Jayant_R_Patil Profile Banner
Jayant Patil- जयंत पाटील Profile
Jayant Patil- जयंत पाटील

@Jayant_R_Patil

Followers
674K
Following
5K
Statuses
14K

President & Leader of Legislative Party, @NCPspeaks Maharashtra|8th Term MLA,Islampur |Ex Minister-Home, Finance,Rural Development & Water Resources,Maharashtra

Joined February 2013
Don't wanna be here? Send us removal request.
@Jayant_R_Patil
Jayant Patil- जयंत पाटील
5 hours
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष स्व. लालासाहेब आबा यादव यांच्या रक्षाविसर्जन विधीस उपस्थित राहून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले. दोन दिवसांपूर्वी आबांच्या जाण्याची दुःखद बातमी आली. जिल्ह्याच्या राजकारणातील आबांसारखी व्यक्ती जाण्याने फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आबांकडे जुन्या अनुभवांची शिदोरी होती. राजकारणात हार-जीत असते पण निवडणुकीनंतर देखील माणुसकी जपण्याचे काम आबांनी नेहमीच केले. आबांनी आपली भूमिका शेवटपर्यंत कायम ठेवली. स्व. राजारामबापूंच्या समवेत काम करताना जी भुमिका स्विकारली ती त्यांनी कधीही बदलली नाही. सामान्यपणे जुन्या काळातील कार्यकर्ते हे विचारधारेचे पक्के असायचे. या वयातही त्यांची जिद्द दिसून यायची. नव्या पिढीला माझी भूमिका हीच राहिल म्हणून नेहमीच ठणकावून सांगत होते. या भागात आलो की, आबांसोबत संवाद व्हायचा. त्यांच्याशी बोलताना पूर्वीचा काळ डोळ्यासमोर उभा राहायचा. इथे कारखाना उभारण्याची भूमिका त्यांनी घेतली. स्व. लालासाहेब आबांसारखे नेते आज आपल्यातून निघून गेले. आबांच्या जाण्याने त्या पिढीची ओळख निघून गेली.
Tweet media one
0
6
55
@Jayant_R_Patil
Jayant Patil- जयंत पाटील
8 hours
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपल्याला उत्तम व निरोगी आयुष्य लाभो, ही सदिच्छा! @mieknathshinde
1
3
124
@Jayant_R_Patil
Jayant Patil- जयंत पाटील
23 hours
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि विधान परिषदेचे माजी आमदार प्रकाश गजभिये यांचा काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीर येथे अपघात झाला. आता त्यांच्यावर मुंबईच्या लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज मुंबईत असताना लिलावती येथे त्यांची भेट घेतली.
Tweet media one
3
13
363
@Jayant_R_Patil
Jayant Patil- जयंत पाटील
3 days
बडोदा संस्थानचे लोककल्याणकारी महाराज सयाजीराव गायकवाड यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन🙏🏼 त्यांनी शिक्षणाचे महत्व जाणून लोकांना ज्ञान प्रवाहात व सामावून घेण्यासाठी प्रयत्न केले. बालविवाह बंदी, स्त्रियांना वारसाहक्क अशा आपल्या अनेक थोर कार्यातून त्यांनी स्त्रियांसाठी आधुनिक युगाचे दालन खुले केले. त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहील.
Tweet media one
5
10
125
@Jayant_R_Patil
Jayant Patil- जयंत पाटील
6 days
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव प्रा. श्रीहरी काळे पाटील यांच्या अपघाती निधनाची बातमी अतिशय वेदनादायी आहे. एक निष्ठावंत, आदर्श सहकारी कार्यकर्ता गमावल्याची सल कायम राहील. पाटील कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात आपला पक्ष सहभागी आहे. स्व. प्रा. श्रीहरी काळे पाटील यांच्या पवित्र स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो 🙏🏼
Tweet media one
2
8
42
@Jayant_R_Patil
Jayant Patil- जयंत पाटील
7 days
And we’re the #champions yet again, straight second time in a row! Take a bow you future cricketing guns of India, as India's U19 Women's Cricket Team lift the ICC U19 Women's T20 World Cup 2025, defeating SA by 9 wickets in the finals. Congratulations to the entire team, especially Gongadi Trisha, Player of the Tournament! #U19T20WorldCup #TeamIndia
3
10
101
@Jayant_R_Patil
Jayant Patil- जयंत पाटील
9 days
माघी गणेश जयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा! #माघी_गणेश_जयंती #गणपती_बाप्पा_मोरया
Tweet media one
1
15
88
@Jayant_R_Patil
Jayant Patil- जयंत पाटील
9 days
१०५ वर्षांपूर्वी १९२० साली राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुढाकाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक या वर्तमानपत्राची सुरुवात केली. वंचित, शोषित, पीडित समाजाच्या व्यथा-वेदना मांडून, त्यांना जागरूक करण्याचे काम मूकनायकने केले. पुढे या समस्यांसाठी संघर्षाची धार देऊन 'मूकनायक' खऱ्या अर्थाने वंचित जगाचा नायक ठरला. मूकनायकाच्या वर्धापनदिनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन🙏🏼 #मूकनायक
Tweet media one
1
13
119
@Jayant_R_Patil
Jayant Patil- जयंत पाटील
10 days
अहिंसात्मक क्रांतीनेही स्वातंत्र्य मिळवता येते हा आदर्श महात्मा गांधी यांनी संपूर्ण जगाला घालून दिला. स्वदेशी, ग्रामस्वराज्य, सर्वोदय या तत्त्वांद्वारे समाजाला परिवर्तनाची दिशा देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन! #महात्मा_गांधी #MahatmaGandhi
Tweet media one
4
13
65
@Jayant_R_Patil
Jayant Patil- जयंत पाटील
15 days
प्रजासत्ताक दिन चिरायू होवो! आज प्रजासत्ताक दिनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही मूल्ये प्रदान करणाऱ्या भारतीय संविधानाचे रक्षण करून जगातील सर्वात मोठी लोकशाही समृद्ध करण्यासाठी संकल्पबद्ध होऊया. सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #RepublicDayIndia #प्रजासत्ताक_दिन #JaiHind
Tweet media one
8
17
167
@Jayant_R_Patil
Jayant Patil- जयंत पाटील
15 days
आदरणीय श्री. शरदचंद्र पवार साहेबांनी देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी काय केले? असे विच��रणाऱ्यांसाठी खास... @NCPspeaks @PawarSpeaks
5
64
461
@Jayant_R_Patil
Jayant Patil- जयंत पाटील
15 days
आदरणीय श्री. शरदचंद्र पवार साहेबांनी देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी काय केले? असे विचारणाऱ्यांसाठी खास...
32
144
1K
@Jayant_R_Patil
Jayant Patil- जयंत पाटील
16 days
मोठी बातमी! दावोसमध्ये पहिल्याच दिवशी ५ लाख कोटींची गुंतवणूक, दुसऱ्या दिवसापर्यंत १५.७० लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी एकूण ५४ समंजस करार दावोसमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधून अशा बातम्या रोज येत आहेत. महाराष्ट्रात गुंतवणूक येत असेल तर ही चांगलीच बाब आहे. पण ही फक्त PR Activity नसावी म्हणजे झाले! कारण मागील वर्षीही अशाच प्रकारच्या बातम्या येत होत्या. उदा. ग्रीन हायड्रोजन प्रकल्पासाठी आयनॉक्स एअरसमवेत २५ हजार कोटींचा करार जिंदाल यांच्यासमवेत ४१ हजार कोटींचा करार हरित ऊर्जा प्रकल्पांसाठी ५६ हजार कोटींचा करारा या करारांचं पुढे काय झाले, प्रत्यक्षात किती गुंतवणूक आली हे राज्यकर्त्यांनांच ठाऊक. यंदाही गुंतवणुकीची मोठी यादी सरकारने मांडली आहे. मोठ्या मोठ्या वल्गना केल्याचे दिसून येत आहे. या गुंतवणुकी फक्त कागदावरच न राहता प्रत्यक्षात याव्यात, लोकांना रोजगार मिळावा व महाराष्ट्राची भरभराट व्हावी ह्याच शुभेच्छा!
Tweet media one
Tweet media two
25
81
583
@Jayant_R_Patil
Jayant Patil- जयंत पाटील
17 days
आपल्या ओजस्वी विचारांनी आणि दूरदर्शी प्रयत्नांनी देशवासीयांमध्ये राष्ट्रभक्तीचे स्फुल्लिंग चेतवणारे राष्ट्रनायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏🏼 #subhashchandrabose
Tweet media one
3
4
27
@Jayant_R_Patil
Jayant Patil- जयंत पाटील
17 days
आपल्या अमोघ वक्तृत्वाने, करारी लेखनातून आणि कुंचल्यातून सामजिक परिस्थितीवर आवाज उठवणारे, मराठी माणसांच्या मनात स्वाभिमान जागृत करणारे शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! #BalasahebThackeray
Tweet media one
4
9
142
@Jayant_R_Patil
Jayant Patil- जयंत पाटील
18 days
जळगावातील परधाडे स्टेशनजवळ आगीच्या भीतीने पुष्पक एक्स्प्रेसमधून प्रवाशांनी उड्या मारल्यानंतर समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने त्यांना चिरडल्याची घटना अत्यंत वेदनादायी आहे. अपघातात सुमारे ११ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. अनेकजण जखमी आहेत. प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवून नागरिकांना आवश्यक ती मदत पुरवावी. मृत व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏼 #trainaccident #PushpakExpress #jalgaon
1
11
119
@Jayant_R_Patil
Jayant Patil- जयंत पाटील
20 days
खो खो विश्वचषकाच्या पहिल्या स्पर्धेत भारतीय पुरुष संघाने देखील चमकदार कामगिरी करत शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. ५४-३६ ने आघाडी घेत नेपाळ संघाला पराभूत केले आहे. आपल्या मातीतील खेळास आतंरराष्ट्रीय स्तरावर गाजवणाऱ्या या संघाचे मनापासून कौतुक करतो. खो खो वर भारताचे वर्चस्व कायम राहील अशा शुभेच्छा व्यक्त करतो💐 #khokhoworldcup2025
Tweet media one
3
6
66
@Jayant_R_Patil
Jayant Patil- जयंत पाटील
20 days
भारताच्या महिला संघाने पहिल्या महिला खो-खो वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले! नेपाळ संघासोबत झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने सुरुवातीपासूनच वर्चस्व ठेवले. नेपाळच्या संघाला कुठल्याही क्षणी पुनरागमनाची संधी दिली नाही. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील प्रियंका इंगळेच्या वर्चस्वाखाली ही अभिमानास्पद कामगिरी केली त्याबद्दल खो खो संघाचे मनःपूर्वक अभिनंदन 💐 #khokhoworldcup2025
Tweet media one
1
4
56
@Jayant_R_Patil
Jayant Patil- जयंत पाटील
21 days
मिरज तालुक्यातील कृष्णा नदीवर कसबे डिग्रज ते मौजे डिग्रजला जोडणाऱ्या पुलाचे "हिम्मत बहादुर सेनानी श्रीमंत विठोजीराव चव्हाण" पुल असे नामांतर करण्यात आले. या सोहळ्यास उपस्थित राहीलो. १६८८ साली त्यांनी बादशहाच्या तंबूचे सोन्याचे कळस कापून आणले होते. त्या इतिहासाला उजाळा मिळाला.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
8
55