![Keshav Upadhye Profile](https://pbs.twimg.com/profile_images/1822132694043566080/lmNZKPce_x96.jpg)
Keshav Upadhye
@keshavupadhye
Followers
44K
Following
3K
Statuses
28K
Divergent opinions are signs of a vibrant democracy. I respect different opinions, though I may not b in agreement with them. Chief Spokesperson,@BJPMaharashtra
Maharashtra, India
Joined February 2010
मनापासून धन्यवाद @Dev_Fadnavis जी आपले नेते जेव्हा कामाच कौतुक करतात तेव्हा अजून काम करायला उत्साह येतो.
58
80
617
महाराष्ट्राचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री श्री. नीतेशजी राणे यांची सदिच्छा भेट विविध विषयांवर चर्चा केली. @NiteshNRane
0
0
10
भारतीय जनता पक्षाच्या सदस्यता नोंदणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून महाराष्ट्र भाजपाची तब्बल १ कोटी २ लाख सदस्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. या ऐतिहासिक यशाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेत भाजप प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री मा. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी अभियानाच्या यशस्वीतेसंदर्भात पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. #भाजप #BJP
@cbawankule
0
0
2
हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे एकदा म्हणाले होते, मी शिवसेनेची कधीही काँग्रेस होऊ देणार नाही. दु:ख या गोष्टीचं आहे की, वारसदार असूनही @UddhavThackeray यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली. आणि शिवसेना हा पक्ष सत्तेच्या स्वार्थी राजकारणापोटी काँग्रेसच्या दावणीला बांधला. @RautSanjay61 जी आज आपण भर पत्रकार परिषदेत @RahulGandhi यांना तुमचे प्रमुख नेते असल्याचं तर मा��्य केलंच, शिवाय काँग्रेस पक्षाला तुम्ही मोठा भाऊ असं संबोधित केलं. @UddhavThackeray तुम्ही केवळ हिंदूत्व नाही सोडले, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार देखील शिवसेना पक्षापासून दूर केले. @UddhavThackeray जी यावर महाराष्ट्राच्या जनतेला काय सांगाल? हे मी विचारणार नाही, पण बाळासाहेब ठाकरे यांना काय उत्तर द्याल?
3
5
32
काँग्रेसने घेतलेल्या मतांमुळे विभागणी होऊन भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जिंकल्याच्या युक्तिवादाचे मजले बांधणाऱ्या महाराष्ट्रातल्या महान राजकीय नेत्यांनी आणि विश्लेषकांनी हे बघावं. कांग्रेसने घेतलेल्या मतांपेक्षा भाजपा उमेदवाराचे मताधिक्य जास्त असणारे 34 मतदारसंघ आहेत. मद्यघोटाळा सम्राट अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या जनतेने साफ नाकारलं आहे. INDI आघाडी असती, तर कदाचित भाजपाच्या जागा वाढल्या असत्या. निवडणकीचं यश हे दिल्लीच्या कार्यकर्त्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या नेत्यांचं आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन दिल्लीच्या स्वभामानी जनतेने विकास करणाऱ्या भाजपला निवडले आहे. बाकी तुमच्या INDI आघाडीच्या कितीही गप्पा मारा, निकाल स्पष्ट आहे...
1
2
7
भ्रष्टाचार करणाऱ्याला जनता कधीही पाठीशी घालत नाही! Zee 24 तास या वृत्तवाहिनीच्या विशेष चर्चा सत्रात सहभागी झालो. @zee24taas
#BJP #भाजप #Delhi #दिल्ली #विधानसभा #abpmaza
1
0
0
महाराष्ट्र पॅटर्न म्हणजे कार्यकर्त्यांची जिद्द आणि आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांची लोकप्रियता.... दिल्ली विधानसभा निवडणुक विजयाच्या पार्श्वभूमीवर एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या विशेष चर्चासत्र कार्यक्रमात सहभागी झालो. @abpmazalive
#BJP #भाजप #Delhi #दिल्ली #विधानसभा #abpmaza
0
0
3
दिल्ली ची जनता अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाच्या भ्रष्टाचारी कारभाराला कंटाळली होती, हे दिल्लीवासियांनी आपल्या जनादेशातून दाखवून दिले आहे. ज्या प्रमाणे महाराष्ट्राच्या जनतेने महायुती सरकारच्या धोरणांना स्विकारलं, त्याच प्रकारे आमच्या सरकारने देखील विकासाचं राजकारण काय असतं, हे दाखवून दिलं. @RautSanjay61 जी संपुर्ण देशात भारतीय जनता पक्षाचा विकासाचा पॅटर्न राबवला जातो आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील विकासाचा पॅटर्न दिल्लीत राबवला गेला, याबाबत शंका असण्याचं कारण नाही. @RautSanjay61 जी आपण दिल्लीश्वरांचे गुलाम असल्याचं सिद्ध करून @RahulGandhi यांचा राष्ट्रीय नेते असा उल्लेख करत असाल! तर, हे अतिशय हास्यास्पद आहे. ज्यांच्या नेतृत्वात दिल्लीमध्ये एकही आमदार निवडून येऊ शकत नाही, आणि काँग्रेसमुक्त भारत करणारे @RahulGandhi राष्ट्रीय नेते कसे असू शकतात? असे असताना, सलग तीन वेळा महाराष्ट्रात आपल्या नेतृत्वात १०० पेक्षा जास्त आमदार निवडून आणू शकणारे मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्यावर टीका करण्याची आपली कुवत आहे का? हे तपासून घ्या.
0
0
4
उबाठाचे @rautsanjay61 म्हणतात की दिल्लीत भाजपाने महाराष्ट्र पॅटर्न राबवून यश मिळवताना दिसते. होय राऊतजी महाराष्ट्र पॅटर्नच आम्ही राबवतो, महाराष्ट्र पॅटर्न म्हणजे @narendramodi यांची लोकप्रियता, @Dev_Fadnavis यांचे नियोजन आणि कार्यकर्त्यांची जिद्द या आधारे आम्ही महाराष्ट्र जिंकला व पुढेही हाच महाराष्ट्र पॅटर्न पुढेही राबवित राहू.
40
21
280
विरोधी पक्षनेते राहूल गांधी हे दिल्ली विधानसभा निवडणुकीत होणारा पराभव ओळखून पराभवाच्या मानसिकतेत गेलेले आहेत. संजय राऊत, सुप्रिया सुळे यांना सोबत घेत घेतलेली पत्रकार परिषद ही केवळ दिल्लीतील पराभव ओळखून केलेले 'कव्हर फायर' आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदारसंख्या किती वाढली? कशी वाढली? आणि कुठे वाढली? याची सविस्तर आकडेवारी निवडणूक आयोगाने दिलेली असताना, यावर केलेली चर्चा व्यर्थ आहे. जोपर्यंत काँग्रेस पक्ष आणि उरले-सुरले गट पराभव स्विकारून आत्मचिंतन करत नाही. आणि आपल्या मनाची खोटी समजूत काढण्याचा प्रयत्न करतील, तोपर्यंत महाराष्ट्राची सर्वसामान्य जनता त्यांना कधीच स्विकारणार नाही, हेच अंतिम सत्य आहे.
2
7
37
संजय राऊतजी तुमच्या शिल्लक गटाचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री असताना वर्षा बंगला सोडायला एवढं घाबरत होते की, २.५ वर्ष केवळ वर्षा बंगल्यावर बसून होते. साधं वर्षा बंगला सोडून मंत्रालयातही येण्याचं धाडस झालं नाही, तो 'राजा वर्षावरी आणि जनता दारोदारी' अशी एकंदरित परिस्थिती होती. कधी @UddhavThackeray या प्रश्नाचं उत्तर देणार आहेत की नाहीत? असो! राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा.श्री. @Dev_Fadnavis केवळ वर्षा बंगल्यावर बसून कारभार चालवणाऱ्यातले नाहीत, तर रस्त्यावर उतरुन जनतेसाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्यातले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्रजींना वर्षा बंगला महत्वाचा नसून महाराष्ट्रातली सामान्य जनता जास्त महत्वाची आहे. हे लक्षात घ्या @Rautsanjay61 जी!
1
0
2
Champions again! 🇮🇳 The India U19 Women's team successfully defends their World Cup title🏆, clinching victory for the 2nd time in a row! A historic triumph showcasing their talent, grit, and determination 🏏💪🏻#U19WorldCup #WomenInCricket #Champions
0
0
0
विकसित भारताचा अर्थसंकल्प : उद्योग क्षेत्राला काय मिळाले ? • स्टार्टअपसाठी 10 कोटींवरुन 20 कोटीं क्रेडिट लिमिट • MSME ला 20 कोटींपर्यंतच टर्म कर्ज • छोट्या उत्पादकांसाठी स्मार्ट क्रेडिट कार्ड • लेदर इंडस्ट्रिमध्ये २२ लाख रोजगार • चामड्याची पादत्राणं बनविण्यासाठी विशेष योजना • भारताला जागतिक स्तरावरील खेळणी केंद्र बनवणार पर्यावरण अनुकूल खेळणी मेक इन इंडियाचे प्रतिनिधित्व करतील • पूर्वोत्तर राज्यात अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना देणार • उत्पादकता वाढविण्यासाठी नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग मिशन #ViksitBharatBudget2025
#Budget2025 #UnionBudget2025 #Budgetinmarathi #nirmalasitaraman #अर्थसंकल्प
2
1
8
विकसित भारताचा अर्थसंकल्प : महिलांना काय मिळाले ? • स्टार्टअप्ससाठी 10,000 कोटींची तरतूद • एससी/एसटी महिलांना स्टार्टअप्ससाठी कर्ज स्वरूपात मदत • देशभरातील 1 कोटी गर्भवती, स्तनदा मातांना, 1 लाख किशोरवयीन मुलींचं पोषणमूल्य वाढवणार • सक्षम अंगणवाडी व पोषण योजना- 8 कोटीहून अधिक लहान मुलांना पोषणमूल्य मिळणार • महिलांना स्टार्टअप साठी 2 कोटी रुपयांची मदत • मागास वर्गातील महिलांसाठी चामड्यांची पादत्राणे बनवणाऱ्यांसाठी योजना • पाच लाख महिलांना या योजनेचा लाभ होणार • इंडिया पोस्ट महिला बँकेचे पुनरुज्जीवन करणार •महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देणार #ViksitBharatBudget2025
#Budget2025 #UnionBudget2025 #Budgetinmarathi #nirmalasitaraman #अर्थसंकल्प
0
0
1
विकसित भारताचा अर्थसंकल्प : नोकरदारांना काय मिळाले ? • 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त • 18 लाखांपर्यंतचं उत्पन्न असल्यास 70 हजार रुपये सूट • 25 लाखांपर्यंतचं उत्पन्न असल्यास 1 लाख 20 हजार रुपये सूट #ViksitBharatBudget2025
#Budget2025 #UnionBudget2025 #Budgetinmarathi #nirmalasitaraman #अर्थसंकल्प
1
2
15
संजय राऊतजी आपण पत्रा चाळ घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आहात, हे विसरला वाटतं! अजुनही आपण केवळ जामीनावर आहात, कधी जेलवारी घडेल? हे तुम्हालाही माहित नाही. कधीतरी अंतर्मनात डोकावून पहा, स्वत:चे सर्व घोटाळे डोळ्यांसमोर 'आ' वासून उभे राहतील. आपण प्रदेशाध्यक्ष मा.श्री. @cbawankule यांच्यावर करत असलेल्या आरोपांना 'ना हात आहेत, ना पाय आहेत'. @rautsanjay61 किमान काचेचं घर असलेल्या घोटाळेबाजांनी दुसऱ्यांच्या घरावर दगडे मारायचे नसतात.
2
0
5
नवमहाराष्ट्राच्या विकासाचा नवा अध्याय! मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या कुशल नेतृत्वात दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रात तब्बल १६ लाख कोटी रुपयांची ऐतिहासिक गुंतवणूक झाली आहे. या गुंतवणुकीमुळे राज्यात जवळपास १६ लाख नोकऱ्यांच्या संधी निर्माण होणार आहेत, ही महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी अभूतपूर्व कामगिरी आहे. महाराष्ट्र आता प्रत्येक क्षेत्रात अव्वल ठरतो आहे आणि मुख्यमंत्री मा. देवेंद्रजींच्या दूरदृष्टी नेतृत्वाखाली राज्याच्या प्रगतीचा आलेख निश्चितच आणखी उंचावेल. या ऐतिहासिक यशासाठी महायुती सरकारचे आणि मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचे मनःपूर्वक अभिनंदन! @Dev_Fadnavis
#MahaAtDavos #WEF25 #UnstoppableMaharashtra
0
0
3
गतिमान महाराष्ट्राचे मिशन @ #WEF25 Davos विरोधक महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रयत्नशील असणाऱ्या सरकारला नावं ठेवत आहेत आणि तेच दुसरीकडे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राला गतिमान करत आहेत. दावोस येथे झालेल्या ३१ सामंजस्य करारांच्या माध्यमातून महाराष्ट्रात ६,२५,४५७ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे गतिमान नेतृत्व, लाडके मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र जी फडणवीस यांचे मनःपूर्वक अभिनंदन !! #महाराष्ट्र_आता_थांबणार_नाही #Davos
0
1
5
राज्यात पालकमंत्री पदावरून वाद असण्याचं काही कारण नाही. प्रत्येकाला अपेक्षा असते, आणि त्या अपेक्षा जाणून घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे काम आहे. पण मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर टीका करण्याची शिल्लक गटाच्या विश्वप्रवक्त्यांची जुनी खोड आहे. ही खोड काही केल्या जाणार नाही, असो! संजय राऊतजी, आपण यावरून लाचार मुख्यमंत्री अशी टीका करणार असाल! तर एक गोष्ट लक्षात घ्या, राज्याने आपल्या पक्षप्रमुखाची लाचारी अगदी जवळून पाहिली आहे. मुख्यमंत्री पद मिळावं, या एका हव्यासापोटी तुम्ही लाचारी पत्करलीत मग मुख्यमंत्रीपद टिकावं, यासाठी किती लाचारी केली असेल देव जाणो!
0
2
9
अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर काँग्रेसकडून फेक आरोप करून राजकारण केलं जातंय. याच विषयी @abpmajha च्या झिरो अव्हर या चर्चासत्र कार्यक्रमात सहभाग घेतला.
1
1
8