![Maha Arogya IEC Bureau Profile](https://pbs.twimg.com/profile_images/1631181946545127425/0EpI2h8g_x96.jpg)
Maha Arogya IEC Bureau
@MahaHealthIEC
Followers
14K
Following
929
Statuses
15K
Official Twitter handle of State Health Information, Education and Communication Bureau Pune
Joined June 2019
#क्षयरोग अर्थात 'टिबी' हा आजार कशामुळे होतो. क्षयरोग हा आजार झाल्यावर काय करावे, काय करू नये व त्यावरील निदान तसेच उपचार कशा पद्धतीने करावे, जाणून घेऊया... #TBHaregaDeshJeetega #Tuberculosis #TB
0
0
1
कुष्ठरोग बरा होऊ शकतो हात मिळवा, कुष्ठरोग निर्मूलन करा... #Mahahealthiec #leprosy #leprosyfreeindia #PublicAwarenessMessage #health #Skincare #mdt #BeatLeprosy
0
0
1
#जागतिक_रुग्ण_दिन संतुलित आहार... योग्य विहार... दूर ठेवा आपला आजार! #worlddayofthesick #MahaAarogya #HealthyMaharashtra #MahaArogya #IECBureau
0
0
1
११ फेब्रुवारी | जागतिक रुग्ण दिन निरोगी आरोग्यासाठी आपल्या आहारामध्ये फळे व पालेभाज्यांचा समावेश करणे आवश्यक आहे. याबरोबरच नियमीत व्यायाम व रुग्णांनी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पथ्याचे पालन करावे. #worlddayofthesick #MahaAarogya #HealthyMaharashtra #HealthForAll
0
0
2
११ फेब्रुवारी | जागतिक रुग्ण दिन निरोगी आरोग्यासाठी आपल्या आहारामध्ये फळे व पालेभाज्यांचा समावेश करणे आवश्यक आहे. याबरोबरच नियमीत व्यायाम व रुग्णांनी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पथ्याचे पालन करावे. #worlddayofthesick #MahaAarogya #HealthyMaharashtra #HealthForAll #StayHealthyStaySafe
0
1
2
#जागतिक_रुग्ण_दिन रुग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आपले मत खंबीरपणे व निर्भयपणे व्यक्त करूया! #WorldDayofTheSick #जागतिक_रुग्ण_दिन #staysafe #stayhealthy
0
0
1
#जागतिक_रुग्ण_दिन संतुलित आहार योग्य विहार, दूर ठेवा आपला आजार! #worlddayofthesick #MahaAarogya #HealthyMaharashtra #patientsafety #HealthForAll #MahaHealth
0
0
1
सन 2027 पर्यंत शून्य कुष्ठरोग प्रसारचे ध्येय साध्य करणे हे राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमाचे उद्देश आहे. अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा किंवा 104 या हेल्पलाईनवर कॉल करा. #Leprosy #MDT #disease #symptoms #sparsh #PHC #HealthDepartment #कुष्ठरोग_अभियान #LeprosyAwareness
0
0
0
हृदयरोगांच्या संबंधित कुठलीही #लक्षणे आढळल्यास त्वरित तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. वेळीच #उपचार घेतल्यास हृदयरोगापासून बचाव होऊ शकतो आणि धोका टळू शकतो. #HeartDisease #Heart #StayFitStayHealthy #TakeCareYourself
0
0
0
तुमची आरोग्य विषयक माहिती इतरत्र शोधण्याची गरज नाही ! #ABHA #abhanumber #digitalinformation #AbhaNumberCreate
0
0
1
संपूर्ण देशात सर्वसमावेशक डिजिटल मानसिक आरोग्य समुपदेशन आणि आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी भारत सरकारचा पुढाकार... टेली मानस टोल-फ्री नंबर 14416 1-800-891-4416 #mentalhealth #mentalhealthawareness #mentalhealthmatters #mentalhealthsupport #TeleMANAS #TollFreeNumber #MentalHealthMatters #dail14416
0
0
0
चला, तर निःसंकोच तपासणी क���ून घेऊ क्षयरोग व कुष्ठरोगापासून घर-परिवार वाचवू ! #leprosy #treatment #precautionisbetterthancure
0
0
0
रुग्णांना मिळणार आपत्कालीन वैद्यकीय सेवा. गंभीर रुग्णांना रुग्णवाहिकेत प्रशिक्षित डॉक्टर आणि अत्याधुनिक यंत्रणेसह प्राथमिक उपचार. आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक १०८ वर संपर्क साधावा. #सार्वजनिकआरोग्यविभाग #आरोग्य #वृद्धांचेआरोग्य #रुग्णवाहिका #मोफतउपचार #आरोग्यसेवा #दवाखाना #मोफतचाचण्या #आरोग्ययोजना #Hospital #HealthDepartment #FreeTreatment #ambulance #healthschemes #hearthealth
0
0
1
#हत्तीरोग झाला आहे? घाबरू नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या... अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या आशा किवा आरोग्य कर्मचा-यांशी संपर्क साधा. #Elephantiasiseradicationcampaign #FilariasisAwareness #LymphaticFilariasis #Elephantiasis #mosquitoes #takecareofyourbody #HealthForAll
0
0
1
हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीमेचा राज्यातील ५ जिल्ह्यांत १० फेब्रुवारीपासून शुभारंभ हत्तीरोगग्रस्त नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन: आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर मुंबई, दि. १० : राष्ट्रीय जंतनाशक दिनाच्या निमित्ताने येत्या आज १० फेब्रुवारीपासून राज्यातील ५ जिल्ह्यांत हत्तीरोग दुरिकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम राबवि��्यात येणार आहे. या राष्ट्रीयस्तरावर राबविण्यात येणाऱ्या मोहिमेचा शुभारंभ केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते झाला असून, राज्य स्तरावर सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या मोहिमेला सुरुवात झाली आहे. राज्यातील पाच जिल्ह्यांत राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत हत्तीरोगग्रस्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. राष्ट्रीय जंतनाशक दिनाच्या निमित्ताने १० फेब्रुवारीपासून १३ राज्यांतील १११ जिल्ह्यांमध्ये हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येणार आहे. राज्यातील पालघर, नांदेड, गडचिरोली, भंडारा व चंद्रपुर या ५ जिल्ह्यांतील ३४ तालुक्यांमध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या पाच जिल्ह्यांमध्ये मिळून एकूण ५४ लाख ९८ हजार ८८४ लोकसंख्या असून त्यापैकी ५१ लाख ५८ हजार १७० पात्र लाभार्थ्यांना औषधे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या मोहिमेंतर्गत उपचारासाठी डीईसी, अल्बेंडाझोल आणि आयवरमेक्टिन या औषधांचा वापर करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने २०२७ पर्यंत या आजाराचे देशातून दुरीकरण करण्याचे ध्येय ठेवले आहे. देशात २० राज्यांतील ३४८ जिल्ह्यांमध्ये हत्तीरोग (लिम्फ्याटिक फायलेरियासिस) या आजाराचे रुग्ण आढळून आले होते. परंतु जागतिक आरोग्य संघटना आणि केंद्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने देशामध्ये १९५७ पासून विविध जिल्ह्यांमध्ये ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या यशामुळे हत्तीरोग या आजाराचे ७ राज्यांतून दुरीकरण शक्य झाले आहे. हत्तीरोग हा दुर्लभ आजार आहे जो दूषित क्युलेक्स डासांच्या चाव्यामुळे होतो आणि तो प्रदूषित पाण्यात प्रजनन करतो. #Elephantiasiseradicationcampaign #FilariasisAwareness #LymphaticFilariasis #Elephantiasis #mosquitoes #takecareofyourbody @abitkar_prakash
0
1
3
“ना शाप आहे, ना पाप आहे, हत्तीरोग हा डासांच्या चाव्याचा प्रताप आहे.” ५ जिल्ह्यांत 10 फेब्रुवारीपासून राबविणार हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम पुणे - राष्ट्रीय जंतनाशक दिनाच्या निमित्ताने येत्या 10 फेब्रुवारीपासून राज्यातील ५ जिल्ह्यांत हत्तीरोग दुरिकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा. ना. श्री. जे. पी. नड्डा साहेब यांच्या हस्ते राष्ट्रीय स्तरावर या मोहिमेचा शुभारंभ होणार असून, राज्य स्तरावर राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा. नामदार श्री. प्रकाश आबिटकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत या मोहिमेला सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय जंतनाशक दिनाच्या निमित्ताने 10 फेब्रुवारीपासून १३ राज्यांतील १११ जिल्ह्यांमध्ये हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येणार आहे. राज्यातील पालघर, नांदेड, गडचिरोली, भंडारा व चंद्रपुर या ५ जिल्ह्यांतील ३४ तालुक्यांमध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या पाच जिल्ह्यांमध्ये मिळून एकूण ५४ लाख ९८ हजार ८८४ लोकसंख्या असून त्यापैकी ५१ लाख 58 हजार १७० पात्र लाभार्थ्यांना गोळ्या खावू घालण्यात येणार आहेत. या मोहिमेंतर्गत उपचारासाठी डीईसी, अल्बेंडाझोल आणि आयवरमेक्टिन या औषधांचा वापर करण्यात येणार आहे. भारत सरकारने या आजाराचे २०२७ पर्यंत आपल्या देशातून दुरीकरण करण्याचे ध्येय ठेवले आहे. देशात २० राज्यांतील ३४८ जिल्ह्यांमध्ये हत्तीरोग (लिम्फ्याटिक फायलेरियासिस) या आजाराचे रुग्ण आढळून आले होते. परंतु जागतिक आरोग्य संघटना आणि केंद्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने देशामध्ये सन १९५७ पासून विविध जिल्ह्यांमध्ये ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या यशामुळे हत्तीरोग या आजाराचे ७ राज्यांतून दुरिकरण शक्य झाले आहे. हत्तीरोग हा दुर्लभ आजार आहे जो दूषित क्युलेक्स डासांच्या चाव्यामुळे होतो आणि तो प्रदूषित पाण्यात प्रजनन करतो. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पाच जिल्ह्यांतील जनतेला या मोहिमेस उत्स्फूर्तपणे पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले आहे. सदर VC साठी डॉ. दिलीप माने, उपसंचालक कोल्हापूर, डॉ. प्रेमचंद कांबळे, सहा.संचालक (हत्तीरोग),पुणे, डॉ. सुप्रिया देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक, कोल्हापूर, डॉ. संजय रणवीर सहा.संचालक,(हि), कोल्हापूर, डॉ. महेंद्र जगताप, राज्य कीटकशास्त्रज्ञ, पुणे, डॉ. विनोद मोरे जि.हि.अ. कोल्हापूर, डॉ. स्वप्नील बोधवाड जि.हि.अ. सिंधुदुर्ग व उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ.पल्लवी तराळकर, डॉ.अमोल पाटील, डॉ.मिलिंद कदम, डॉ.चंद्रकांत परळेकर तालुका आरोग्य अधिकारी गारगोटे उपस्थित होते. #Elephantiasiseradicationcampaign #FilariasisAwareness #LymphaticFilariasis #Elephantiasis #mosquitoes #takecareofyourbody
0
0
8
कुष्ठरोगाची लागण झाल्यास काय करावे? #leprosy #leprosyfreeindia #PublicAwarenessMessage #health #Skincare #BeatLeprosy
0
3
5
परस्परांवर प्रेम करा, टीबीला दूर सारा #freetbtreatment #tuberculosis #TBAwareness #100daysTBCampaign #100DaysofTBElimination #TBHaregaDeshJeetega #TB #Diagnosis #treatment #TBdisease
0
1
3
निरोगी महाराष्ट्रा'साठी माता-भगिनींचे आरोग्य जपणे महत्त्वाचे - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरोग्य सेवा उपक्रमांचे लोकार्पण व दोन कोटी महिलांची आरोग्य तपासणी शुभारंभ ठाणे – राज्य शासन निरोगी महाराष्ट्र बनविण्यासाठी कटिबद्ध असून, रुग्णांना वेळेवर तातडीने उपचार मिळणे आवश्यक आहे. सामाजिक, कौटुंबिक आणि व्यावसायिक जबाबदारी सांभाळत असताना माता-भगिनी कायमच आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे 'निरोगी महाराष्ट्र' बनविण्यासाठी सर्वप्रथम राज्यातील माता-भगिनींचे आरोग्य जपणे अतिशय महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत लोकोपयोगी आरोग्य सेवा उपक्रमांचे लोकार्पण व राज्यातील दोन कोटी महिलांची आरोग्य तपासणीचा शुभारंभ आज उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री श्री. प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली या लोकार्पण सोहळा आणि महिला तपासणी शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन ठाणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. प्रतापराव जाधव, केंद्रीय राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) आयुष मंत्रालय व राज्य मंत्री, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, भारत सरकार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, अभिनेता गोविंदा, नविन सोना, आरोग्य सेवा तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक अमगोथू श्री रंगा नायक तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी ��पस्थित होते.स्थानिक लोकप्रतिनिधीही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. केंद्र सरकारच्या '#हर_घर_आयुर्वेद' या प्रकल्पाचा शुभारंभ प्रतापराव जाधव, केंद्रीय राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) आयुष मंत्रालय व राज्य मंत्री, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, भारत सरकार, यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला. त्याचप्रमाणे मानसिक आरोग्यासाठी मायका या मोबाईल ॲपचे उद्घाटनही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यावेळी झाले. आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या डॉक्टर्स, दंतशल्यचिकित्सक, अधिपरिचारिका तसेच आरोग्य सेविकांचा यावेळी सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. राज्यातील प्रत्येक नागरिकांचे आरोग्य निरोगी असावे यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, " शासनामध्ये काम करणारे प्रत्येक अधिकाऱ्याने प्रमाणे नागरिकांनी सुद्धा संवेदनशील असणे महत्त्वाचे आहे. संकटाच्या काळात रुग्णांना वेळेवर तातडीने मदत मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज लोकार्पण करण्यात आलेल्या आरोग्य सेवा उपक्रमांचा राज्यातील रुग्णांना खासकरून दुर्गम भागातील रुग्णांना निश्चित फायदा होईल. सामाजिक, कौटुंबिक, व्यावसायिक जबाबदारी सांभाळताना महिला स्वतःच्या आरोग्याकडे कायम दुर्लक्ष करतात. त्यामुळे महिलांची नियमित आरोग्य तपासणी होणे आवश्यक आहे. लवकर निदान आणि प्रतिबंधात्मक सेवा आणि उपाय सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. माता-भगिनींचे आरोग्य जपले तरच महाराष्ट्र निरोगी होईल." सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री श्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले की, महिलांवर विविध जबाबदाऱ्या असल्यामुळे त्यांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. आरोग्य कडे लक्ष देण्यासाठी त्यांना वेळ मिळत नाही. ही गोष्ट लक्षात घेऊनच आरोग्य विभागाने राज्यातील महिलांचे आरोग्य तपासणी करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. केंद्रीय राज्य मंत्री प्रतापराव जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावाजवळील परिसरामध्ये वेलनेस सेंटर तसेच राष्ट्रीय हर्बल गार्डन प्रकल्प उभारणार असल्याचे यावेळी सांगितले. या लोकार्पण सोहळ्यामध्ये आरोग्य विभागामार्फत आरोग्य सेवा अधिक सक्षम, दर्जेदार आणि नागरिकांना सहजपणे उपलब्ध करून देण्यासाठी ८ कर्करोग मोबाईल व्हॅन, ७ अॅडव्हान्स लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका, १०२ क्रमांकांच्या ३८४ रुग्णवाहिका, २ सीटी स्कॅन मशीन, ८० डिजिटल हँड हेल्ड एक्स-रे मशीनचे लोकार्पण उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचप्रमाणे राज्यात ६ डे केअर किमोथेरपी सेंटर सुरू करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. राज्यातील दोन कोटी महिलांची आरोग्य तपासणी उपक्रमांतर्गत रक्त तपासणी - हिमोग्लोबिन सर्व प्रकारच्या तपासण्या, मधुमेह, रक्तदाब, गरजेनुसार ईसीजी तपासणी, सर्वसाधारण तपासणी, निदान व उपचार करण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक अमगोधू श्री रंगा नायक यांनी केले. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @mpprataprao @PratapSarnaik @abitkar_prakash @MeghnaBordikar
0
0
6