mohasinspeaks Profile Banner
Mohasin Profile
Mohasin

@mohasinspeaks

Followers
7K
Following
3K
Statuses
9K

सहराज्य प्रमुख,सोशल मीडिया फ्रंट, राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार,महाराष्ट्र.

Pune, India
Joined June 2012
Don't wanna be here? Send us removal request.
@mohasinspeaks
Mohasin
2 months
EVM मशिन म्हणजे 3 मशीन चां एक सेट. कंट्रोल युनिट (यावर मत नोंदवलं जात) बॅलेट युनिट आणि (यावरील बटन आपण मत नोंदविण्यासाठी दाबतो) VVPAT युनिट. (आपण दिलेले मताची चिठ्ठी या यंत्रातून बाहेर पडते.) EVM मशिन्स मतदान केंद्रावर येईपर्यंत,फक्त एक वेळ internet च्या संपर्कात येते. ही वेळ असते निवडणुक चिन्ह लोड करण्याची.यात देखील फक्त VVPAT हे मशीन इंटरनेट ला जोडण्यात येत.आणि निवडणूक आयोगाच्या सर्व्हर वरुन संबंधित विधानसभा क्षेत्रामध्ये उभ्या असणाऱ्या उमेदवारांचा data चिन्ह स्वरूपात त्यात लोड करण्यात येतो. ही एकच जागा आहे,जिथं शंका घेण्यास वाव आहे. ती कशी..? तर हे सिम्बॉल लोड करताना कोणता कोड वापरण्यात आला आहे,हे आपल्याला माहिती नसत.त्या कोडचा नेमका काय वापर होतोय हे देखील आपल्याला कळत नाही. अस देखील असू शकत की, 3 मत व्यवस्थित होतील मात्र दर चौथ मत एखाद्या विशिष्ट पक्षालाच मिळेल.शिवाय या कोड ला अस काही डिझाईन करता येऊ शकत असेल का की, एखाद्या विशिष्ट दिवशीच (मतदानाच्या दिवशी) तो सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत वरील प्रमाणे काम करेल.आणि इतर दिवशी तो नॉर्मल behave करेल.कारण सकाळी मतदानाला सुरुवात करताना Mockpoll घेणे बंधनकारक असत.त्यात EVM व्यवस्थित काम करत आहे,हे दिसणं गरजेचं आहे.म्हणून ही वेळ 9 नंतर ची सेट करण्यात येत असेल,असा अंदाज आहे. आणि समजा नंतर विरोधकांनी आक्षेप घेतला,तर इतर दिवशी नॉर्मल behave करण्याची सूचना आधीच त्या VVPAT ला देण्यात आली आहे,त्यामुळे मतदानाच्या दिवशी झालेला घोळ झालाच नाही,हे सिद्ध करायला निवडणूक आयोग मोकळं. अर्थात या शक्यता आहेत. आणि प्राप्त परिस्थितीमध्ये अश्या प्रत्येक शक्यतांचा विचार केला गेला पाहिजे...!
172
307
2K
@mohasinspeaks
Mohasin
8 hours
EVM हॅक होत का..? माहिती नाही. EVM manipulate करता येत का..? तर शक्यता आहे. ECI तर कधीच हॅक झाली आहे. त्यात विधानसभा झाली की,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपा लगेच कामाला लागली होती.नवीन मतदार नोंदणी अभियान आणि भाजपा सदस्यता अभियान हे त्याचे 2 महत्वाचे भाग झालेत. इथ इतर राजकीय पक्ष कुठ आहेत..? किती भाजपेतर राजकीय पक्षांनी यावर काम सुरू केलं आहे..? लक्षात घ्या, भाजपा फक्त EVM च्या माध्यमातून तुम्हाला मूर्ख बनवत नाहीये.त्यांनी प्रशासन ताब्यात घेतलं आहे,निवडणुकीच तंत्र समजून घेतलं आहे,सोयीनुसार त्यात बदल करून घेतले आहेत,प्रशिक्षित केडर तयार केलं आहे,मतदार याद्या कश्या बनवायच्या पासून त्यात घोळ कसे घालायचे..यावर नियंत्रण मिळवलं आहे,वरुन आपल्या विचारांचे अधिकारी निर्णय प्रक्रियेत घुसवून ठेवले आहेत, अस असताना, विरोधीपक्ष म्हणून आपण नोंदणीच्या पहिल्या टप्प्यावर देखील गंभीर नाही आहोत, ��ाजपच्या इतर आक्रमणांना तोंड द्यायची तर बाबच सोडा. !
Tweet media one
25
39
224
@mohasinspeaks
Mohasin
8 hours
@Chhaaayyah @kachkach_nana खरंय..माझच चुकल..!
0
0
1
@mohasinspeaks
Mohasin
12 hours
@kachkach_nana बोलणं जास्ती नसत भाई आमचं..!
Tweet media one
0
0
36
@mohasinspeaks
Mohasin
12 hours
Tweet media one
3
0
42
@mohasinspeaks
Mohasin
5 days
निवडणुकीत शब्द दिल्याप्रमाणे ट्रम्पने अमेरिकेत अवैधरित्या राहणाऱ्या सर्वच देशाच्या नागरिकांना परत पाठविण्यास सुरुवात केली आहे.205 भारतीय नागरिकांची पहिली तुकडी अमेरिकन एअरफॉर्सच्या विमानाने भारतात परतली आहे. यामुळे तिकडे ट्रम्प समर्थक प्रचंड चेकाळले आहेतं.आणि माय फ्रेंड डोलांड चां मजबूत उदोउदो सुरू असल्याचं समजतं आहे. आता हे अवैध नागरिक वापस पाठवताना अमेरिकेने काही फोटो जाहीर केले आहेत.यात भारतीयांना हाताला हातकडी लावून विमानात बसवले जात असल्याचं दिसत आहे.यावरून आता वाद सुरू झालेत. असो. पण असेच कोलंबियाचे 80 नागरिक देखील अमेरिकेने एअरफोर्सच्या विमानाने कोलंबियाला परत पाठवले.त्यावर तिथले प्रेसिडेंट गुस्ताव पेत्रो यांनी घेतलेली भूमिका जबरदस्त होती.याच जगभरात स्वागत होत आहे.अमेरिकन विमानांनी कोलंबिया पोहचल्यावर तिथे उतरण्याची परवानगी मागितली.याला पेट्रो यांनी नकार दिला.ते म्हणाले, "अमेरिकेत जरी हे नागरिक अवैधरित्या राहत असले तरी ते माझ्या देशाचे सन्माननीय नागरिक आहेत.त्यांना अस हतकड्या लावून आणि एअरफोर्सच्या विमानाने परत पाठवून अमेरिका त्यांना गुन्हेगारांची वागणूक देत आहे.त्यांना नागरी विमानाने सन्मानाने परत पाठवण्यात याव.आम्ही परवानगी देऊ..!" गट्स लागतात भाऊ...नाही तर काही लोक चीनच नाव देखील घ्यायला घाबरतात..!
21
121
750
@mohasinspeaks
Mohasin
7 days
नामदेव शास्त्रीला आज संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी अक्षरशः भोंगळ केलं.खासकरून संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख आणि मुलगी वैभवी यांनी ज्या समजूतदार पण मुद्देसूद पद्धतीने या बाबाच्या भूमिकेची जाहीर चिरफाड केली,त्याला दादच दिली पाहिजे.
6
131
1K
@mohasinspeaks
Mohasin
1 month
मस्साजोग येथील संतोष देशमुख यांच्या खुनानंतर राज्यभरात राजकारण बरच तापल आहे.यावर प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे म्हणतात की, "हा बीड ला बदनाम करण्याचा डाव आहे.राज्यभरात असे गुन्हे प्रत्येक जिल्ह्यात घडतं आहेत..!" अस असेल तर माननीय धनंजय मुंडे यांनी त्यांचं होम ग्राउंड असणाऱ्या बीड जिल्ह्याची बदनामी थांबविण्यासाठी नैतिकतेच्या पार्श्वभूमीवर, मस्साजोग प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत मी कोणत्याच मंत्री पदावर राहणार नाही,हे राज्य सरकारला निक्षून सांगत,आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा.आणि राज्यभरातील जनतेला दाखवून द्यावं की,संतोष देशमुख खून प्रकरणात ते देखील गंभीर असून,या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी,अस त्यांना देखील वाटतं. पण धनंजय मुंडे यांच्याकडून नैतिकतेची अपेक्षा करणे चूक आहे,अवास्तव आहे.त्यांचं अवघ साम्राज्याच हे कायद्याला कायदेशीर घोडे लावून उभ आहे..! तिथं बीडची अस्मिता सारखे प्रकार अत्यंत गौण आहेत..!
4
48
323
@mohasinspeaks
Mohasin
1 month
वाल्मीक कराड शरण आला. त्याला पकडण्यात महाराष्ट्र पोलीस तसेच सीआयडी अयशस्वी ठरली. परिणामी फडणवीस हे गृहमंत्री म्हणून "फेल" ठरले. पण एकटा वाल्मीक च होता का..या हत्या प्रकरणात..? अजून 3 जण गायब आहेत. त्यांना ही पोलीस यंत्रणा शोधू शकत नाहीये.ही बाब पोलिसांच्या आणि राज्य शासनाच्या एकूणच क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे..! परिणामी..देवेंद्र फडणवीस हे या बाबतीत देखील गृहमंत्री म्हणून "सपशेल फेल" ठरले आहेत..! आणि याच गृहमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांना मुख्यमंत्री या नात्याने मंत्री मंडळात स्थान दिलेले आहे.या न्यायाने देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्र्यां सोबतच मुख्यमंत्री म्हणून देखील वरुन खालून फेल ठरलें आहेत..!
4
48
235
@mohasinspeaks
Mohasin
1 month
वाल्मीक कराड साठी रात्री न्यायालय उघडण्यात आले आहे. सुनावणीच्या काही वेळेआधी सरकारी वकिलांनी वाल्मीक कराडच्या विरोधात केस लढवण्यास नकार दिलाय. अभिनंदन देवेंद्र फडणवीस...आपली कार्यक्षमता महाराष्ट्राने पाहिली,जाणली..!
43
250
2K
@mohasinspeaks
Mohasin
1 month
CID च्या कार्यालयात जाऊन,"आपला तपास चुकीच्या पद्धतीने चालला आहे", हे सांगण्याच धारिष्ट्य वाल्मीक कराड समर्थकांच्यात आहे.हा माज सत्तेच पाठबळ असल्याशिवाय आणि संगनमत असल्याशिवाय येत नसतो. सबब..राज्य सरकार वाल्मीक ला वाचविण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे,हे आता उघड होत आहे..!
2
40
202
@mohasinspeaks
Mohasin
1 month
संतोष देशमुख प्रकरणात 20-22 दिवस झाले वाल्मीक कराड पोलिसांना सापडत नाही. वरुन तो त्याच्या संरक्षणासाठी असणारे पोलीस घेऊन फिरतोय,अश्या बातम्या लागल्या आहेत.त्याला लवकरच अटक करू,अस स्टेटमेंट देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिले होते.पण अजून तरी या कार्यक्षम गृहमंत्र्यांना ते शक्य झालं नाही.उलट त्यांच्यातील मुख्यमंत्र्यांला मायेचा पान्हा फुटला आणि धनंजय मुंडे यांना मंत्रिपद त्यांनी बहाल केलं. तुम्हाला अजून हि वाटत का..की फडणवीस या प्रकरणात सिरियस आहेत..? का त्यांना हे प्रकरण असच पेटवत ठेवायचं आहे..? बाकी,नागपुरात 4 दिवसात 5 खून झालेत.वाल्मीक कराड अद्याप फरार आहे.सामान्य लोकांच्या मनात महाराष्ट्रात "जंगलराज" सुरू असल्याची भावना आहे.मात्र,इथल्या मिडीयाला अस काही वाटत नाहीये,असच एकंदरीत त्यांचं वार्तांकन आहे.नसता..गृहमंत्री म्हणून अपयशी ठरलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात त्यांनी रान उठवल असत..!! पण मग पुन्हा जाहिराती मिळणार नाहीत,ही भीती असेल कदाचित या मीडिया हाऊसेस ना..! शेवटचं... वाल्मीक ने किती ब��यका कराव्यात..किती ठेवाव्यात..हा आपला प्रश्न नाही. व्यभिचारी वाल्मीक हा आपला प्रश्न नाहीये. हत्यारा,खुनी वाल्मीक हा प्रश्न आहे..आणि आपला फोकस याकडेच असायला हवा..! इतकंच.
3
22
92
@mohasinspeaks
Mohasin
1 month
"ढगाआड गेलेला सूर्य दुसऱ्या दिवशी पुन्हा उगवतो, पण मातीआड गेलेला माझा बाप पुन्हा येणार नाही." हे भावविवश उद्गार होते,क्रूरपणे हत्या करण्यात संतोष देशमुख यांच्या मुलीचे. संवेदनशील मनाचा कोणताही माणूस भावनिक होईल,इतकी ताकद त्या वाक्यात होती. पण लोकांना मीडियाने काय दाखवल...? तर प्राजक्ता माळी हिच्यावर सत्ताधारी आमदार सुरेश धस यांनी केलेलं स्टेटमेंट. लगेच मुख्यमंत्र्यांनी प्राजक्ताला दिलेली भेट.त्यावर कामाला लागलेले महिला आयोग,बिजेपी आयटी सेलकडून विषय divert करण्यासाठी सुरू झालेला नियोजनबद्ध प्रचार,अनेक सो कॉल्ड मान्यवरांच्या क्रिया प्रतिक्रिया..!! आणि आपसूक यांना उत्तर द्यायला प्रयत्न करत असणारे आपले लोक. एका दिवसात संतोष देशमुख यांच्यासाठी एकत्र झालेला आवाज आणि त्याच महत्व सत्ताधारी वर्गाने झाकोळून टाकल. मुळात प्राजक्ता माळी आहे कोण..? तर एक अभिनेत्री.पैसे घेऊन सिनेमात,मालिकात काम करणारी एक बाई. आता हेच पैसे अभिनायासोबत राजकारण करण्यासाठी मिळणार असतील तर ती नको का म्हणेल..? अश्या बाईकडून आपली लोक सद्सदविवेक बुद्धीची अपेक्षा करत आहेत..? अशी अपेक्षा करणेच चुकीचे नाहीये का..? हा प्रश्न तिच्यावर टीका करणाऱ्या प्रत्येकाने स्वतला विचारायला हवा. सदर बाई एका विशिष्ट विचार धारेसाठी काम करते हे सगळ्यांना माहिती आहे.संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून,"मी सावित्रीची लेक आहे",अस म्हणण्याचा निगरगट्टपणा तिने आता कमावला आहे.आणि जी बाई हे कमवू शकते ती किती प्रोफेशनल असू शकते हे आपण आता समजायला हवे. बाकी काही लोकांना तिच्याबद्दल प्रचंड सहानुभूती आहे.अर्थात हा देखील त्यांच्या आकलनाचा आणि समजेच्या परिघाचा विषय असला तरी, संतोष देशमुख यांच्या निर्घृण खुनाचा विषय divert करण्यासाठी ही बाई स्वतःच्या स्त्रीत्वाचा फायदा घेत सत्ताधारी वर्गाला पोषक वातावरण बनवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि तिच्या या प्रयत्नात वैभवी संतोष देशमुख हीचे,तिच्या वडिलांना न्याय मिळावा यासाठी केलेले भावविवश उद्गार दबून गेले आहेत.त्यामुळे जर कोणाला प्राजक्ता सारख्या बाईबद्दल सहानुभूती वाटत असेल तर त्याला ती लखलाभ.आम्हाला मात्र तिला कणभर देखील सहानुभूती द्यावी वाटत नाही कारण तिचे हेतू हे अत्यंत भयानक आहेत. भयानक यासाठी की,तिच्या या कृत्यामुळे समग्र स्त्रीवादी चळवळीचं नुकसान तर होत आहे.आपल्या स्त्रीत्वाचा फायदा घेवून संतोष देशमुख हत्या सारख्या ज्वलंत प्रश्नांवरून सामान्य लोकांचं लक्ष divert करण्याचं काम ती सत्ताधारी वर्गाला फायदा होईल,यासाठी करत आहे. आणि अश्या बाईसाठी तुम्हाला सहानुभूती वाटत असेल तर..तुमच्या एकूणच सामाजिक आणि राजकीय आकलनावर गंभीर प्रश्न उपस्थित होतात. प्राजक्ता ला टार्गेट करून लिहिणाऱ्या सहकाऱ्यांना एकच सांगणे आहे... आपल लक्ष संतोष देशमुख यांच्या वर राहू द्या.. मिडियाचे आणि सत्ताधारी वर्गाचे खेळणे बनू नका. हा पूर्ण खेळ त्यांचा आहे...त्यात तेच जिंकावी अशी व्यवस्था आहे.अस असताना त्यांना आपल्या पीचवर आणण्याचा प्रयत्न करा..जिंकण्याचा तो एकमेव रस्ता आहे..!
8
69
388
@mohasinspeaks
Mohasin
1 month
@dhananjay_munde पुढच्या वेळी जरा जास्ती प्रोफेशनल टीम कामाला लावा.आव्हाड साहेबांच्यासोबत या सगळ्यांचे बाप असणारे प्रोफेशनल काम करतात. हे असेल छपरी एडिटिंग करून उरली सुरली इज्जत का घालवून घेत आहात. @Rupalispeak - आपल्याला अजित दादा का महीला प्रदेश अध्यक्षा करत नाहीयेत,याच उत्तर आज तमाम महाराष्ट्राच्या जनतेला मिळालं..!
Tweet media one
2
6
25
@mohasinspeaks
Mohasin
2 months
नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत देशातील कार डीलर्स कडे सुमारे 75 हजार कोटींची वाहने विक्रिविना पडून होती.दिवाळी आणि इतर महत्वाच्या सणांना देखील वाहनांची अपेक्षित विक्री देशात झाली नसल्याने कार डीलर्स कडे असणारी inventory वाढतच गेली. एकट्या नोव्हेंबर महिन्यात 14 टक्क्यांची घसरन (नोव्हेंबर 2023 च्या तुलनेत) चारचाकी गाड्यांच्या विक्रीत बघायला मिळाली आहे. आजमितीला देशात तब्बल 7,40,000 वाहने विक्रीविना डीलर्स लोकांकडे पडून आहेत.याशिवाय प्रोडक्शन लाइन्स मध्ये असणारी वाहने वेगळीच.जी लवकरच पुन्हा डीलर्स च्या गोडावूनला पोहोचतील.या सर्व वाहनांची विक्री,ही संबंधित कंपन्या आणि डीलर्स लोकांची मोठी डोकेदुखी बनली आहे. आता महत्वाचं मुद्दा. या वाहनांची विक्री व्हावी,यासाठी या मोठ्या ऑटोमोबाईल कंपन्यांनी केंद्र सरकार वर दबाव बनवला आहे का.? त्या दबावात येत निर्मलाअक्काने सेकंड हॅण्ड कार विकण्यावर आणि विकत घेण्यावर GST कर लावला आहे का..? जेणेकरून लोक जुन्या कार विकत घेण्यापेक्षा नवीन कारकडे वळतील..? बाकी,निर्मला अक्कांचा एकूणच कारभार बघता, गाडीत कोण कुठे बसणार,यावर देखील ��ता त्या GST लावायला मागेपुढे बघणार नाहीत,याची खात्री वाटते.
2
47
241
@mohasinspeaks
Mohasin
2 months
निवडणूक प्रक्रियेत EVM मशिन्स सोबत अजून कोणत्या ठिकाणी घोळ होऊ शकतो,याबाबत अनेक लोक काम करत आहेत.हे काम करत असताना एक बाब आमच्या काही लोकांच्या लक्षात आली की, Form 17A याकडे कोणाचंच लक्ष नाहीये.ही एक मतदार यादी असते जी मतदानाच्या दिवशी प्रत्येक बुथवर उपलब्ध असते.जसे मतदार बुथवर येत जातात तसे तिथं बसलेला सरकारी कर्मचारी त्यांच्या नावावर फुल्या मारत जातो.म्हणजेच त्यांनीं मतदान केले आहे,अस त्याचा एकंदरीत अर्थ असतो. महाराष्ट्रात लागलेल्या अकल्पित निकालानंतर आम्ही काही उमेदवारांना बोललो.त्यांना सांगितले की,तुमच्या रिटरनिंग ऑफिसर ला या 17A ची मागणी करा,आणि EVM वरील मतदानाच्या सोबत याची tally करुन पहा. जशी ही मागणी केली गेली,तसे पहिल्यांदा हे उत्तर आले की,"ही कागदपत्रे तुम्हाला 45 दिवसानंतर मिळतील." याचा सरळ अर्थ होतो की, न्यायालयाने जी 45 दिवसांची मुभा कोर्टात जाण्यासाठी दिली आहे,त्यानंतर ती कागदपत्रे मिळणार.म्हणजेच इलेक्शन पीटिशन दाखल करण्याचा काही उपयोगाचं होणार नाही. आता हरलेल्या उमेदवारांनी अश्या पद्धतीने EVM प्रक्रियेतील घोळ शोधण्याचा हा प्रकार सुरू केलाय हे लक्षात आल्यानंतर केंद्र सरकार सतर्क झालं आणि त्यांनी सदर मागणीसाठी उपयोगी असणारा Rule 93(2)(a) of the 1961 Conduct of Election Rules हा नियमच बदलून टाकला आहे.या रुल नुसार "all other papers relating to the election shall be open to public inspection”. हा नियम आज पर्यंत होता.आता त्यात बदल करत ", not all poll-related papers can be inspected by the public. Only those papers specified in the Conduct of Election Rules can be inspected by the public. असा केला आहे.म्हणजेच सत्ताधारी गटाने निवडणूक प्रक्रियेत घातलेला घोळ लपविण्याची जागा सरकारी गटाला सरकारी नियमात बसवून करून देण्यात आली आहे. लक्षात घ्या मित्रांनो, EVM मधील असणारा घोळ लपविण्यासाठी केंद्र सरकार,निवडणूक आयोग आणि काही प्रमाणात देशाती��� न्यायालय सहभागी आहेत. विरोधी पक्ष काहीच प्रयत्न करत नाहीत हा जो सुर सर्व सामान्य लोकांचा असतो,त्यांनी या बाबी देखील माहिती करून घेतल्या पाहिजेत. इथ कुंपणच शेत खात आहे...भारतीय लोकशाहीला सरकारी पद्धतीने घोडे लावत आहे..! आणि ही बाब देशाला अराजकते कडेच घेऊन जाणारी असेल,असच यातून दिसून येत आहे..!
37
181
654
@mohasinspeaks
Mohasin
2 months
लाचारीचा ओंगळवाणा चेहरा..!
Tweet media one
13
38
310
@mohasinspeaks
Mohasin
2 months
आंबेडकर प्रकरणावरून काँग्रेस आणि समस्त इंडिया आघाडी केंद्र सरकारला मजबूत नडली आहे.परिणामी खासदार प्रताप सारंगीच्या पाठीमागे लपून,आपली कातडी वाचविण्याचा प्रयत्न अमित शाह करत आहेत.हा संघीय संस्काराची पारंपरिक चाल आहे.आपल्यावर आल की असले प्यादे पुढे करायचे आणि अंग चोरुन घ्यायचे. पण मिस्टर अमित शाह,आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना अंगावर घेतल आहे.इतक्यात तुमची सहज सुटका होईल,अस समजू नका.
0
31
122
@mohasinspeaks
Mohasin
2 months
कर्नाटक विधानसभा मधील आजच दृश्य..! आंबेडकर - फॅशन नाही पॅशन आहे. #जयभीम
Tweet media one
0
19
166
@mohasinspeaks
Mohasin
2 months
बीड जिल्ह्यात फक्त वाल्मीक कराडची दहशतच नाही तर पोलिसांची मदमस्त आणि मुजोर भूमिका घेतील अत्यंत वादात आहे.यावर त्याच जिल्ह्यातून येणारे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अत्यंत कड्क भूमिका घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर अनेक प्रश्न विचारले आहेत.यावर अजून तरी देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलेले नाही.परंतु संदीप भैय्या क्षीरसागर यांनी मस्साजोग प्रकरणात घेतलेली आक्रमक भूमिका बीड मधील न्यायप्रेमी जनता कायमच लक्षात ठेवेल,हा विश्वास आहे.
5
76
464