granthopasak Profile Banner
|ग्रं|थो|पा|स|क| Profile
|ग्रं|थो|पा|स|क|

@granthopasak

Followers
5K
Following
34K
Statuses
17K

#पुस्तकांची_ओळख 📚 #बेला_के_फूल 📻

Mumbai, India
Joined December 2016
Don't wanna be here? Send us removal request.
@granthopasak
|ग्रं|थो|पा|स|क|
3 days
#पुस्तकांची_ओळख ✍🏻✍🏻✍🏻✍🏻 ✍🏻✍🏻✍🏻 By #ग्रंथोपासक 😊 प्रत्येकच देशाच्या इतिहासात कित्येक दुर्दैवी घटनांच्या नोंदी सापडतात. काही नैसर्गिक तर काही मानवनिर्मित. नैसर्गिक आपत्तीला टाळता येणे अशक्य असले, तरी सोयीच्या दुर्लक्षामुळे, चुकांमुळे देशाला, एखाद्या समाजाला झालेले जबर नुकसान टाळणे मात्र शक्य असते. ३१ ऑक्टोबर १९८४ ला इंदिराजींची हत्या झाली त्याआधी त्यांचे अंगरक्षक बदलण्याच्या सूचना सुरक्षा यंत्रणांनी दिल्या होत्या. परंतु आपण शीख अंगरक्षक बदलले तर या समाजाबद्दल अविश्वासाचा वारा वाहील या कारणाने इंदिराजींनी त्यास नकार दिला (वाचलेलं). आणि शेवटी ज्याची भीती होती तेच झालं. सुरक्षारक्षक सतवंत सिंग आणि बिअंत सिंग यांनी इंदिराजींच्या देहाची अक्षरशः चाळण केली. या हत्येचं कारण ठरलं सुवर्ण मंदिरात शिरलेले अतिरेकी हुसकावून लावण्यासाठी केंद्र सरकारने केलेली लष्करी कारवाई... ५ जून ते १० जून १९८४ या कालावधीतील सुवर्ण मंदिरातील लष्करी कारवाईचा आँखो देखा हाल म्हणजे "ऑपरेशन ब्लू स्टार, जसं घडलं तसं..." हे पुस्तक. ते ही खुद्द ऑपरेशन प्रमुख लेफ्टनंट जनरल के.एस. ब्रार यांच्याकडून, अगदी इत्यंभूत, तपशीलवार... भारत पाकिस्तान फाळणीतून हिंदू-मुसलमान राष्ट्रे निर्माण झाली खरी, पण या फळणीत अजून एक फाळणी दिसून येते ती पंजाबची. फळणीमध्ये पंजाबचेही दोन तुकडे झाल्यामुळे पंजाबवर वर्चस्व असणाऱ्या शीख समाजाला हिंदू नेत्यांबद्दल, हिंदू समाजाबद्दल अविश्वास वाटू लागला असावा (मत). १९४७ पास���नच पंजाबी बोलणाऱ्यांसाठी पंजाब हे स्वतंत्र राज्य असावं या मास्टर तारा सिंह यांच्या मागणीपासून, १९७० च्या दशकात स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणाऱ्या अतिरेकी भिंद्रनवाले याच्या उदयापर्यंत, पंजाबचे धगधगते राजकारण, खदखदते समाजकारण लेखकाने थोडक्यात पण अगदी व्यवस्थित समजावून दिले आहे. पंजाब आणि पंजाबचे लोकमानस भिंद्रनवालेच्या ताब्यात गेलं आणि देशाच्या एकोप्याला आव्हान देणाऱ्या एका क्रूर अतिरेक्याचा जन्म झाला. अकाली दलाचा प्रभाव कमी करण्यासाठी सुरवातीला काँग्रेसनेही भिंद्रनवालेला ताकद दिली होती (वाचलेलं) आणि काही काळाने हाच भिंद्रनवाले काँग्रेस, अकाली दल, पोलीस, प्रशासन वैगेरे कुणालाही ऐकेनासा झाला. अनेक खून, असंख्य लुटी करून समांतर सरकार चालवणाऱ्या भिंद्रनवालेच्या मुसक्या आवळण्यासाठी केंद्र सरकार हालचाली करू लागल्यावर, त्याने शेवटी शीख समाजाची अस्मिता असणाऱ्या सुवर्ण मंदिरात आसरा घेतला. अनेक प्रशिक्षित अतिरेकी, सैन्य दलातील निवृत्त/ बडतर्फ अधिकारी, गुन्हेगार, अत्याधुनिक शस्त्र सामग्री वैगेरेंनी सज्ज असलेल्या भिंद्रनवालेशी लढताना, सुवर्ण मंदिरातील हरमंदिर साहिब (पवित्र स्थान) वर एकही गोळी चालवणार नाही अशी मनोमन शपथ घेऊन लढणारे आपले ८३ वीर सैनिक मृत्यूला सामोरे गेले. लेखकाने या लढाईची गरज, निर्णय, आखणी, हालचाल, वाटचाल, अफवा, गैरसमज, संग्राम आणि विजय वैगेरे या पुस्तकात व्यवस्थित रचून ठेवला आहे. प्रत्यक्षात कारवाई ५-६ दिवसरात्र चालली असली, तरी त्याचे परिणाम पुढील २५-३० वर्षे दिसत होते... जसे इंदिराजींची हत्या, शीखांविरुद्धची दंगल, त्यावेळचे लष्कर प्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य यांची पुण्यात हत्या, शिवाय खुद्द लेखकावर लंडनमध्ये झालेला हल्ला... सुवर्ण मंदिरातील या लष्करी कारवाईच्या हेतूबद्दल प्रशासकीय अधिकारी कुलदीप नय्यर किंवा ज्येष्ठ साहित्यिक खुषवंतासिंग यांच्यासारख्या उच्च विद्याविभूषित लोकांचेच अगाध अज्ञान होते, तर सर्वसामान्य शीख समाजामध्ये लष्कराच्या या धाडसाविरोधात किती अफवा आणि किती गैरसमज पसरले होते याची कल्पना पुस्तक वाचताना येते. या विषयावरील आपल्या समजाचे, माहितीचे खुंटे हलवून पुन्हा बळकट करण्यासाठी नक्कीच #वाचावं_असं_पुस्तक #नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे #वाचत_राहूया_शिकत_राहूया #कम्फर्ट_झोन_बाहेरचं_पुस्तक #सबका_मलिक_एकच_पुस्तकं #मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे #पुस्तकांशी_सलगी #पुतळे_नको_पुस्तकं_हवी #वाचन_शुभेच्छा 💐
Tweet media one
@granthopasak
|ग्रं|थो|पा|स|क|
5 months
#पुस्तकांची_ओळख ✍🏻✍🏻✍🏻✍🏻 ✍🏻✍🏻✍🏻 by #ग्रंथोपासक 😊 फॉर हिअर, ऑर टू गो? इतर देशांतून अमेरिकेत येणाऱ्या प्रत्येकाला कधी न कधी कळत नकळत कुत्सितपणे विचारला गेलेला हा प्रश्न... इथेच राहणार की गडगंज पैसा कमावून आपापल्या देशात निघून जाणार? हेटाळणीचे असे टोमणे झेलत १९६० च्या आसपास अमेरिकेत येण्यासाठी देश सोडलेले मराठी तरुण तरुणी, हे पुस्तक २००७ साली प्रकाशित झालं तेव्हा ६०-७० वर्षांचे सिनियर सिटिझन्स झाले असतील. त्यांच्या स्थलांतरित आयुष्यातील ४०-४५ वर्षांच्या हेलकाव्यांच्या लाटा, अपर्णा वेलणकर या कलंदर लेखिकेने या पुस्तकात कैद केल्या आहेत. कधी अक्राळ विक्राळ तर कधी संथ गंभीर अशा समुद्री लाटांच्या हेलकाव्यांमधून जशी लहान मोठी जहाजे आपापल्या वकुबाप्रमाणे मार्गक्रमण करत असतात, तशा काही मराठी माणसांच्या आयुष्याच्या जहाजांचे हे स्थलांतरित मार्गक्रमण... अमेरिकेच्या किनाऱ्याला लागणाऱ्या या मराठीजनांचे चार लाटांमध्ये वर्गीकरण करता येतील... भारतातील कारकुनी शिक्षण आणि संधींची उपासमार या तुलनेत अमेरिकेतील उच्च शिक्षण, स्वातंत्र्य आणि प्रगतीची संधी पाहून पहिल्या पिढीतील लोकांनी अमेरिकन भूमीवर पाय ठेवले ती स्थलांतरितांची पहिली लाट. जन्मापासून तरुणपणापर्यंतच्या आठवणी, माणसे, ठिकाणं हजारो मैल दूर ठेवून आलेल्या या पिढीला अमेरिकेत जम बसवण्यास प्रचंड संघर्ष करावा लागला आणि सुरू झाली शरीर-मनाची, भाव-भावनांची, अदृश्य असह्य घालमेल आणि तडफड. त्यातून काही अपयशी होऊन माघारी फिरले, तर काहींनी तग धरत आपल्या अर्धांगिनीला अमेरिकेत बोलवून घेतले. या "बेटर हाफ" म्हणजे अमेरिकेवर जाऊन धडकलेली दुसरी लाट. १९६०-७० च्या भरारी घेण्याच्या काळात अमेरिकेला मनुष्यबळाची बेसुमार आवश्यकता भासल्यामुळे "फॅमिली रियुनीफिकेशन" नावाखाली, तोपर्यंत अमेरिकेत स्थायिक झालेल्यांना आपल्या नातलगांना अमेरिकेत आणण्यासाठी मुभा देण्यात ��ली. या स्पॉन्सर स्कीममध्ये आलेले कुटुंब-नातलग, विशेष प्राविण्य नसताना देखील अमेरिकेत दाखल होऊ शकले ही तिसरी लाट म्हणता येईल. चौथी लाट मात्र स्थलांतरितांच्या या मराठी कुटुंबांमध्येच निर्माण झाली, ती म्हणजे त्यांची दुसरी पिढी. जी पिढी स्वतःला ना धड भारतापासून पूर्णपणे वेगळं करू शकली, ना धड अमेरिकेशी पूर्णपणे एकरूप होऊ शकली. या चारही लाटांनी कधी एकमेकांशी आदळत, कधी एकमेकांशी एकरूप होत, "अमेरिकेन ड्रीम"च्या किनाऱ्याला लागण्यासाठी चिवटपणे केलेल्या अविरत परिश्रमांचा मागोवा म्हणजे हे पुस्तक. ज्यामुळे आपल्या अमेरिकेत राहणाऱ्या मराठी कुटुंबीयांकडे बघण्याच्या दृष्टिकोनात नक्कीच बदल होऊ शकतो. प्रयत्नांची पराकाष्ठा करून साधलेल्या प्रगतीमुळे अख्खा डोंगर विकत घेऊन राजवाड्यासारखे घर बांधणारं एखादं यशस्वी मराठी कुटुंब एकीकडे... तर जुजबी कौशल्यामुळे विशेष प्रगती न केलेले मुंबईतील चाळीतील घर भासावे अशा घरात राहणारे त्यामानाने अपयशी मराठी कुटुंब एकीकडे... जीवनमानाच्या या दोन टोकांवरील मधल्या अंतरात सापडणाऱ्या अनेक मराठी कुटुंबांच्या, त्यातील माणसांच्या संघर्षाची, प्रयत्नांची, सुख-दुःखाची, मान-अपमानाची, यश-अपयशाची, दुस्वास-जिव्हाळ्याची ही खरीखुरी कहाणी... प्रत्येकाने वाचलीच पाहिजे अशी... #नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे #वाचत_राहूया_शिकत_राहूया #कम्फर्ट_झोन_बाहेरचं_पुस्तक #पुस्तकांशी_सलगी #वाचावं_असं_पुस्तक #वाचन_शुभेच्छा 💐
Tweet media one
4
3
22
@granthopasak
|ग्रं|थो|पा|स|क|
2 hours
#नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे  #वाचत_राहूया_शिकत_राहूया #पुस्तकाचं #वैविध्य 👇🏻👌🏻
@_zenman
Manish | Creating, without hustle. 🧘🏽‍♂️
4 years
Few authors, books that I've liked at various stages of life. Outgrown some of them, yet... Posting them in a thread here. * Ruskin Bond - A book of simple living
Tweet media one
Tweet media two
0
0
1
@granthopasak
|ग्रं|थो|पा|स|क|
2 hours
#नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे  #वाचत_राहूया_शिकत_राहूया #कम्फर्ट_झोन_बाहेरचं_पुस्तक #आवडतं #पुस्तक #वाचनीय 👌🏻#थ्रेड 👇🏻
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
12 hours
प्लॅटफॉर्म नंबर झिरो अमिता नायडू अंगावर धड कपडे नसलेली, जखमा वागवणारी, झिपर्‍या केसांची मुले रेल्वे स्टेशनाच्या परिसरात, प्लॅटफॉर्मावर किंवा कुठेतरी वळचणीवर आपलं बेवारस आयुष्य जगतात. या मुलांचं जीवन रुळांवरून पुरतं घसरलेलं असतं. 👇 @LetsReadIndia @PABKTweets
Tweet media one
0
0
2
@granthopasak
|ग्रं|थो|पा|स|क|
2 hours
#नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे #वाचत_राहूया_शिकत_राहूया
@Sakshihere2401
SakshiA
6 hours
#BookReview "Not all superheroes wear capes; some wear olive green." भारतीय लष्करात पॅरा रेजिमेंटमधील अधिकाऱ्यांनी असामान्य शौर्य दाखवले आहे. त्यांच्यापैकी काही अधिकाऱ्यांच्या प्रेरणादायी कथा लेखिका स्वप्निल पांडे यांनी 'बलिदान' पुस्तकात मांडल्या आहेत. (1/3)
Tweet media one
Tweet media two
0
0
2
@granthopasak
|ग्रं|थो|पा|स|क|
1 day
#पुस्तकांची_ओळख (#कॉपीपेस्ट 😊) "The world will little note, nor long remember what we say here, but it can never forget what they did here. It is for us the living, rather, to be dedicated here to the unfinished work which they who fought here have thus far so nobly advanced." - Abraham Lincoln Abraham Lincoln, known for leading the American Civil War, was a seasoned public speaker, leaving a legacy that spans generations. Lincoln delivered one of the most quoted speeches in history on a number of following occasions, enthralling his audience and setting the path for future generations. His constant struggle against slavery was essentially captured in his speeches that have been passed down in writing through generations, both in action and ethos. This collection of Lincoln’s speeches sheds light on a lot of issues pertinent to our contemporary global political scenario and enlightens the reader on how to be wary of them while presenting a strong front. #नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे #वाचत_राहूया_शिकत_राहूया #कम्फर्ट_झोन_बाहेरचं_पुस्तक #सबका_मलिक_एकच_पुस्तकं #मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे #पुस्तकांशी_सलगी #पुतळे_नको_पुस्तकं_हवी #वाचन_शुभेच्छा 💐
Tweet media one
0
3
9
@granthopasak
|ग्रं|थो|पा|स|क|
2 days
#पुस्तकांची_ओळख (#कॉपीपेस्ट 😊) 'संतांचा भागवतधर्म ते भारतीय राज्यघटना' असे शीर्षक असलेल्या या ग्रंथाची मांडणी दोन विभागात केली आहे. पहिला विभाग 'संत-चळवळ���चा मागोवा' हा असून दुसऱ्या विभागात 'संत-चळवळीचा वारसा' आहे. प्रस्तुत ग्रंथात चळवळीच्या माध्यमातून हिंदू धर्मातील समतेच्या विचाराला चालना कशी मिळत गेली याचा ऊहापोह करण्यात आला आहे. पुराणग्रंथकाळ हा धर्मशास्त्राचा शेवटचा कालखंड होय. या काळात यज्ञधर्मापेक्षा भक्तिमार्ग हा श्रेष्ठ आहे असा दावा पुराणांनी केला. त्यानंतर भक्तिमार्ग स्त्री-शुद्रांना खुला झाला. त्याचबरोबर यज्ञधर्माचा शेवट होऊन भक्तिमार्गाचा प्रभाव वाढू लागला; आणि समतेच्या तत्त्वज्ञानाने चांगलीच भरारी घेतली. शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या लढ्याला या संत चळवळीने फार मोठा हातभार लावला असे न्या. गोविंद महादेव रानडे यांनी प्रतिप्रादन केले. ते समाजसुधारकही होते. त्यामुळे इंग्रजी अंमल सुरू झाल्यानंतर सामाजिक सुधारणा चळवळ चांगलीच फोफावली. समतेचे तत्त्वज्ञान महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर यांनी उचलून धरले. #नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे #वाचत_राहूया_शिकत_राहूया #कम्फर्ट_झोन_बाहेरचं_पुस्तक #सबका_मलिक_एकच_पुस्तकं #मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे #पुस्तकांशी_सलगी #पुतळे_नको_पुस्तकं_हवी #वाचन_शुभेच्छा 💐
Tweet media one
0
2
8
@granthopasak
|ग्रं|थो|पा|स|क|
3 days
@DrVidyaDeshmukh थॅन्क्स मॅम🙏🏻😊
0
0
1
@granthopasak
|ग्रं|थो|पा|स|क|
3 days
@aksharankit_070 थॅन्क्स 🙏🏻😊
0
0
1
@granthopasak
|ग्रं|थो|पा|स|क|
4 days
#नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
5 days
द चेंबर लेखक - जाॅन ग्रिशॅम अनुवाद - विश्वनाथ केळकर सॅम केहाॅल आपल्या तारुण्यावस्थेत वंश विद्वेषी, ज्यू द्वेष्ट्या, दहशतवादी क्लॅन संघटनेचा सदस्य होता. बॉम्बस्फोट करून हत्या केल्याचा आरोप सिद्ध होऊन त्याला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. 👇 @LetsReadIndia @PABKTweets
Tweet media one
0
0
5
@granthopasak
|ग्रं|थो|पा|स|क|
4 days
@lonesometalks 🙏🏻😊
0
0
1
@granthopasak
|ग्रं|थो|पा|स|क|
5 days
#नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे
@jamirjlandge
जमिर लांडगे
6 days
@letsreadindia @granthopasak @PABKTweets #mustreadbook #वाचायलालागतंय #पुस्तक #वाचन #नादपुस्तकांचा #वेडपुस्तकांचे #वाचतराहूयाशिकतराहूया #मराठी #रारंगढांग #प्रभाकरपेंढारकर रारंगढांग ही प्रभाकर पेंढारकर यांची कादंबरी हिमालयातील पर्वतरांगांचा आतील आवाज आहे. (1/22)
Tweet media one
1
0
4
@granthopasak
|ग्रं|थो|पा|स|क|
5 days
#नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे #वाचत_राहूया_शिकत_राहूया #वाचनीय 👇🏻 #थ्रेड 👌🏻
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
5 days
द चेंबर लेखक - जाॅन ग्रिशॅम अनुवाद - विश्वनाथ केळकर सॅम केहाॅल आपल्या तारुण्यावस्थेत वंश विद्वेषी, ज्यू द्वेष्ट्या, दहशतवादी क्लॅन संघटनेचा सदस्य होता. बॉम्बस्फोट करून हत्या केल्याचा आरोप सिद्ध होऊन त्याला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. 👇 @LetsReadIndia @PABKTweets
Tweet media one
0
0
5
@granthopasak
|ग्रं|थो|पा|स|क|
5 days
#पुस्तकांची_ओळख (#कॉपीपेस्ट 😊) खून, चोरी, घरफोडी, लूट, खंडणी, किडनॅपिंग, बलात्कार यासारख्या गुन्ह्यांमध्ये जेव्हा अल्पवयीन मुलं सापडतात तेव्हा काय असते सामान्यांची प्रतिक्रिया ? १६-१७ वर्षाच्या मुलाला फाशी द्या, त्यांना कडक शिक्षा द्या ही आणि अशीच ना? या दबावामुळे मुलांच्या कायद्यातही बदल केले जातात. सामान्य सोडा पण कायदे यंत्रणा, त्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा, मुलांना ज्या सरकारी निरीक्षण गृहात ठेवलं जातं तिथ���ी यंत्रणा... कसा असतो सगळ्यांचा या मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन ? ज्या कृतीमुळे या मुलांचं सगळं आयुष्य बदलून जातं ती खरंतर त्यांच्याकडून का होते? काय असतं या मागचं वास्तव ? त्यांना या वाटेवर जायला प्रवृत्त करणारे कोण आहेत? या आणि अशा काही प्रश्नांना थेट आणि परखडपणे ��िडून लिहिलेलं हे पुस्तक मराठीतलं किंबहुना भारतीय भाषेतलं पहिलंच पुस्तक आहे. मुलांना या अंधाऱ्या जगात ढकलणाऱ्या वास्तवाचा या मुलांशी बोलून, त्यांना समजून घेतलेला हा वेध प्रत्येकानं वाचलाच पाहिजे तरच या पुस्तकात असलेल्या कुणाल, गोट्या, जयेश, पराग, अनिल, अमर, रोहन, जयदीप, शरद व अन्य मुलांच्या जगण्यातल्या भीषणतेची कल्पना येऊ शकेल. 'प्लॅटफॉर्म नं झीरो' च्या लेखिकेचं विधीसंघर्षग्रस्त मुलांचं आयुष्य उलगडून दाखवणारं हे पुढचं पुस्तक ! प्रत्येक संवेदनशील माणसाला अंतर्मुख करणारं आहे!! म्हणून ते विकत घेऊन वाचायलाच हवं !!! #नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे #वाचत_राहूया_शिकत_राहूया #कम्फर्ट_झोन_बाहेरचं_पुस्तक #सबका_मलिक_एकच_पुस्तकं #मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे #पुस्तकांशी_सलगी #पुतळे_नको_पुस्तकं_हवी #वाचन_शुभेच्छा 💐
Tweet media one
0
4
18
@granthopasak
|ग्रं|थो|पा|स|क|
6 days
RT @lonesometalks: "एक चिराग़ और एक किताब और एक उम्मीद असासा उस के बाद तो जो कुछ है वो सब अफ़्साना है" इफ़्तिख़ार आरिफ़
0
1
0
@granthopasak
|ग्रं|थो|पा|स|क|
6 days
#नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे
@jayukawade
Jayesh Kawade
7 days
लहानपणी बरेच ऐकले होते, असली पुस्तके लहानमुलांनी वाचू नये असे ऐकले हहोते. यावर एक मराठी सिनेमा आला होता, विक्रम गोखलेंचा. आज वाचून झालं एकाच तासात पुढे तीचं काय झालं असेल यावर दुसरा भाग लिहि��्याची विनंती मा लेखकांना केली असती. @LetsReadIndia @KalantriPravin @granthopasak
Tweet media one
0
0
1
@granthopasak
|ग्रं|थो|पा|स|क|
6 days
#नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे
@marathi__shala
मराठी__शाळा..
8 days
'ओके... सॉरी... थँक यू!' हे प्रफुल्ल वानखेडे आणि प्रसिद्ध व्यंगचित्रकार आलोक निरंतर यांनी एकत्रितपणे साकारलेले पुस्तक आहे. या पुस्तकात दोन अनोळखी व्यक्तींची रस्त्यावर होणारी सहज भेट आणि त्यातून पुढे जाणारी गोष्ट हलक्या-फुलक्या शैलीत मांडण्यात आली आहे. गप्पांच्या माध्यमातून, खुमासदार आणि विनोदी पद्धतीने, जगण्यातल्या शाश्वत मूल्यांचा उहापोह करण्यात आला आहे. आजची सामाजिक परिस्थिती, करिअर, आर्थिक नियोजन, साक्षरता, वाचनाचे महत्त्व, नैतिकता, सुख आणि दुःख यांसारख्या विविध विषयांवरच्या विधायक गप्पा सोप्या भाषेत आणि आकर्षक चित्रांच्या माध्यमातून मांडण्यात आल्या आहेत. एक उद्योजक, एक पत्रकार, एक अनुभवी तरी मिश्किल आजोबा आणि एक होतकरू तरुणी या चार पात्रांच्या माध्यमातून सकारात्मक संदेश अतिशय सोप्या, वाचनीय आणि आकर्षक शैलीत देण्यात आला आहे.एकंदरीत, 'ओके... सॉरी... थँक यू!' हे पुस्तक हलक्या-फुलक्या शैलीत जीवनातील महत्त्वाच्या मूल्यांवर विचार करण्यास प्रवृत्त करते आणि वाचकांना एक वेगळा अनुभव देते. #नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे #वाचत_राहूया_शिकत_राहूया #कम्फर्ट_झोन_बाहेरचं_पुस्तक #सबका_मलिक_एकच_पुस्तकं #मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे #पुस्तकांशी_सलगी #पुतळे_नको_पुस्तकं_हवी #वाचन_शुभेच्छा 💐
Tweet media one
0
0
6
@granthopasak
|ग्रं|थो|पा|स|क|
6 days
#पुस्तकांची_ओळख (#कॉपीपेस्ट 😊) प्रसिध्द अभिनेता रमेश भाटकर यास बलात्काराच्या खोट्या केसमध्ये गुंतवण्यात आल होतं. माणसांवर नितांत प्रेम करणारा रमेश. त्याचा सांस्कृतिक क्षेत्रातला उमदा वावर, प्रसिध्दीच वलय, पण ह्या घटनेने तो कोमेजून गेला होता. रमेशची पत्नी मृदुला भाटकर न्यायमूर्ती असल्यामुळे हा बलात्काराचा डाग पुर्ण खोटा असला तरी तो पुसण्यासाठीची कायदेशीर लढाई अधिक कठीण होती. या खटल्यामुळे त्यांच्या ��युष्यातील काही वर्षे अक्षरश: उदध्वस्त झाली. मात्र ते एकमेकांच्या सहाय्याने, प्रेमाच्या आधारावर लढले. त्यांचा हा जगण्याला भिडण्याचा अनुभव! समाजाला या आणि अशा हादरवणार्‍या घटनांची माहिती नसते. म्हणून ही न्यायासाठी, सत्याच्या आधाराने केलेल्या लढाईची गोष्ट... हे सांगायला हवं! #नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे #वाचत_राहूया_शिकत_राहूया #कम्फर्ट_झोन_बाहेरचं_पुस्तक #सबका_मलिक_एकच_पुस्तकं #मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे #पुस्तकांशी_सलगी #पुतळे_नको_पुस्तकं_हवी #वाचन_शुभेच्छा 💐
Tweet media one
0
3
32
@granthopasak
|ग्रं|थो|पा|स|क|
8 days
#वाचत_राहूया_शिकत_राहूया 🔥🔥🔥
@garvirawat
Garvi Rawat
9 days
Tweet media one
0
0
3
@granthopasak
|ग्रं|थो|पा|स|क|
8 days
#नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे #कम्फर्ट_झोन_बाहेरचं_पुस्तक #वाचत_राहूया_शिकत_राहूया
0
0
2