation ही अशीच एक संस्था आहे.. त्यांनी नुकताच महानगरपालिकांच्या ई-गव्हर्नन्सचा अभ्यास करून काही निष्कर्ष काढला आहे.. सोबत दुवा दिला आहे तो जरूर पहा. ह्यात पुणे महानगरपालिकेचा पहिला क्रमांक आहे हे बघून मात्र काही लोकांना धक्का बसेल, परंतु हे इथे सांगायला प��हिजे की त्यांनी २९ महानगरपालिकेत पहिला क्रमांक काढला आहे, ह्याचा अर्थ पुणे महानगरपालिकेची कार्यप्रणाली "त्यातल्या त्यात" उत्तम आहे, आदर्श आहे असं नाही. PRO चे इतर अभ्यासही जरूर पहा. त्यांना जोडून घ्या. ताकद द्या. अशा संस्था आपली लोकशाही, आपल्या शासकीय संस्थांचा कारभार सुधारतील, अधिक पारदर्शक करतील, उत्तरदायी कर��ील. @TanmayKanitkar .
2
2
16
मोहन हिराबाई हिरालाल आज गेला. त्याच्याबरोबर जंगलात खूप फिरायचो. त्यानं “मेंढा जंगल अभ्यास गट” सुरू ���ेला त्यावेळी सतत भेटी व्हायच्या. तेंव्हा माझं रहाणंही नागपूरला होतं. आम्ही खूप बोलायचो. प्रवासात, जंगलात चालताना. सतत. विद्यापीठात न शिकवलं जाणारं समाजशास्त्र तो सांगायचा. “प्रोसेस” हा त्याचा आवडता शब्द. समाज, समाजातला बदल, ��टना, आंदोलनं हे सगळं तो एक प्रक्रिया म्हणून बघायचा. मेंढा गावात तिथल्या लोकांबरोबर त्यानं लोकशाहीतील एक प्रयोग केला आहे. सहभागी निर्णयप्रक्रियेचा प्रयोग. जगात कुठं “औद्योगिक लोकशाही” किंवा लोकशाहीतील प्रयोगांबाबत अभ्यास करायचा तर मोहनचं काम ओलांडून जाता येणार नाही. मोहन ७० च्या झपाटलेल्या दशकात कार्यरत झाला. परंतु जगात लोकशाही संकटात असताना त्याचा ��क प्रयोगकर्ता जाणं हे मात्र सूचक आहे.
3
2
61