छत्रपती शिवाजी महाराज हुशार आणि जाणकार असून ते सर्व धर्माशी अत्यंत सहिष्णुतेने वागतात.! -डेल्लानचा, समकालीन पोर्तुगीज प्रवासी १९ फेब्रुवारी शिवजयंती मनामनात l शिवजयंती घराघरात ll
एखाद्या आजारी व्यक्ती, साधू, संत, फकीर, वरिष्ठांना फळे, भेटवस्तू देणे याला लाच म्हणत नाहीत तर शिष्टाचार म्हणतात. इतके समजायला अक्कल लागते, हे राहूल सोलापूरकर यांना समजले तर खूप आनंद वाटेल!
मुलगा रायबाचे लग्न रद्द केले आणि मोगलांच्या ताब्यात असणारा कोंढाणा किल्ला जिंकला, याकामी तानाजी मालुसरे लढता लढता धारातीर्थी पडले, शिवाजीराजे म्हणाले "गड जिंकला, पण सिंहासारखा तानाजी गेला. गड आला पण सिंह गेला" तानाजी मालुसरे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
भारताच्या सर्वांगीण स्वातंत्र्यासाठी सशस्त्र लढा उभारणारे, इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे, देशासाठी फासावर जाणारे, शूर ,पराक्रमी, निर्भीड, स्वाभिमानी आणि लोककल्याणकारी असे आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
अज्ञान, अंधश्रद्धा, विषमता, गुलामगिरी, भोंदूगिरी याविरुद्ध लढणारे, सामान्य लोकांच्या जीवनामध्ये आत्मविश्वास निर्माण करणारे आणि सुमारे पाच हजार अभंग लिहिणारे महान क्रांतिकारक संत तुकाराम महाराज जयंतीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांचं वर्चस्व नष्ट करून भूमिपुत्रांचे स्वराज्य निर्माण झाले पाहिजे यासाठी भूमी सुपीक करणारे महापराक्रमी सैन्यबळ, दुर्गबळ आणि द्रव्यबळ यामध्ये महाबलवान असणारे स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन
*आज पुण्यात कार्यक्रम. नक्की यावे* *युवराज छत्रपती संभाजी महाराज* यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत गुणवंत शिक्षकांना राज्यस्तरीय महात्मा फुले, सावित्रीबाई फुले पुरस्कार वितरण समारंभ! *स्थळ* - एस एम जोशी सभागृह, पत्रकार भवन शेजारी, पुणे.*दिनांक * -२३ जानेवारी, सायं. ५ वा.
गुन्हेगारांना पकडून शासन करावे व अन्यायग्रस्त कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी आंदोलन करायला लागणे ही बाब आपण बिहारला खूप मागे टाकले आहे, याचे द्योतक आहे!
पश्चिमात्त्यांचे विज्ञान आणि भारतीयांचे तत्त्वज्ञान यांच्या सेतू बांधून जग जवळ करणारे, भारतीय तत्त्वज्ञान जागतिक स्तरावरती घेऊन जाणारे आधुनिक भारताचे महान शिल्पकार स्वामी विवेकानंद जयंतीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
शेकडो वर्षाची गुलामगिरी नष्ट करून रयतेचे स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा देणाऱ्या, स्वराज्याचे प्रेरणापीठ, ज्ञानपीठ, विद्यापीठ आणि संस्कारपीठ म्हणजे राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना जयंती निमित्त अभिवादन आणि सर्वांना शुभेच्छा!
समतेसाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे जागतिक कीर्तीचे विद्वान,समाजपरिवर्तनासाठी पूर्णवेळ देणारे,"धर्माचा तौलनिक अभ्यास"या विषयावर ऑक्सफर्ड विद्यापीठात पीएच.डी.मिळविणारे,महात्मा फुलेच्या जीवनावर पोवाडा लिहिणारे डॉ.महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन !