Mahesh Meena Madhukar Bhartiya Profile
Mahesh Meena Madhukar Bhartiya

@BhartiyaMahesh

Followers
10K
Following
6K
Statuses
3K

Proprietor of Bhashya Prakashan

Mumbai, India
Joined February 2019
Don't wanna be here? Send us removal request.
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
7 hours
2025 च्या शैक्षणिक वर्षाची CET परिक्षेच्या मॅाक टेस्टची फी रदद करावी!
Tweet media one
0
14
43
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
7 hours
आपल्या लक्षात आलंय तर तिथे स्वर्चाने शेड बांधा !महाराष्ट्रानेआणि सरकारी नोकरीने आपल्याला भरभरून दिले आहे!
@AuthorVishwas
Vishwas patil
1 day
शिवरायांना जन्म देणाऱ्या महापराक्रमी महापिता शहाजीराजांनाच विसरलेला स्वार्थी महाराष्ट्र ! 360 वर्षांमध्ये महापित्याच्या समाधीवर गंजलेल्या पत्र्याचे सुद्धा छप्पर नाही ! ---- विश्वास पाटील शिवरायांसारख्या महापुरुषाला आणि "#महाराष्ट्र "या कल्पनेला जन्म देणारे पराक्रमी शहाजीराजे कर्नाटकाच्या मातीत ( कशाबशा 20 गुंठे जमिनीवरच्या उघड्या माळरानावर ) एकाकी स्थितीत चिरनिद्रा घेत आहेत. त्या वीर पित्याच्या समाधीवर साधे गंजक्या पत्र्याचे सुद्धा छप्पर नाही. ती दुरवस्था पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी आणि पोटात गोळा उठेल ! गनिमी काव्याच्या युद्धतंत्राची दीक्षा #महागुरु शहाजी महाराजांनीच आपले पुत्र शिवरायांना दिली होती. एवढेच नाही तर शिवरायांची प्रसिद्ध राजमुद्राही संस्क��त भाषेचे प्रकांड पंडित असलेल्या शहाजीराजांनी स्वतः लिहिली होती. जेव्हा 1624 साली दिल्लीचा बादशहा औरंगजेबाचा आजा जहांगीर आणि विजापूरचा #इब्राहिम_आदिलशहा यांची फौज इथे चालून आली होती. तेव्हा भातवडीच्या लढाईत शहाजीराजे आणि मलिक अंबर या दोघांनीच "गनिमी कावा" नावाच्या युद्धमंत्राला पहिल्यांदा जन्म दिला होता. त्याच्या जोरावर तेव्हा केवळ चाळीस हजारांच्या फौजेनिशी या दोघांनी विजापूरकर आणि दिल्लीकरांच्या एक लाखांच्या फौजेचा धुव्वा उडवला होता. नुकताच मी कर्नाटकात जाऊन आलो. शिमोगा या शहरापासून एक तासाच्या अंतरावर असणाऱ्या होजिगिरी नावाच्या खेड्यात( जिल्हा दावणगिरी )शहाजी राजांच्या समाधी स्थळाला भेट दिली. 23 जानेवारी1664ला याच परिसरात राजांचा घोड्यावरुन पडून अपघात झाला. इथेच महानिर्वाण झाले . आज फक्त एकवीस गुंठे जागेत गावाबाहेरच्या माळावर राजांची अत्यंत छोटी एकाकी समाधी दिसते. एखाद्या गरीब शेतकऱ्याच्या शेतातली आई-वडिलांची समाधी सुद्धा यापेक्षा खूप चांगली असते हो! मल्लेश राव सारख्या मंडळीनी दावणगिरी मध्ये शहाजीराजे स्मारक समिती स्थापन केली आहे. तिथून ऐंशी किलोमीटर अंतरावरून ही मंडळी महिन्या-दोन महिन्यातून अधेमध्ये इथे येतात . छोटे व्यवसाय करणारी, मराठी भाषा न जाणणारी ही महाराष्ट्रीयन मंडळी तिकडे शहाजीसेवा करायचा प्रयत्न करतात. परंतु त्यांची ताकद खूप छोटी आहे " जय शिवाजी जय भवानी"अशी घोषणा सर्वच राजकीय पक्ष इकडे देतात. पण शिवरायांसारख्या सामर्थ्यवान पुरुषाला घडविणाऱ्या त्या महान पित्याकडे महाराष्ट्राने मात्र साफ दुर्लक्ष केले आहे. गेली चाळीस वर्ष वेगवेगळ्या माध्यमातून मी शिवचरित्राचा अभ्यास करतो आहे. दरम्यान मी स्वत: दोनशेहून अधिक गडकिल्ले पाहिले आहेत. सखोल संशोधन करता अशी दिसते की, मराठी इतिहासकारांनी व जाणत्या मंडळींनी मुद्दामच छत्रपती शहाजीराजे यांचा खराखुरा इतिहास , त्यांचं असाधारण राष्ट्रीय योगदान, तसेच #शिवराय व त्यांच्या श्रेष्ठ पित्यामधील मुलखावेगळे नाते हा सारा इतिहास, हया सत्य कागदोपत्री घटना अगदी जाणीवपूर्वक दृष्टिआड केल्या आहेत..दडपून ठेवलया आहेत शिवरायांचे गुरु म्हणून वीस-बावीस जणांची नावे चिकटवली गेली. पण पूर्ण अभ्यासाअंती मी डोळे झाकून हया प्रश्नाचे उत्तर असे देईन की, छत्रपती शिवरायांचे एकच महागुरू होते ज्यांचे नाव शहाजी महाराज ! थोडक्यात #जिजाऊ नावाची महासागरासारखी माता आणि शहाजीराजांसारखा पहाडासारखा पिता दैवानेच शिवप्रभूंच्या पाठीशी दिला होता. 1636-- 37 च्या दरम्यान बेंगलोरचा महाकिल्ला केंपेगोवडा या राजाकडून रणदुल्लाखान आणि त्याचा पुत्र रुस्तुमेजमा यांनी सात महिन्याच्या लढाईनंतर जिंकून घेतला होता. तो तसाच त्यांनी शहाजी राजांच्या निवासासाठी कायम देऊ केला होता. तेव्हा या किल्ल्याला आजच्या दिल्ली दरवाजा सारखे नऊ महादरवाजे होते. किल्ल्याचा घेर एक मैल परिघाचा होता .माहुलीच्या किल्ल्यावर बादशाह शहाजानशी तह केल्या नंतर शहाजी राजाना जुलमाने कर्नाटकात जावे लागले. तिथे गेल्यावर कित्येक वर्ष एखाद्या स्वतंत्र राजा-महाराजा सारखे राजे बेंगलोरच्या किल्ल्यात राहत होते. शिवरायांचा पुण्यात सईबाईंशी विवाह झाल्यानंतर शहाजीराजांनी त्यांना कर्नाटकात बोलावून घेतले होते. बेंगलोरच्या किल्ल्यातच शहाजी महाराजांनी सोळाशे 40 ते 42 च्या दरम्यान दोन वर्ष स्वतः युद्धशास्त्राचे प्रशिक्षण शिवराय, व्यंकोजी राजे, कोयाजी बाबा अशा आपल्या लाडक्या पुत्रांना दिले होते.. शहाजीराजांनी शिवरायांना पुण्यास पाठवताना त्यांच्या नावे पुण्याचा मोकासा करून दिला होता. आपल्या वडिलांनी लिहिलेली सुंदर राजमुद्रा शिवराय वयाच्या बाराव्या वर्षापासून कागदोपत्री वापरू लागले होते . त्याआधी संगमनेर जवळच्या पेमगडावर निजामशहाच्या पोराला नाममात्ररित्या गादीवर ठेवून शहाजीराजांनी स्वतंत्र राज्याचा, स्वराज्याचा पहिला प्रयोग पेमगड-किल्ल्यावर केला होता.. (1632-1635 ) . तेव्हा महाराजांकडे नाशिकच्या गोदावरी पासून पुण्याच्या भीमेच्या काठापर्यंत 64 किल्ले होते. शहाजीराजे आवरत नाहीत म्हणून हिंदुस्तानचा बादशहा आणि औरंगजेबाचा बाप शहाजान 1634 मध्ये महाराष्ट्रावर चालून आला होता. तेव्हा बादशहाने यमुनेच्या काठावरचे ताजमहाल या भव्य इमारतीचे चालू असलेले बांधकाम बाजूला ठेवले होते. दक्षिणेत एक स्वतंत्र राजा उभा राहतोय म्हणून इथे येऊन दीड वर्ष शहाजीराजांशी त्याला संघर्ष करावा लागला होता.. स्वराज्याचे पहिले सरनोबत माणकोजी दहातोंडे आणि चाकणचा वीर फिरंगोजी नरसाळा ही शहाजीराजांनीच आपल्या खजिन्यातली अमुल्य रत्ने शिवरायांना दिली होती. या साऱ्या सत्य व वास्तव घटना अमान्य करायची तथाकथित इतिहासकारांची हिंमत आहे का ? त्या काळात विजापूरच्या सर्वात शूर अशा अफजलखानाचा शिवाजीराजांनी जावळीच्या रानात वध केला . तेव्हा शहाजीराजे विजापुरात सरदार होते. अफजलची दुःखद वार्ता ऐकून बड्या बेगमेला बेहोशी आली होती. त्या जागेवर कोसळल्या होत्या. पण त्या दरम्यान पुत्राच्या गुन्ह्यासाठी विजापुरात दरबारी सेवेत असलेल्या शहाजी राजांच्या अंगाला स्पर्श करायची तिथे कोणाचीही हिम्मत झाली नव्हती. यावरूनच शहाजीराजा नावाच्या पहाडी पुरुषाचे विजापूरवर किती उपकार असतील व त्यांचा कसा दरारा असेल याची साधारण कल्पना येईल. इतकेच नव्हे तर आदिलशहाची फारसी पत्रे सर जदुनाथ सरकार यांनी अव्वल इंग्रजीत प्रकाशित केली आहेत. त्रयस्थाना सुध्दा लिहिलेल्या पन्नास-साठ पत्रांमध्ये आदिलशहा नेहमीच शहाजीराजांचा गौरव "Shahajiraja is a pillar of our empire (शहाजीराजे आमच्या आदिलशाहीचे प्रबळ खांब आहेत) असा करायचा. याबाबत सुजान वाचकांसाठी मी एकच उदाहरण देईन . 1662 मध्ये उन्हाळ्यात महाराष्ट्रात शिवाजी राजे आले होते . तेव्हा बावीस वर्षांच्या दीर्घ वियोगानंतर या महान पिता-पुत्रांची भेट जेजुरीला मल्हारी रायाच्या गाभाऱ्यात घडून आली होती. त्यादरम्यान शाहिस्तेखानाच्या बुडाखाली पुणे होते. त्यामुळे राज्यांचा परिवार राजगडावर राहत होता. तेव्हा शिवरायांनी आपल्या पित्याला हतीवर सोन्याच्या अंबारीत बसवले होते. त्यांच्यासमवेत अंबारीत मातोश्री जिजाऊसाहेब आणि मातोश्री तुकाबाई बसल्या होत्या. हत्तीवरून मिरवणुकीने मिरवत शिवराय जेजुरीपासून ते राजगडापर्यंत आपल्या पिताश्रींनी घेऊन आले होते. पण त्यांचा मानमरातब राखण्यासाठी शिवराय मात्र आपल्या प्रिय पित्याची पादत्राणे पोटाजवळ पकडून जेजुरी पासून ते राजगडा पर्यंत चक्क अनवाणी पायाने चालत गेल्याचे पुरावे इतिहासच देतो. परवा 21 जानेवारीला शहाजीबाबांच्या दूर कर्नाटकाच्या रानातल्या त्या छोट्या दगडी समाधी जवळ मी आणि माझी पत्नी चंद्रसेना नतमस्तक झालो होतो. राजांच्या स्मृतींची ती आजची दुरावस्था पाहून माझ्या डोळ्यांतून झरझर अश्रुधारा वाहत होत्या.. याच गावात शहाजी राजांनी बांधलेले जुने वाडे आजही तसेच अस्तित्वात आहेत. पण गेल्या साडेतीनशे वर्षाच्या काळात अन्य मंडळींनी त्याच्यावर कब्जा केला आहे. संबंधित छायाचित्रे बाजूला दिली आहेत. ती जरूर पहा. तसेच त्या काळात दक्षिणेतल्या मराठी बांधवांना तुळजाभवानीच्या दर्शनासाठी एवढ्या दूर येणे शक्य व्हायचे नाही, म्हणूनच शहाजीराजांनी 16 62 मध्ये बांधलेले माता भवानीचे एक जागृत मंदिर सुद्धा इथून आठ किलोमीटरवर आहे. आज अस्तित्वात असलेली ती समाधीची जागा केवळ एका महाराष्ट्र पुत्राच्या उपकारामुळे वाचली आहे याची आठवण माझे इतिहास संशोधक मित्र इंद्रजीत सावंत व महेश पाटील बेनाडीकर यांनी मला करून दिली. नेहरूंच्या मंत्रिमंडळात डॉक्टर पंजाबराव देशमुख मंत्री होते. तेव्हा कर्नाटकाच्या दौऱ्यावर असताना ते होजिगिरीच्या रानात या पवित्र ��्थळाचा स्वतः शोध घेत गेले. त्यांनीच तेव्हा आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या यादीमध्ये हे ठिकाण घेतले. नाहीतर ही अल्पस्वल्प जागा सुद्धा जागेवर राहिली नसती. दुर्दैवाने आज महाराष्ट्रातील साहित्य, इतिहास आदी क्षेत्रातील कोणीही इकडे फिरकत नाहीच. परंतु गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षात ना कोणी इकडे मंत्रालयातले फिरकले ना कोणी महालातले गेले. आज सर्व राजकीय पक्ष सागरात शिवरायांचे स्मारक बांधण्याची व त्यासाठी हजारो कोटी खर्च करायची भाषा बोलत आहेत. ते स्मारक होईल तेव्हा होईल. पण त्याआधी शिवरायांना जन्म देणाऱ्या त्यांच्या पित्याच्या सावलीसाठी कर्नाटकात एक टेम्पो भरून पत्रे तरी पाठवून द्यायची व्यवस्था करू या. महाराष्ट्राच्या महापित्याच्या स्मारकापासून दूर होताना माझे मन भरून आले होते . माझ्या अंगात लेखकीय रक्त आणि मेंदूत कल्पनेचे पंख असल्यामुळे मी त्या स्मारकाच्या द्वाराजवळ थबकलो. थोडे आभाळाकडे पाहिले. मनात कल्पना केली जर हे स्मारक बघायला शिवराय आणि जिजाऊ साहेब आज स्वतः तिथे दाखल झाले तर त्यांच्या मनाची काय अवस्था होईल ? जिजाऊ मातोश्री हळहळत बोलतील," आम्ही या मराठी मुलखासाठी कोणता वसा, वारसा आणि भविष्यकाळ दिला ?अन बाळांनो दिल्लीकर जहांगीर आणि शहजान सारख्या बादशाहाना पुरून उरणार्‍या आमच्या महाप्रतापी कुंकवाच्या धन्याच्या स्मृतींचे आपण हे काय हाल चालवले आहेत ?"--- ( संक्षिप्त) -विश्वास पाटील @mehtapublishing @WestlandBooks @amazonbooks @TV9Marathi @News18lokmat @zee24taasnews #vishwaspatil #chatrapatishivajimaharaj #chatraptisambhajimaharaj #ShivajiMaharaj #ShahajiRaje #MaharashtraHistory #ShivajiLegacy #ShahajiMaharajMemorial #Karnataka #MaharashtraPride #MarathaHistory #HistoricalInjustice #ShivajiAndShahaji #MarathaWarriors #LegacyOfShivaji #MarathiHeritage #UnseenHistory #RememberingShahaji #HistoryInTheMaking #MaharashtraFuture #HistoricalTruth #SacrificesOfShahaji #JaiShivaji #MaharashtraStruggles
Tweet media one
1
5
28
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
3 days
0
2
5
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
3 days
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
3 days
*Prabuddh Bharat Exclusive Interview* *Part 1 ―* 💥 *डॉ. क्षिप्रा उके आणि शिवशंकर दास यांच्या लढ्याची कहाणी!*✊💪 * *बौद्धिक संपदा चोरीत अट्रोसिटीचा गुन्हा दाखल; महाराष्ट्र सरकारची अपील सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द !* * *नागपूर खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टात कायम
0
1
5
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
3 days
*Prabuddh Bharat Exclusive Interview* *Part 1 ―* 💥 *डॉ. क्षिप्रा उके आणि शिवशंकर दास यांच्या लढ्याची कहाणी!*✊💪 * *बौद्धिक संपदा चोरीत अट्रोसिटीचा गुन्हा दाखल; महाराष्ट्र सरकारची अपील सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द !* * *नागपूर खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टात कायम
0
10
40
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
3 days
मग Congress वंचितला B टीम महाराष्ट्रात म्हणते, मग आम्ही भाजपची B टीम Congress आहे हे म्हणावे का?
@VBAforIndia
Vanchit Bahujan Aaghadi
3 days
वाह, बहन, वाह! हिपोक्रिसी की भी सीमा होती हैं। ये वही मोहतरमा हैं जो लोकसभा चुनावो के बाद विश्लेषण कर रही थी की कैसे वंचित ने कांग्रेस को हराया! लेकिन क्या कर रहे साहब! हम छोटी जात के हैं। हम वंचितों और बहुजनों की आवाज़ उठाते हैं। बी-टीम की गाली तो बस हमें ही मिलेगी और इन्हे लोग पोलिटिकल पार्टी बोलेंगे! ये जातिवाद नहीं तो क्या हैं?!
Tweet media one
0
10
47
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
4 days
शिष्टमंडळ आणि अधिकारी यांच्यात ही एवढी मोठी दरी कशाला? त्याला भिती वाटते का?
@eprabuddhbharat
Prabuddh Bharat
5 days
सामजिक न्याय विभाग मुख्य सचिव आणि वंचित बहुजन युवा आघाडी, प्रदेश कमिटीची बैठक संपन्न. मुंबई : महाराष्ट्र राज्यातील सामाजिक न्याय विभाग शिष्यवृत्ती, स्वाधार व बार्टी येथील प्रशिक्षण, जातपडताळणी समित्या तसेच संशोधन विद्यार्थ्या संदर्भात समस्या बाबत काल सामाजिक न्याय विभाग मुख्य सचिव डॉ हर्षदीप कांबळे व वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश कमिटी पदाधिकारी राजेंद्र पातोडे, अमित भुईगळ, विशाल गवळी आणि अमोल लांडगे ह्याची बैठक काल मंत्रालयात पार पडली. या मध्ये सामाजिक न्याय विभाग चे खालील मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. 1. महाराष्ट्र राज्यातील सामाजिक न्याय विभागातील शासकीय वस्तीगृहाच्या अनेक जागा रिक्त आहेत. त्या तात्काळ भरण्याची प्रक्रिया सुरू करावी.तसेच वस्तीगृह संख्या वाढविण्यात यावेत. 2. महाराष्ट्र राज्यातील सामाजिक न्याय विभागाच्या स्वाधारचे पैसे विद्यार्थ्यांना आर्थिक वर्ष संपून जात आहे तरी अद्यापही पैसे मिळाले नाही, त्याचे कारणही तसेच आहे स्वाधारच्या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक अडचण आहे तरी ही समस्या दूर होईपर्यंत ऑफलाईन अर्ज घेऊन विद्यार्थ्यांना स्वाधारचे पैसे तातडीने अदा करावेत. 3. राज्यातील अॅट्रॉसिटीच्या केसेस प्रलंबित असून त्यांना अर्थसहाय्य ही अद्याप दिलेला नाही.गेले आठ वर्षे मुख्यमंत्री ह्यांचे अखत्यारीतील हाय पॉवर कमिटी बैठक झाली नाही.विभाग आणि जिल्हा पातळीवर दक्षता समित्या स्थापन करण्यात आलेल्या नाहीत.त्यासंदर्भात त्वरित कार्यवाही करावी व पिडितांना निधी उपलब्ध करून द्यावा. 4. राज्यातील मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती या योजनेचा लाभार्थ्यांना वर्ष संपत आले तरी विद्यार्थ्यांना लाभ मिळाला नसून त्यासंदर्भात त्वरित प्रक्रिया करावी. 5. एकनाथ शिंदे ह्यांचे काळात सरकारकडून रमाई घरकुल आवास योजना निधी हा दुप्पट करण्याचा निर्णय कॅबिनेटमध्ये घेतलेला असून त्याचा शासन निर्णय प्रलंबित आहे त्यासंदर्भात ही कार्यवाही करावी. 6. महाराष्ट्र राज्यातील शासकीय वस्तीगृहामध्ये विद्यार्थ्यांना दिले जाणाऱ्या भोजनाचा दर्जा खालावलेला आहे.शासकीय वस्तीगृहातील विद्यार्थ्यांच्या भोजनाकरीता शासनाकडून दिले जाणारी निधी जुलै २०२४ पासून आजतागायत मिळाली नसल्या कारणाने भोजन पुरवठा व्यवस्थित होत नाही.त्यामुळे विद्यार्थ्यांना वेठीस धरले जात आहे. 7. महाज्योती मार्फत "महाराष्ट्र शासन लोकसेवा आयोग (अन्न व औषध प्रशासकीय सेवा) मुख्य परीक्षा-2023 उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व चाचणी/मुलाखतीकरीता अर्थ सहाय्य योजना" ही योजना बार्टीकडून राबविण्यात यावी तसे संबंधितांना आदेशित करावे. 8. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना गेल्या अनेक वर्षभरात या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यामध्ये कुठेही झाल्याचे दिसून येत नाही.सदर योजना पूर्णतः सशक्त बनवून संपूर्ण राज्यामध्ये अंमलबजावणी करावी. 9. बार्टी येथील प्रशिक्षण, जातपडताळणी कर्मचारी, जातपडताळणी व्यवस्था ह्यावर देखील चर्चा करण्यात आली.संशोधन विद्यार्थ्याचे विविध बॅच मधील समस्या, सातत्याने बदलत जाणारे निकष आणि नियम ह्यामुळे सातत्याने आंदोलने होत आहेत.त्यामुळे सर्व मागण्या निकाली काढण्यात याव्यात. 10. Barti येथील अधिकारी आणि त्याची वादग्रस्त कार्यशैली सुधारणा करणे बाबत.तसेच कर्मचारी ह्यांना दिला जाणारा त्रास ह्याबाबत मुख्य सचिव डॉ हर्षदीप कांबळे ह्यांना पुरावे सादर करण्यात आले. 11. परदेशी शिष्यवृत्ती साठी लावलेली उत्पन्न मर्यादा काढून टाकण्यात यावी तसेच विद्यार्थी संख्या ५०० करावी ही मागणी देखील करण्यात आली. हे सर्व विषय स्वतः लिहून घेत डॉ कांबळे ह्यांनी तातडीने प्रशासकीय कार्यवाही सुरू करणार असल्याची ग्वाही दिली.तसेच महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील लोकांच्या हिताचे व लोक कल्याणाची संदर्भात कार्यवाही करणार असल्याची हमी वंचित बहुजन युवा आघाडी राज्य पदाधिकारी ह्यांना दिली. --- #PrabuddhBharat
Tweet media one
Tweet media two
1
3
30
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
4 days
वंचित बहुजन आघाडीच्या केन्द्रीय कार्यालयात माता रमाई यांच्या जयंतीनिमित्ताने विनम्र अभिवादन केले!
Tweet media one
2
16
141
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
4 days
BMC SE पदाची ॲानलाईन भरती परिक्षा TCS ION सेंटरवर घेणेबाबतआणि परिक्षेसाठी दिलेले खाजगी परीक्षा केन्द्र रद्द करणेबाबत मुंबई महापालिका आयुक्त यांना निवेदन दिले आहे.
Tweet media one
8
227
219
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
4 days
*'मी ज्ञानाचा सागर उपसताना,तू मात्र माझा संसार शिवत आहेस', गोष्ट बाबासाहेबांच्या 'रामू'ची* माता रमाबाई आंबेडकर यांच्या 128 व्या जन्मदिनानिमित्त बीबीसी मराठीचे प्रतिनिधी नितीन सुलताने यांनी ज. वि. पवार यांची घेतलेली दीर्घ मुलाखत.
0
7
43
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
5 days
आयर्न लेडी मैक्सिकन राष्ट्रपती क्लाऊडीया चेनबाम का करारा जवाब तात्या ट्रम्प को।
@grafidon
अपूर्व اپوروا Apurva Bhardwaj
5 days
मैक्सिकन राष्ट्रपति क्लाउडिया चेनबाम ने ट्रम्प को ऐसा जवाब दिया कि सुनने वालों को भी झटका लग गया। "आपने दीवार बनाने की सोची, पर याद रखिए उस दीवार के उस पार 7 अरब लोग खड़े हैं। ये लोग iPhone छोड़कर सैमसंग या हुआवेई पकड़ लेंगे। Ford और Chevrolet की जगह Toyota, Kia, Honda चला लेंगे। Disney की जगह लैटिन अमेरिकी फिल्में देखेंगे और Nike की जगह मैक्सिकन Panam जूते पहनेंगे। अगर इन 7 अरब उपभोक्ताओं ने ��मेरिकी प्रोडक्ट्स लेना बंद कर दिया, तो आपकी अर्थव्यवस्था दीवार के अंदर ही ढह जाएगी। तब आप ख���द आकर कहेंगे—'प्लीज़, ये दीवार हटा दो।' हम ऐसा नहीं चाहते, लेकिन आपने दीवार मांगी, तो अब दीवार ही मिलेगी। बस याद रखिए, दुनिया बड़ी है और अमेरिका ही सबकुछ नहीं। #Trump #घोरकलजुग #Deportation
Tweet media one
0
3
16
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
5 days
क्रिकेट सामन्यांचे वृत्तांकन विश्लेषण करणारे ज्येष्ठ क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचे निधनाने क्रिकेटविश्वाला धक्का बसला,चैत्यभूमीवर आंबेडकरी अनुयायी घाण करतात या प्रचाराला तिथे रहात असूनही विरोध करून आंबेडकरी अनुयायी यांच्या बाजूने लोकसत्तेत लिखाण केले.विनम्र अभिवादन!
Tweet media one
0
9
62
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
6 days
महाराष्ट्रात, हरयाणात पुन्हा विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात?
@VBAforIndia
Vanchit Bahujan Aaghadi
6 days
स्वतःला संविधानवादी म्हणवून घेणाऱ्या पक्षांनी काय केले ? #MaharashtraAssemblyElection2024 #MaharashtraElection2024 #EVM
Tweet media one
0
14
57
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
6 days
हायकोर्टाने निवडणूक आयोगाला महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील घोटाळा संदर्भात जी नोटीस काढली , त्यामुळे थोड्याच कालावधीत हरयाणा, महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका पुन्हा होऊ शकतात?मतदान घोळाच्या आरोपांवर ॲड. प्रकाश आंबेडकर य... via @YouTube
0
4
23
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
6 days
देशातील मोठमोठ्या मिडीया चॅनल चाटूकारांनी नवीन प्रजासत्ताक जन्माला घालायची घाई झाली असून संविधान संपववायच आहे. संघाला १०० वर्ष पूर्ण झाली आहेत, नवीन संविधानाची पायाभरणी चालू आहे!
@sandeep_PT
Sandeep Manudhane
6 days
Bye bye Constitution 👋
Tweet media one
0
4
40
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
6 days
अरे बाबा , मशीन का क्या करेंगे! महाराष्ट्र मै मशीनसे सरकार बनी यह सब जानते है!
@AamAadmiParty
AAP
6 days
लो जी आ गए रुझान, दिल्लीवाले फिर ला रहे हैं केजरीवाल🙌 #Vote4Jhadu
Tweet media one
0
5
18
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
6 days
अंधभक्तांनी ट्रम्प यावेत म्हणून यज्ञ केलेत, मोदी मोदी मोदी म्हणून बेंबीच्या देठापासून ओरडलेत! तरी ही या बजेटमध्ये अमेरिकन वस्तूंवर करात सूट दिली आहे!
@girishkuber
Girish Kuber
6 days
Hands chained, @US starts deporting Indians. Welcome @realDonaldTrump @POTUS45 अगली बार ट्रंप सरकार…!
Tweet media one
0
5
32
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
6 days
क्षमा सावंत यांना त्यांच्या आईला भेटण्यासाठी विसा नाकारला , ही भारताची परदेशी निती RSS च्या तालावर चालते की संविधानावर? क्षमा यांनी अमेरिकेतील सवर्ण हिंदूनी जो जातीयवाद निर्माण केला त्याविरूध्द लढा दिला, म्हणून अनेक राज्यांनी भेदभावाविरूध्द काय���े केले! याबद्दल त्यांचे कौतुक करणे दूरच त्यांचा विसा नाकारला!
@Prksh_Ambedkar
Prakash Ambedkar
8 days
I learnt earlier today that former Seattle City Councilmember @cmkshama’s application for a visa to India has been denied on three different occasions. Kshama had applied for a visa to see her ailing mother. Is the BJP-led government exercising vendetta against Kshama for introducing a landmark legislation in the Seattle City Council to criminalise caste-based legislation in Seattle? I implore on @DrSJaishankar to personally look into the matter and demonstrate India’s allyship with and support for leaders fighting discrimination.
0
13
65
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
7 days
प्रबुध्द भारत भिमराव आंबेडकर आणि मी नऊ वर्ष बेळगांवहून छापून घेऊन, मुंबईत प्रसिध्द करायचो. पन्नास हजार खपापर्यंत घेऊन गेलो होतो.आज प्रबुध्द भारतचा डिजिटल मिडिया आहे. काळानुसार बदल होतोय.प्रबुध्द भारतला आणि टीमला शुभेच्छा!
@eprabuddhbharat
Prabuddh Bharat
7 days
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 4 फेब्रुवारी 1956 रोजी सुरू केलेल्या ऐतिहासिक पाक्षिक प्रबुद्ध भारताचा आज 69वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने सर्व वाचक, हितचिंतक, वर्गणीदार, जाहिरातदार यांना हार्दिक शुभेच्छा! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या प्रबुद्ध भारतला 69 वर्षे पूर्ण झाली असून, आपण 70व्या वर्षात पदार्पण करीत आहोत. संविधानवादी, फुले-आंबेडकरवादी विचार परंपरा मानणाऱ्या सर्व भारतीयांचे मुखपत्र म्हणून 'प्रबुद्ध भारत' विधायक भूमिका पार पाडत आहे. या ऐतिहासिक ठेवा असलेल्या प्रबुद्ध भारतच्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! ― टीम प्रबुद्ध भारत #PrabuddhBharat
Tweet media one
0
9
44
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
7 days
लंडन स्कूल ॲाफ इकॉनॉमिक्स मध्ये डिग्री तिथेच प्राध्यापक म्हणून काम ,उपराष्ट्रपती, राष्ट्रपती पद भूषवत, डॅा बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातवाला बाळासाहेब,काशिराम यांना मुलाखत झाल्यावर प्रोटोकॉल न बघता सोडायला येणारे के.आर.नारायण यांचा आज जन्मदिवस !
Tweet media one
0
1
7