RRPSpeaks Profile Banner
Rohit Pawar Profile
Rohit Pawar

@RRPSpeaks

Followers
764K
Following
1K
Statuses
22K

Committed to a better Maharashtra & @NCPspeaks MLA from Karjat-Jamkhed CEO Baramati Agro https://t.co/4TraX4g9cs

Maharashtra, India
Joined November 2019
Don't wanna be here? Send us removal request.
@RRPSpeaks
Rohit Pawar
8 hours
दिल्ली विधानसभा चुनाव का नतीजा वाकई चौंकाने वाला है। आम आदमी पार्टी (AAP), खासकर मनीष सिसोदिया जी ने शिक्षा और स्वास्थ्य के क्षेत्र में ऐसा काम किया, जिसे पूरे देश में एक मिसाल के तौर पर देखा गया। इसके बावजूद अगर उन्हें हार मिली है, तो ये सिर्फ एक चुनावी नतीजा नहीं, बल्कि विकास बनाम सत्ता और ताकत की राजनीति की लड़ाई में विकास की हार जैसा लगता है। चुनावी हार से परे, इस तथ्य से इनकार नहीं किया जा सकता कि AAP ने शिक्षा के बुनियादी ढांचे और स्वास्थ्य सुविधाओं में सुधार के वादों पर सफलता प्राप्त की है। चाहे मॉडल स्कूल हों या मोहल्ला क्लीनिक, दिल्ली के मतदाता निश्चित रूप से विकास की रूपरेखा में सोचने के लिए प्रेरित हुए, जो किसी भी पार्टी के लिए एक दुर्लभ राजनीतिक उपलब्धि है। भाजपा को जीत की बधाई, लेकिन सवाल वही रहेगा—क्या दिल्ली को और अच्छे स्कूल, बेहतर स्वास्थ्य सुविधाएं, साफ हवा और स्वच्छ यमुना मिलेगी? उम्मीद है कि अब मुख्यमंत्री और उपराज्यपाल आपसी टकराव छोड़कर जनता से किए गए वादों को पूरा करने पर ध्यान देंगे। @msisodia @AamAadmiParty #DelhiAssemblyElection2025 | #दिल्ली_विधानसभा |
10
4
50
@RRPSpeaks
Rohit Pawar
13 hours
दिल्ली विधानसभेचा निकाल हा धक्कादायक आहे. आम आदमी पक्षाने आणि विशेषतः मनीष सिसोदिया साहेब यांच्यासारख्या निरलस व्यक्तीमत्त्वाने सामान्य माणसासाठी शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात देशात कुठंही झालं नाही असं डोंगराएवढं काम दिल्लीत उभं केलं. तरीही त्यांना पराभवाला सामोरं जावं लागत असेल तर निवडणुकीच्या राजकारणातून विकास हद्दपारच होईल आणि नेतेही विकासकामं करणं सोडून केवळ द्वेषाचंच राजकारण आणि इव्हेंटबाजीच करतील की काय, याची भीती वाटते. या निकालाने विकास करावा की नाही, असा प्रश्न पडला तर तो चुकीचा ठरणार नाही! एकीकडं विकास तर दुसऱ्या बाजूला सत्ता, संपत्ती आणि गुंडगिरी, या पर्यायात विकासाचा पराभव झाला आणि यामुळं सामान्य माणसालाच अनेक अडचणींना सामोरं जावं लागणार आहे, याचं अधिक दुःख वाटतं. असो! गेली दहा वर्षे मुख्यमंत्र्यांना अनेक अडथळ्याची शर्यत पार करावी लागली, पण आता किमान मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल हे पायात पाय न घालता हातात हात घालून काम करतील आणि जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करतील, ही अपेक्षा! @msisodia @AamAadmiParty #DelhiAssemblyElection2025 | #दिल्ली_विधानसभा |
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
50
12
282
@RRPSpeaks
Rohit Pawar
16 hours
दिल्लीच्या जंगपुरामध्ये मनीष शिसोदिया ७०० मतांनी पराभूत झाले तर काँग्रेसच्या सुरी यांना ७३५० मते मिळाली. नवी दिल्लीत अरविंद केजरीवाल जवळपास ३४०० मतांनी पराभूत झाले, तिथं काँग्रेसच्या संदीप दीक्षित यांना ४५०० हून अधिक मते मिळाली, कस्तुरबानगरमध्ये काँग्रेस उमेदवाराचा ११००० मतांनी पराभव झाला तर ‘आप’ला १८००० मते मिळाली. २० हून अधिक मतदारसंघात अशीच काहीशी स्थिती आहे. दोन्ही पक्षांनी समन्वय साधला नाही, परिणामी अहंकार आणि इगोमुळे दोन्ही पक्ष कळतनकळत भाजपची ‘बी टीम’ प्रमाणेच काम करून गेले, ही शोकांतिका आहे. या निकालातून धडा घेऊन #INDIA आघाडीचे नेते किमान यापुढच्या निवडणुका तरी समन्वयाने लढ��ील का? हा खरा प्रश्न आहे. #DelhiElection2025 | #दिल्ली_विधानसभा |
188
64
782
@RRPSpeaks
Rohit Pawar
18 hours
दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल भाजपचे अभिनंदन! १५ हून अधिक ठिकाणी भाजपच्या विजयी उमेदवारांचे मताधिक्य तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराने मिळवलेल्या मतापेक्षा खूप कमी आहे. ही सर्व आकडेवारी बघितली असता INDIA आघाडी असती तर भाजपा २० जागांच्या वर देखील गेली नसती. दिल्ली निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या नेतृत्वात सरकार स्थापन व्हावे ही माझी व्यक्तिगत भावना होती. उचित-अनुचित अशा सर्व मार्गांचा वापर करून निवडणुका लढणाऱ्या भाजपासारख्या #महाशक्ती विरोधात लढताना समान विचारधारा असलेल्या पक्षांनी एक-दोन पाऊल मागे-पुढे घेण्याची गरज होती, परंतु दुर्दैवाने इंडिया आघाडीतील पक्षांनी आपापले इगो बाजूला सारले नाहीत, परिणामी अशक्य असणारी विजयश्री भाजपाने खेचून आणली. ही बाब ट्रॅडिशनल पद्धतीने लढणाऱ्या सर्व नेत्यांनी लक्षात घ्यायला हवी. #DelhiElectionResults | #दिल्ली_विधानसभा |
273
48
847
@RRPSpeaks
Rohit Pawar
21 hours
सोयाबीन किसान पूछ रहा है, सरकार 'सोया' है क्या? राज्यातील ७.७७ लाख शेतकऱ्यांनी शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर नोंदणी केली तरी केवळ ५.११ लाख शेतकऱ्यांकडीलच सोयाबीन खरेदी करण्यात आलं असून अद्यापही नोंदणीकृत २.६६ लाख शेतकऱ्यांकडील सोयाबीन खरेदीविना पडून आहे. राज्य सरकारने सोयाबीन खरेदीचं निश्चित केलेलं १४.१३ लाख टन उद्दीष्ट पूर्ण होण्यापूर्वीच शासकीय हमीभाव खरेदी केंद्रे गुंडाळून शेतकऱ्यांची फसवणूक केलीय. सरकारने तातडीने सोयाबीन खरेदीला मुदतवाढ द्यावी अन्यथा सोयाबीन शिल्लक असलेल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या करायची की शिल्लक सोयाबीन मंत्र्यांच्या दारात आणून टाकायचं, हे तरी जाहीर करावं! @Dev_Fadnavis @JaykumarRawal #SaveFarmers | #SoybeanCrisis | #MaharashtraAgriculture | #FarmersRights |
Tweet media one
6
10
48
@RRPSpeaks
Rohit Pawar
23 hours
भारताचे तिसरे राष्ट्रपती, थोर शिक्षणतज्ज्ञ, भारतरत्न डॉ. झाकीर हुसेन यांच्या जयंतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन! देशाच्या शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेलं कार्य सदैव प्रेरणादायी राहील. #DrZakirHussain
Tweet media one
2
3
23
@RRPSpeaks
Rohit Pawar
1 day
सद्गुरु संत श्री गोदड महाराज यांच्या १८७ व्या संजीवन समाधी सोहळ्याला भक्तिभावाने सुरुवात होत असून आज संत श्री गोदड महाराजांच्या पावन समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं आणि भाविकांशी संवाद साधला.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
6
87
@RRPSpeaks
Rohit Pawar
2 days
जामखेड तालुका डॉक्टर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन त्यांच्या अडचणी मांडल्या. ‘बॉम्बे नर्सिंग ॲक्ट’ मधील काही तरतुदी या तालुकापातळीवर प्रॅक्टिस करणाऱ्या हॉस्पिटलसाठी जाचक असून त्या शिथिल करण्याची त्यांची मागणी आहे. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली, तसंच सरकारकडं या मागण्या मांडून त्या मान्य करण्यासाठी पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
4
4
32
@RRPSpeaks
Rohit Pawar
2 days
निवडणुकीतील यशाबद्दल रत्नापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (SP) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्यावतीने विजयोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि ह.भ.प. अशोक महाराज भाकरे यांचं श्री हरिकिर्तन झालं. या विजयोत्सवास उपस्थित राहून किर्तनाचा लाभ घेतला आणि ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांचे आभार मानले. माझ्यावर प्रेम करणारी ही माणसं भविष्यातही कायम माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहतील, असा विश्वास आहे.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
4
57
@RRPSpeaks
Rohit Pawar
2 days
सरकारकडून निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेच्या नावाखाली राज्यातील तरूणांना तात्पुरत्या स्वरूपात रोजगार देण्यात आला. आता या योजनेत सहभागी असलेल्या तरूणांना ६ महिने पुर्ण होणार असल्याने बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. ऐन उमेदीच्या काळात थेट सरकारी योजनेतून काढून टाकल्याचे नकारात्मक परिणाम संबंधित युवांवर होऊ शकतात. माझ्या मतदारसंघातील तरुण-तरुणींनी याबाबत भेट घेऊन चर्चा केली आणि त्यांची भावना निवेदनाच्या माध्यमातून व्यक्त केली. तरी राज्य सरकारने संबंधित योजनेतील युवकांंना जोपर्यंत कायम नोकरी मिळत नाही तोपर्यंत कामावरून काढू नये. इतकेच नाही तर योजनेतील सहभागी युवांना विद्यावेतन वाढवून देण्यावरही सरकार विचार करेल, ही अपेक्षा! @Dev_Fadnavis #मुख्यमंत्री_कार्य_प्रशिक्षण_योजना
Tweet media one
3
10
43
@RRPSpeaks
Rohit Pawar
2 days
पुण्यात हडपसर (काळेपडळ) इथं राज्यातील एकमेव असलेल्या प्रभू श्री विश्वकर्मा मंदिरापुढं सभामंडप बांधण्यासाठी खारीचा वाटा उचलण्याचं भाग्य मिळालं आणि सोमवारी (दि. १० फेब्रुवारी) दुपारी या सभामंडपाचं लोकार्पण होत आहे, याचा विशेष आनंद वाटतो. या कार्यक्रमात मीही दुपारी 12 वाजता आवर्जुन सहभागी होणार आहे. #प्रभूविश्वकर्मा |
Tweet media one
0
3
17
@RRPSpeaks
Rohit Pawar
2 days
अर्थसंकल्पावेळी आमदारांना अर्थसंकल्पाची प्रकाशने ठेवण्याकरिता बॅग्स देण्याची प्रथा जुनी असली तरी सद्यस्थितीला डिजीटल तंत्रज्ञानाच्या युगात ही प्रथा अनावश्यक वाटत होती. त्यामुळं ही प्रथा बंद करण्याच्या विनंतीची दखल घेत सरकारने हा निर्णय रद्द केला. या निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री अजितदादा, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे तसेच यासाठी पाठपुरावा करणारे सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार यांचेही आभार. हा निर्णय छोटासा असला तरी अनावश्यक प्रथा परंपरा बदलण्यास भाग पाडणारा तर आहेच शिवाय विरोधी पक्ष आणि सरकार यांच्या सकारात्मक भूमिकांनी रचनात्मक राजकारणाची पायाभरणी करणाराही आहे. #महाराष्ट्र | #रचनात्मक_राजकारण | #सकारात्मक_बदल | #डिजिटल_युग |
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
@RRPSpeaks
Rohit Pawar
22 days
आज एका वृत्तपत्रात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत देण्यासाठी शासनाकडे पैसे नसल्याची तर दुसऱ्या वृत्तपत्रात मात्र आमदारांना अर्थसंकल्पाची प्रकाशने ठेवण्याकरिता देण्यात येणाऱ्या बॅग्ससाठी ८६ लाखाची तरतूद करण्यात आल्याची बातमी बघितली. या दोन्ही बातम्या बघता, शासनाच्या खर्चाचं प्राधान्य काय असायला हवं, याचा विचार सर्वांनीच करण्याची गरज वाटते. अर्थसंकल्पानंतर अर्थसंकल्पाची पुस्तके ठेवण्यासाठी आमदारांना बॅग देण्याची प्रथा आहे. विधानपरिषदेच्या १२ रिक्त जागा वगळता आज विधानसभा आणि ३५४ सदस्य आहेत. ३५४ सदस्यांसाठी ८२ लाख म्हणजे एका सदस्याची बॅग सर्व खर्च पकडून २३२०० रुपयांना पडते. राज्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला देण्यासाठी सरकारकडे पैसे नसताना बॅगसाठी अशाप्रकारे महागडा खर्च करणे कोणत्याही आमदाराला पटणार नाही. मुळात अर्थसंकल्पाची पुस्तके ठेवण्यासाठी एवढ्या महागड्या बॅग्स देण्याची गरजच नाही. शासन पेन ड्राईव्ह देत असेल तर प्रिंटेड बुक्स देण्याची सुद्धा गरज नाही आणि त्यातही सर्व अर्थसंकल्पीय प्रकाशने web site वर उपलब्ध असतील तर पेन ड्राईव्ह देण्याची सुद्धा आवश्यकता वाटत नाही. काळाच्या गरजेनुसार प्रथा परंपरा सुरू होतात परंतु बदलत्या काळासोबत अनावश्यक प्रथा परंपराही बदलाव्या लागतात. आज डिजिटल साधने उपलब्ध असताना, महागड्या बॅग्स देण्याची प्रथा बदलली नाही तर आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या digital india धोरणाला सुद्धा अर्थ राहणार नाही. आपल्या राज्याचे अर्थमंत्री शिस्तप्रिय आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे साहेब common man आहेत, मुख्यमंत्री अभ्यासू आहेत त्यामुळे त्यांनी अशा प्रथा परंपरा बंद करायलाच हव्यात. शासनाने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदतीचे पैसे तत्काळ रिलीज करावेत आणि बॅग देण्यासारख्या प्रथा बंद कराव्यात, ही विन���ती! शासन ही प्रथा बंद करणार नसेल तर किमान माझ्या बॅगसाठी तरी खर्च न करता तो खर्च आवश्यक त्या ठिकाणी वळवावा. माझ्या भूमिकेशी सर्वच सदस्य सहमत असतील कोणाचे दुमत नसेल हा विश्वास आहे,त्यामुळे इतर सदस्यांनीही ही प्रथा बंद करण्यासाठी पाठपुरावा करावा, ही देखील विनंती! @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde
Tweet media one
Tweet media two
1
4
18
@RRPSpeaks
Rohit Pawar
2 days
जामखेडमध्ये मदरसा मदिनातूल उलूम आणि मिल्लतनगर जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेच्या वार्षिक सम्मेलनास (जल्सा) उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी शिक्षक, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
5
55
@RRPSpeaks
Rohit Pawar
2 days
विद्यार्थी हा माझ्या कायमच आस्थेचा आणि काळजीचा विषय आहे. शिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कायमच अधिकाधिक सुविधा निर्माण करुन देण्याचा मी प्रयत्न केलाय. यातूनच माझं आणि विद्यार्थ्यांचं एक स्वतंत्र बाँडिंग तयार झालंय. कदाचित याचाच एक भाग म्हणून की काय जामखेडमधील नागेश विद्यालयात शिकणारी दहावीतील सायमा आरिफ शेख या विद्यार्थीनीने मतमोजणीच्या वेळी अस्थिर परिस्थिती निर्माण झाली असता माझ्या यशासाठी दहा दिवस उपवास करण्याचं साकडं देवाला घातलं ते पूर्णही केलं. जामखेड दौऱ्यात तिची घरी जाऊन भेट घेतली. तसंच तिच्या कुटुंबियांशीही चर्चा केली.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
60
25
199
@RRPSpeaks
Rohit Pawar
2 days
जामखेडमधील 'रयत'च्या श्री नागेश विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातील सर्वात मोठ्या मानवी रचनेतून '२६ जानेवारी' हे नाव साकारलं. तसंच २३०० विद्यार्थी, एनसीसी कॅडेट्स आणि शिक्षकांनी २२५ फूट लांब तिरंगा फडकवला. कलाशिक्षक आणि एनसीसी ऑफिसर मयूर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही अनोखी रचना साकारण्यात आली. हा उपक्रम ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’साठी पात्र ठरला असून रयत शिक्षण संस्थेचा सदस्य या नात्याने या उपक्रमाचा सार्थ अभिमान वाटतो.
0
5
27
@RRPSpeaks
Rohit Pawar
2 days
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या यशस्वी वाटचालीत महत्त्वाची साथ देणाऱ्या, त्याग, सहनशीलता आणि समर्पणाची मूर्ती असलेल्या माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन! #माता_रमाबाई_आंबेडकर
Tweet media one
1
3
36
@RRPSpeaks
Rohit Pawar
2 days
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा! @bb_thorat
Tweet media one
8
17
572
@RRPSpeaks
Rohit Pawar
2 days
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
3
13
@RRPSpeaks
Rohit Pawar
2 days
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
3
9