![MLA Sangram Jagtap Profile](https://pbs.twimg.com/profile_images/1860308540541534208/3CHcF6gg_x96.jpg)
MLA Sangram Jagtap
@sangrambhaiya
Followers
24K
Following
1K
Statuses
4K
Member of Legislative Assembly, #Ahilyanagar | https://t.co/JjsBkdstHQ
Ahmednagar
Joined January 2014
महाराष्ट्र कुस्तीगीर संघ व अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या वतीने आयोजित ६७वी वरिष्ठ गट राज्यस्तरीय गादी व माती कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब लढत स्पर्धेचे बक्षीस वितरण माझ्या व माजी आ. अरुणकाका जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी महाराष्ट्र केसरी कुस्ती किताब विजेता पृथ्वीराज मोहोळ यांना महिंद्रा थार गाडी भेट देण्यात आली तर इतर विजेत्या पैलवानांना बुलेट, स्प्लेंडर व सोन्याची अंगठी देऊन सन्मानित करण्यात आले. अहिल्यानगर शहरामध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा अत्यंत यशस्वी झाली याचा आयोजक म्हणून आनंद आहे. राज्यभरातून आलेल्या पैलवानांच्या रोमहर्षक लढतीचा कुस्तीचा कुस्तीप्रेमींना आस्वाद घेता आला. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा किताब पृथ्वीराज मोहोळ यांनी मिळवला असून त्यांनी आपले कर्तव्य सिद्ध केले आहे. राज्यभरातून आलेल्या पैलवानांची काळजी घेण्याचे काम कुस्तीगीर संघाने केले आणि सर्व कुस्त्या यशस्वी संपन्न झाल्या. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभले. यापुढे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा उंचीच्या व्हावेत अशी अपेक्षा राज्य कुस्तीगीर संघाचा उपाध्यक्ष या नात्याने मी करतो. जिद्द, चिकाटीच्या जोरावर कुठल्याही क्षेत्रामध्ये यश संपादन करता येत असते. भविष्यात नगर शहरामध्ये हिंदकेसरी स्पर्धेचे आयोजन केले जाईल. शहरासह जिल्ह्यामध्ये चांगले मल्ल घडावे यासाठी सुसज्ज असे तालीम केंद्र उभे केले जाणार आहेत. कुस्ती खेळाच्या माध्यमातून प्रेरणा मिळत असते. त्यामुळे चुकीच्या गोष्टी घडत नसतात, प्रेक्षकही चांगले विचार घेत असतात. मोहोळ परिवाराच्या माध्यमातून मानाची गदा दिली जाते. कुस्तीचा हा सर्वोच्च सन्मान आहे. यावेळी महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ, पै. महेंद्र गायकवाड, हिंदकेसरी योगेश दोडके, राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, माजी उपमहापौर गणेश भोसले, प्रा. माणिकराव विधाते, मार्गदर्शक विलास कथोरे, पै. गुलाब बर्डे, बबन काशीद, अनिल गुंजाळ, संतोष भुजबळ, शिवाजी चव्हाण, शिवाजी कराळे, निखिल वारे, उद्योजक राजेश भंडारी, गणेश गुंडाळ, सत्यम गुंदेचा, सुरेश बनसोडे, काका शेळके, अजय चितळे, युवराज पठारे, संजय ढोणे, देवा शेळके, युवराज करंजुले, निलेश मदने, बाळासाहेब जगताप, वैभव ढाकणे, संतोष ढाकणे, मनीष साठे आदी उपस्थित होते. #अभिनंदन #महाराष्ट्रकेसरी #MaharashtraKesari #Ahilyanagar #SangramJagtap
0
0
0
शहरातील गाडगीळ पटांगण मधील भाजी विक्रेत्यांसोबत आयुक्त यशवंत डांगे यांची भेट घेत या भाजी विक्रेत्यांना गाडगीळ पटांगणातील भाजी बाजारात बसण्याची परवानगी द्यावी अशी निवेदनरुपी मागणी केली. यावेळी आयुक्त डांगे यांनी लाईट व स्वच्छता तसेच बसण्याची व्यवस्था करण्याचे व रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांना भाजी बाजारात बसण्यासाठी कारवाई करण्याचे आदेश दिले अमरधाम समोरून कल्याण-विशाखापट्टणम हा राष्ट्रीय महामार्ग जात असून या ठिकाणी मोठ्या संख्येने भाजी विक्रेते रस्त्यावरच ठाण मांडून बसत असून भाजी खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर येतात. त्याचबरोबर जवळच अमरधाम असल्याने अंत्यविधी व दशक्रिया विधीसाठी नागरिक मोठ्या संख्येने येत असतात. या ठिकाणी वाहतूक ठप्प होऊन चक्काजाम होऊन तासंतास लोकांना वाहतूक कोंडीच्या समस्याला सामोरे जावे लागते. महापालिकेने भाजी विक्रेत्यांना गाडगीळ पटांगणामध्ये ओटे बांधून व्यवस्था करून दिली असताना देखील भाजीवाले रस्त्यावरच भाजी विक्रीसाठी बसत आहेत. सर्व भाजी विक्रेत्यांना आत मध्ये बसावे असे निवेदन यावेळी दिले. यावेळी संतोष कानडे, अजय विधाते, अक्षय निमसे यांच्यासह इतर भाजी विक्रेते उपस्थित होते. #निवेदन #Ahilyanagar #NCP #Rashtrawadi
0
1
5
श्रीराम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास जी महाराज यांच्या वैंकुठगमनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांनी आपलं संपूर्ण जीवन सनातन धर्मासाठी समर्पित केले. अयोध्या श्रीराम जन्मभूमी आंदोलनातील त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांचे विचार सदैव धर्म आणि मानवतेच्या सेवेसाठी प्रेरित करत राहतील. भावपूर्ण श्रद्धांजली..! ॐ शांति #Shraddhanjali
1
0
7
जगाला सतमार्गावरून चालण्याचा उपदेश करणारे श्री संत रोहिदास महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #श्रीसंतरोहिदासमहाराज #ShreeSantRohidasMaharaj #ahilyanagar #ncp #rashtrawadi
2
2
13
बारावीच्या विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा! हा शैक्षणिक टप्पा तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आत्मविश्वास, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर यश नक्कीच मिळेल! शुभेच्छा! यशस्वी व्हा! #HSCExam2025 #BestOfLuck #ahilyanagar #NCP #rashtrawadi
0
1
2
ॐ नमो आदेश! आज आष्टी तालुक्यातील श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथगडावरील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या मच्छिंद्रनाथ महाराज संजीवन समाधी स्थळी नतमस्तक झालो. यावेळी मच्छिंद्रनाथ महाराजांची मनोभावे पूजा करत सर्वांच्या सुखी आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना केली. वात्सल्यदायी छाया सदैव आम्हा भक्तांच्या पाठीशी राहो हिच श्री मच्छिंद्रनाथ चरणी ���नोकामना! यावेळी मंदिराचे महंत, विश्वस्त, पुजारी आणि इतर भाविक उपस्थित होते. #Machindranath #Navnath #Ahilyanagar #NCP #Rashtrawadi
0
2
7
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदस्य नोंदणीचा शुभारंभ माझ्या हस्ते आपल्या शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात फॉर्म ठेवून करण्यात आला. कुठल्याही शुभकामाची सुरुवात श्रीगणेशाच्या आशीर्वादाने होते. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कुठलेही शुभ कार्य करायचे असेल धार्मिकतेपासून करावे लागते. म्हणूनच शहराचे श्रद्धास्थान श्री विशाल गणपती मंदिरात सदस्य नोंदणीचा शुभारंभ केला आहे. श्री विशाल गणपतीचा आशीर्वाद सदैव पाठीशी आहे म्हणूनच सलग तिसऱ्यांदा प्रचंड बहुमतांनी निवडणून आलो आहे. राजकीय कार्य करत असतानाही आपल्या धार्मिकतेला सदैव प्राधान्य देत आलो आहे. अखंड भारत निर्माण होण्यासाठी हिंदुत्वाची खरी गरज आहे. आपलं प्रखर हिंदुत्वच काश्मीर भूमीतील पीओके शब्द पुसू शकतं. राज्याचे उपमुख्यमंत्री व आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करत असून सर्वांनी पक्ष संघटना वाढीसाठी मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी करावी. पक्षाचे विचार शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाण्यासाठी विभागानुसार सदस्य नोंदणीचे नियोजन करावे. आपण महायुती सरकारमध्ये काम करत आहे. महानगरपालिका निवडणुकीमध्ये आपल्याला महायुतीचा झेंडा फडकवायचा आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, माजी उपमहापौर गणेश भोसले, मा. स्थायी समिती सभापती अविनाश घुले, माजी अध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, संभाजी पवार, महिला जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे, कार्याध्यक्ष प्रा. अरविंद शिंदे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे, युवक अध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर, विद्यार्थी संघटनेचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे, संतोष ढाकणे, दीपक खेडकर, शिवाजी साळवे, डॉ. रणजीत सत्रे, मळु गाडळकर, सतीश ढवण, भरत गारुडकर, विनीत गाडे, गणेश बोरुडे, आकाश दंडवते, रेणुका पुंड, मयुरी गोरे, संगीता अकोलकर, सुनंदा शिरवाळे, सुरेखा फुलपगारे, राणी भाकरे, अपर्णा पालवे, शालिनी राठोड, आरती उफाडे, सुनंदा कांबळे, मंजुषा शिरसाठ आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते #राष्ट्रवादी_काँग्रेस #Ahilyanagar #NCP #Rashtrawadi
0
1
2
नमस्ते विश्वकर्माय, त्वमेव कर्तृता सदा। शिल्पं विधाय सर्वत्र, त्वं विश्वेशो नमो नमः! देवशिल्पी भगवान श्री विश्वकर्मा यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन 🙏 #VishwakarmaJayanti #Ahilyanagar #NCP #Rashtrawadi
0
1
3
जिहादी लोकांकडून सिद्धार्थ नगर मधील मारहाण झालेल्या हिंदू महिलांची सिव्हिल हॉस्पिटल मध्ये भेट घेत विचारपूस केली. याप्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन बाकीच्या आरोपींना तातडीने अटक करून महिलांना झालेल्या मारहाणीनुसार 307 चे कलम लावण्याची मागणी केली आहे. हिंदू महिलांवर हात उचलणाऱ्यांची गय केली जाणार नाही.या जिहादी लोकांवर पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात यावी. अन्यथा आमच्या पद्धतीने जशास तसे उत्तर देण्यात येईल. दिवसभर काबाडकष्ट करून उदरनिर्वाह करणाऱ्या या महिलांवर जात पाहून या जिहाद्यांनी मारहाण केली. तसेच सिव्हिल हॉस्पिटलच्या अनागोंदी कारभारामुळे लाल टाकी येथील 40 वर्षीय सनी बोरुडे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याला वेळेवर उपचार मिळाले नाही. ही बाब चांगली नाही. सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांना चांगल्या दर्जाच्या आरोग्यसेवा मिळणे गरजेचे आहे. यासाठी प्रशासनाला उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी दिल्या. यावेळी हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. #Hindutva #Ahilyanagar #NCP #Rashtrawadi
0
2
7
गोड सदा बोलावे, नम्रपणे सर्वलोकप्रिय व्हावे । हाचि सुबोध श्रीगुरूंचा, भक्तीने रघुपतीस आळवावे।। श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन! #Abhivadan #Ahilyanagar #NCP #rashtrawadi
0
1
4
राज्याचे माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #HappyBirthday #Ahilyanagar #NCP #Rashtrawadi
0
1
3
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सावली होऊन आयुष्यभर त्यांना साथ देणाऱ्या, वंचितांसाठी त्याग आणि समर्पण करणाऱ्या महान त्यागमूर्ती, माता रमाबाई आंबेडकर यांना जयंती निमित्त त्रिवार अभिवादन!💐 #RamabaiAmbedkar #रमाई #Ahilyanagar #NCP #Rashtrawadi
0
1
4
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज हभप शिरीष महाराज मोरे यांच्या आकस्मित निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या निधनाने वारकरी सांप्रदायाचे नेतृत्व पडद्यामागे गेले आणि अध्यात्मिक चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..भावपूर्ण श्रद्धांजली... 💐 #Shraddhanjali
0
1
8
नियमित सूर्यनमस्कार केल्याने आपली जीवनशैली अधिकाधिक आरोग्यसंपन्न होते, त्यामुळे सूर्यनमस्कार करूया आणि निरोगी राहूया. जागतिक सूर्यनमस्कार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा! #Suryanamaskar #Ahilyanagar #NCP #Rashtrawadi
0
1
3
स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे महान योद्धा नरवीर तानाजी मालुसरे यांना बलिदान दिनानिमित्त विनम्र अभिवादन! #TanajiMalusare #सुभेदार #Ahilyanagar #NCP #Rashtrawadi
1
1
8
महाराष्ट्र केसरी २०२५'चा समारोप!. महाराष्ट्र केसरी २०२५ किताबावर नाव कोरलेले पै. पृथ्वीराज मोहोळ यांचे मनःपूर्वक अभिनंदन. हा विजय केवळ त्यांचा नाही, तर महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेचा गौरव आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे विशेष आभार, ज्यांनी हा भव्य सोहळा आयोजित करण्याची संधी दिली. तसेच नगरकरांचेही आभार, ज्यांनी या सोहळ्याला आपलं मानून त्याला अधिक भव्य बनवलं. ही स्पर्धा केवळ कुस्तीपुरती मर्यादित नव्हती, तर ती परंपरेचा सन्मान आणि नवीन पिढीसाठी एक प्रेरणा होती. चला, या परंपरेला पुढे घेऊन जाऊया, कुस्तीला आणखी वाढवूया! #महाराष्ट्रकेसरी२०२५ #MaharashtraKesari #MLA #SangramJagtap #Ahilyanagar #PrithvirajMohol
0
1
10
पुण्याचा पै. पृथ्वीराज मोहोळ ठरला महाराष्ट्र केसरी २०२५ चा मानकरी! कै. बलभिम अण्णा जगताप क्रीडा नगरी येथे पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी २०२५ च्या अंतिम अटीतटीच्या लढतीत पै. पृथ्वीराज मोहोळ याने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा २ विरोधात १ गुणाने पराभव करत विजय मिळवला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ यास मानाची चांदीची गदा व 'थार' चारचाकी गाडीची चावी देण्यात आली. यावेळी आदरणीय दादांनी स्पर्धेच्या नियोजनाचे कौतुक करत नगरच्या क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास दिला. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या अहिल्यानगर मध्ये झालेली महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही पुण्यापेक्षाही भव्यदिव्य झाली असल्याचे म्हणत स्पर्धेचे कौतुक केले. यावेळी केंद्रीय केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे क्रीडामंत्री दत्ता मामा भरणे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, जलसंपदा मंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे, राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी आमदार अरुणकाका जगताप, आ. ज्ञानेश्वर कटके, आ. काशिनाथ दाते यांच्यासह कुस्ती क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्तिमत्व, अनेक महाराष्ट्र केसरी किताब विजेते, त्याचबरोबर हजारोंच्या संख्यने नागरिक व कुस्ती शौकीन उपस्थित होते. @AjitPawarSpeaks
@mohol_murlidhar
@RamShindeMLA
@RVikhePatil #अभिनंदन #महाराष्ट्रकेसरी #MaharashtraKesari #Ahilyanagar #SangramJagtap
2
3
18
आपल्या अभंगातून समाजाला दिशा दाखवणार्या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...! #SantTukaram #Ahilyanagar #NCP #Rashtrawadi
0
1
2
कै. बलभिम अण्णा जगताप क्रीडा नगरी येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी २०२५ स्पर्धेला आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी भेट दिली. एवढी मोठी स्पर्धा एवढ्या नियोजनबद्ध होत आहे याचं त्यांनी कौतुक केले. यावेळी कुस्तीची लढत त्यांच्या हस्ते व मा. आमदार अरुणकाका जगताप यांच्या उपस्थितीत लावण्यात आली. विजेत्या मल्लाचा Bullet Bike देऊन गौरव करण्यात आला. त्याचबरोबर आमदार माऊली कटके, आमदार बापूसाहेब पठारे यांनीही आवर्जून उपस्थिती लावून सामन्यांचा आनंद घेतला. त्याचबरोबर टायगर ग्रुपचे अध्यक्ष तानाजीभाऊ जाधव देखील उपस्थित होते #MaharashtraKesari #SangramJagtap #Ahilyanagar #Kusti #MLASangramjagtap
0
1
8
महाराष्ट्र केसरी स्पर्धा अंतिम टप्प्यात, कोण उचलणार मानाची गदा याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष!🚩 स्व. बलभीम अण्णा जगताप क्रीडानगरी, वाडिया पार्क येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी २०२५ स्पर्धेत माती विभागात महेंद्र गायकवाड आणि साकेत यादव तर गादी विभागात पृथ्वीराज मोहोळ व शिवराज राक्षे यांनी आपला झंझावात कायम ठेवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या अत्यंत चुरशीच्या अंतिम स्पर्धेत कोण विजेता होणार याची उत्सुकता संपुर्ण कुस्तीजगताला झाली आहे. आज दिवसभरातील सकाळ व सायंकाळच्या सत्रात माती व गादी विभागातील ६५, ७४, ९२, ७०, ९७ आणि महाराष्ट्र केसरी (८६ ते १२५ ) किलो वजनी गटातील गतविजेत्यांना अनपेक्षितपणे पराभवाला सामोरे जावे लागले. तर काहींनी धक्कादायक निकालाची नोंद करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केला. या लढती पाहण्यासाठी अहिल्यानगरासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने कुस्ती शौकीन दाखल झाले आहेत. #MaharashtraKesari #SangramJagtap #Ahilyanagar #Kusti #MLASangramjagtap
0
2
8